Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
भाग – 3 ती व्यक्ती आता अनोळखी राहिली नव्हती. त्या माणसाकडून कोणताही धोका नाही, याची त्या शीख युवकाला ठाम खात्री पटली होती. जंगलातला एकांत, त्या दिवसाचा थकवा आणि पोटातलं समाधान… या सगळ्यांनी मिळून त्याच्या मनातल्या वादळांना थांबवलं होतं. तो मोकळा श्वास घेत शांत बसला आणि पहिल्यांदाच, त्या अज्ञात व्यक्तीकडे पाहून त्याला वाटलं, “मी इथे काही काळ सुरक्षित आहे!” त्या अन्नाने शरीरात ऊर्जा परत आली होती. आता मन थोडं स्थिर झालं होतं. आजूबाजूचं जंगल, त्या गुहेचा अंधुकसा आडोसा आणि समोर बसलेली ती शांत पण गूढ व्यक्ती… या सगळ्याकडे पाहात तो युवक थोडा वेळ गप्प बसला. थोड्या वेळाने त्याने आजूबाजूचा कानोसा घेतला…
संगीता भिडे (कमल महाबळ) पुतळे असावेत की नसावेत, यावर विचार मांडण्यापूर्वी ‘पुतळा’ ही संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे, असं मला वाटतं. कोणता ना कोणता आदर्श समोर ठेवून प्रत्येक व्यक्ती आपलं जीवन जगत असते. मगे तो आदर्श कौटुंबिक, सामाजिक, राजकीय शैक्षणिक, अध्यात्मिक वा अन्य कोणत्याही क्षेत्रातील असू शकतो. यात काही भाग अनुकरणाचाही असतो. अगदी लहान मूलसुद्धा याला अपवाद ठरत नाही. म्हणूनच, एखादा चिमुरडा सहजपणे सांगतो, ‘मी मोठ्ठा झाल्यावर बाबांसारखा प्राध्यापक, डॉक्टर होणार आहे…’ तर एखादा सांगतो, ‘मला जयंत नारळीकर, सचिन तेंडुलकर व्हायचं आहे…’ एखादी मुलगी मोठ्या ऐटीत सांगते, ‘मी किरण बेदी होणार! लता मंगेशकर होणार!’ थोडक्यात, आमचे हे आदर्श आम्हाला आमच्यासमोर…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा मग म्हणे गा पार्था । ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥344॥ नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः । न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥16॥ जो रसनेंद्रियाचा अंकिला । कां निद्रेसी जीवें विकला । तो नाहीं एथ म्हणितला । अधिकारिया ॥345॥ अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी । आहारातें तोडी । मारुनियां ॥346॥ निद्रेचिया वाटा नवचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे । तें शरीरचि नव्हे तयाचें । मा योगु कवणाचा ॥347॥ म्हणोनि…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस चांगला जाईल. नशीब तुमच्यासोबत असेल. नफ्याच्या संधी सातत्याने वाढत जातील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. अनपेक्षित स्रोतांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तथापि, कोणताही निर्णय घेताना घाई करणे टाळावे, कारण त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. वृषभ – आजचा दिवस आर्थिक बाबतीत खूप चांगला असेल, पण ज खर्च नियंत्रणात ठेवावे लागतील. तुम्ही बनवलेल्या कोणत्याही योजना प्रभावी ठरतील आणि त्यात लक्षणीय यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत चांगला समन्वय साधता येईल. कौटुंबिक जीवनात सुरू असलेल्या सगळ्याच अडचणी आज संपतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मिथुन – आजचा दिवस…
नितीन फलटणकर आता कुठे सूर्याने ढगांच्या पल्ल्याड डोकवायला सुरुवात केली होती. सतत एनरजेटीक असलेला तो आज व्हिटामिन डी कमी झाल्यासारखा आळसावलेला, थकलेला वाटत होता. पावसाळा नसतानाही पावसाळी वातावरण होतं… हवेत गारवा होता. सकाळचे 7 वाजले असतील. मंदार बेडवरच सारखा कूस बदलत होता. रात्रभर त्याला झोप नव्हती. एकतर यामिनी (त्याची बायको) रात्री माहेरहून उशिराने आली होती अन् दुसरे म्हणजे रात्री एका अन्-नोन कॉलने त्याची झोप उडवली होती. तो कसाबसा डोळे चोळत उठला. बेडरूममध्ये जात त्याने यामिनी उठली का, हे पाहिले. ती झोपलेलीच होती. ती झोपताना सहसा चादर घेत नसे, पण आज तिच्या अंगावर चादर होती. पूर्णपणे ओढलेली. ती आईकडे गेली होती,…
मयुरेश गोखले आज सकाळपासून तिने श्रीरंगचं जाम डोकं खाल्लं होतं. फोनवर तिचा सारखा एकच विषय चालू होता, “श्री सांग ना रे… आपलं काही चुकत तर नाहीये ना? तुझं ठीक आहे रे, पण माझ्यासारखी मुलगी अशी कशी तुझ्यात गुंतत चालली आहे! का आणि कसं होतंय हे सगळं, काही कळत नाहीये! तुझी आठवण खेचतेय मला तुझ्याजवळ… श्री मी वाट तर चुकत नाहीये ना?” सकाळपासून फोनवर या प्रश्नांचा भडिमार श्रीवर सुरू होता. त्यांना भेटून जेमतेम वर्ष झाले असेल आणि ती श्रीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. श्रीरंगला सुद्धा ती आवडायला लागली होती. पण आज सकाळपासून तिला काय झालंय काही कळत नव्हतं. ‘मी तुझ्यासोबत वाट…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये वेगळ्या चवीची कोथिंबीरवडी, खुसखुशीत मेदूवडा, कुरकुरीत शेव बनवताना वापरावयाच्या काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी… हेही वाचा – Kitchen Tips : घरात पातळ पोहे पाहिजेतच… कॉर्नफ्लोअरचा असाही उपयोग (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
गजानन देवधर जपानी संस्कृतीबद्दल थोडंफार वाचलेलं होतं, त्यानुसार तिथली संस्कृती