Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026

    नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    June 8, 2026

    लेकीकडे आईचं माहेरपण…

    June 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आमच्या मराठी शाळा
    शैक्षणिक

    आमच्या मराठी शाळा

    Team AvaantarBy Team AvaantarJune 26, 20253 Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    मराठी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    गायत्री वैशंपायन

    साधारणतः कुठल्याही लेखाची सुरुवात ही catchy, attractive अशा शीर्षकाने करतात, तरच पुढला लेख वाचला जाईल, ही शक्यता वाढते. पण आज ज्या जगात मी तुम्हाला घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे, तिथे चमचमणारं, झगमगीत असं काहीच नव्हतं. म्हणूनच साधं शीर्षक ‘आमच्या मराठी शाळा’…

    माझी शाळा एक व्यक्ती असती तर कशी असती? फार make-up न करणारी, बडेजाव नसणारी, स्वच्छ नीटनेटकी रहाणारी, चटपटीत, आपला विषय शिकवण्यात तरबेज, ठामपणे मतं मांडणारी एखादी पन्नाशीची प्रौढा असावी, अशा रुपात शाळा माझ्यासमोर येते. कदाचित खूप शिक्षकांना (बाईंना) मी तसं पाहिल्यामुळे शाळेची अशी इमेज माझ्या मनात ठसली असेल.

    अर्थात, हे माझे अनुभव साधारण 80-90च्या दशकातील शहरी भागातील शाळेचे आहेत. बहुतांश मराठी शाळांमधील वातावरण सारखेच होते. मराठी शाळांमधील पहिला तास जवळपास प्रार्थना, श्लोक यामध्ये जायचा. सुरुवात व्हायची ‘वंदे मातरम्’पासून. त्यानंतर ‘या कुन्देन्दुतुषारहारधवला’ ही सरस्वती वंदना व्हायची. तेव्हा ‘निःशेष ‘जाड्या’ पहा’ला प्रत्येकाने वर्गातल्या लठ्ठ मुलांकडे बघणं mandatory होतं. सागितलेलचं होतं ना ‘जाड्या पहा’. माझ्या शाळेत (ऊत्कर्ष मंदिर, मालाड) शनिवारी भीमरूपी, मंगळवारी अथर्वशीर्ष असे दिवस ठरलेले होते. ‘भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा रोज म्हणावी लागायची. पुढच्या बाकावरच्या विद्यार्थ्याच्या खांद्याला टकटक केल्याशिवाय ती सफल व्हायची नाही.

    प्रार्थना म्हणणारी मुलं बरा आवाज असणारी, गाऊ शकणारी आणि हुशार तसेच आगाऊ असल्याने पुढेपुढे करणारी अशी दोन प्रकारची असायची. दुसर्‍या गटात मुलींचा भरणा जास्त.

    पोरं शाळेत शिरायची ती शिशुवर्गात ऊर्फ बालवाडीत. हल्ली pre-primary हे प्रकरण तब्बल चार वर्षं चालतं. मराठी शाळेत छोटा आणि मोठा गट असायचा. आमच्या बालवाडीच्या वर्गात सतरंज्या घातलेल्या असायच्या. वर्गाच्या बाहेर चपला काढायचा stand होता. दर शुक्रवारी आम्हाला शाळेत वेफर्स खायला मिळायचे. रडारड थांबवायला शाळेनी केलेली युक्ती होती ती. आईने दिलेला डबा संपवणे आणि निसर्गाचा कॉल आलेला मावशींना / ताईंना सांगणे ही मुख्य दोन वर्षांतली “targets” होती. या गटाला शिशुवर्गाइतके समर्पक नाव शोधून सापडणे अशक्य आहे.

    हेही वाचा – गेले ते दिन गेले…

    शिशुवर्गातून प्राथमिकमध्ये मुलं आली की, पाटीची संगत सुटायची आणि वह्या पेन्सिलींचा शिरकाव व्हायचा. गणिताला चौकोनाची वही (फुली गोळा खेळायला सोपी) आणि बाकी तीनरेघी असा थाट होता. पेन्सिलीला टोक करणे हा शिक्षणाच्या बरोबरचा जोडधंदा या चार वर्षांत बरा करता यायचा. काही कलाकार मंडळी या पेन्सिलीच्या कातरणापासून greetings वगैरे बनवायची.

    चौथी संपताना साधारण तीसपर्यंत पाढे, वर्ग आणि दहापर्यंत घन रोज घोकून पाठ व्हायचे (पंचवीसच्या पुढील पाढे लडखडत). बालभारतीची पुस्तके आजही हातात धरली तर वाचाविशी वाटतील इतकी छान होती. तिसरीत आपल्या जिल्ह्याचा भूगोल आणि चौथीत महाराष्ट्राचा. अनेकांच्या मनात लहानपणीच शिवप्रेमाचं बीज रुजलं, त्यात चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाचा मोलाचा वाटा आहे. रायरेश्वराची शपथ, महाराजांनी कोंढाणा घेतला… या धड्यांनी कितीतरी कोवळी मने थरारून उठली असतील.

    प्राथमिकमध्ये एका इयत्तेत एका वर्गाला एकच शिक्षक सगळे विषय शिकवत असल्यामुळे मुलांची इत्थंभूत ओळख शिक्षकांना झालेली असायची. कोणाला बरं नाही, कोणी अभ्यास चुकवलेला आहे, एका नजरेत सगळं लक्षात यायचं. आमच्या चौथीपर्यंतच्या सगळ्या बाई घरी केलेला तिळगूळ संक्रातीला सगळ्या वर्गासाठी घेऊन यायच्या. कोवळ्या वयात हा जिव्हाळा फार महत्त्वाचा असतो.

    माध्यमिक शाळेत हे सगळं चित्र बदलायचं. एक शिक्षक आपला विषय शिकवून अर्ध्या तासाने निघून जायचा आणि नवीन शिक्षक येऊन फळा पुसून टाकायचा. इकडे अनेकांचं पहिलंच उतरवून घ्यायचं राहिलेलं असायचं. आता शिक्षक ‘वंदे भारत’च्या स्पीडने शिकवायला लागलेले असायचे, पण मुलांची पॅसेंजरची सवय अजून सुटलेली नसल्यामुळे पाचवीत सुरवातीला तारांबळ उडायची.

    हेही वाचा – शाळेचा पहिला दिवस

    त्यातून English सुरू व्हायचं आणि स्पेलिंगं पाठ करायला पर्याय नसायचा. गोपाळ, सीता, अहमद या मंडळींशी दोस्ती व्हायची. पाचवी आणि सहावीच्या पुस्तकात यांच्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. English grammar अगदी तर्खडकरी पद्धतीने शिकवलं जायचं. एकूण ‘syllabus’ किती ‘vast’ आहे, त्यापेक्षा अभ्यासाचा पाया पक्का करण्याकडे कल होता. आठवीपासून संस्कृतही सुरू व्हायचं आणि देव, माला हे शब्द वर्गावर्गातनं चालवले जायचे.

    माध्यमिक शाळेत खूप आंतरशालेय स्पर्धा असायच्या, एकांकिका सादर केल्या जायच्या. कलागुण तुमच्यात असल्यास त्याला वाव मिळायचा.

    बालभारतीची कुमारभारती झाली की, कुमारअवस्थेला अनुसरून वेगळे धुमारेही काही कुमारांना आणि कुमारीना फुटायचे. पण शिक्षकांचं बारीक लक्ष असायचे. करत करत नववीमध्ये मुलं यायची आणि पुढलं वर्ष दहावीचं हे येता-जाता कानावर पडायचं. ‘Merit list’मध्ये मुलं येणं हा शाळेसाठी अतिशय अभिमानाचा विषय होता. त्यावरून शाळांमध्ये चुरस असायची.

    ‘Send off’ परीक्षेच्या काही दिवस आधी व्हायचा. मुली ढसाढसा रडायच्या आणि अगदी टारगट मुलांचेही डोळे ओले व्हायचे… असा असायचा आमचा मराठी शाळेतला प्रवास.

    आजच्या शाळांपेक्षा व्यावसायिकता कमी होती, शाळा आणि शिक्षक संबंध घरगुती होते. एकूण समाजाचं वातावरण तसं असेल. आमच्या शाळांनी कधी ‘mode of transport’ काय? हा प्रश्नच विचारला नाही. सगळी मुलं शाळेत चालतच यायची. पोळीभाजी आणणे, ही बर्‍याच शाळांची डब्याची शिस्त होती. त्याने फार फार तर पूर्ण आहार होत नसेल, पण जंक फूड तरी खाल्लं जात नव्हतं… आणि आज डब्यात ‘rice dish’ द्या, उद्या ‘sprout,’परवा ‘fermented ‘असली कटकट आयांच्या डोक्याला नव्हती.

    मराठीत शाळांची फी पाचवीला पाच, सहावीला सहा ते दहावीला दहा रुपये अशी असायची. मुलींना तर फुकटच. सगळ्या शाळा पूर्णपणे सरकारी अनुदानावर अवलंबून असायच्या. आजच्या हजारात आणि लाखात फी घेणाऱ्या आणि तरीही काही प्रमाणात अभ्यास आणि projects पालकांच्या माथी मारणाऱ्या (projects हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे). शाळा पाहिल्या की, कमी पैशात उत्तम शिक्षण देणाऱ्या आमच्या शाळांचा अभिमान वाटल्याशिवाय रहात नाही.

    अर्थात, असं नाहीये की, मराठी शाळांमध्ये सगळे रामराज्य होते आणि आता सगळेच नीट न शिकवणारे शिक्षक आहेत. मानवी प्रवृत्ती कमी-अधिक प्रमाणात सगळीकडे सारखीच असते. पण तळमळ कुठेतरी कमी झाली आहे. एक मात्र नक्की, मराठी शाळेत शिकल्यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही. जो तो आपापल्या कुवतीनुसार आणि कष्टानुसार नोकरी, व्यवसायात स्थिरावला. आपण शाळा सोडतो, पण शाळा मनातून कधीच जात नाही. साधी आकड्याची सरस्वती पाहिली तरी मन वर्गात जाऊन बसतं (शक्यतो मागच्या बाकावर).

    अशा या मुलांना घडवणाऱ्या, संस्कार करणार्‍या जाहिरातबाजी न करणाऱ्या शाळा लुप्त झाल्या आहेत. काळाची गरज असेल कदाचित. पण वाईट तर वाटतंच. माझा हा लेख तमाम मराठी शाळाचालकांना, शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सादर अर्पण.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026 शैक्षणिक

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    May 14, 2026 शैक्षणिक

    विद्यार्थ्यांना क्लासेसची आवश्यकता किती?

    May 5, 2026 शैक्षणिक

    3 Comments

    1. सुरेश गुरव सर on July 7, 2025 6:34 pm

      अतिशय सुंदर.मार्गदर्शनपर विचार अनुभव यातून आले अलौकीक विचार.धन्यवाद

      Reply
    2. सुरेश गुरव सर on July 7, 2025 6:37 pm

      अतिशय सुंदर मार्गदर्शनपर विचार व अनुभव यातून आले अलौकीक विचार खूपच धन्यवाद.

      Reply
      • Avatar photo
        Team Avaantar on July 13, 2025 11:22 pm

        धन्यवाद

        Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    By Team AvaantarMay 20, 2026

    डॉ. किशोर महाबळ विद्यार्थ्यांना नेहमीच ताजमहालसारख्या ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे, आधुनिक बहुमजली विशाल इमारती, महानगरातील…

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    May 14, 2026

    विद्यार्थ्यांना क्लासेसची आवश्यकता किती?

    May 5, 2026

    प्रत्येक विद्यार्थ्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलेच पाहिजे…

    May 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026

    नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    June 8, 2026

    लेकीकडे आईचं माहेरपण…

    June 8, 2026

    नात्यातील निरगाठी

    June 8, 2026

    Dnyaneshwari : तरि व्यक्त आणि अव्यक्त, हें तूंचि एक निभ्रांत

    June 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जून 2026

    June 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 322
    • अवांतर 190
    • आरोग्य 118
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 447
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 219
    • मैत्रीण 20
    • ललित 687
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026

    नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    June 8, 2026

    लेकीकडे आईचं माहेरपण…

    June 8, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.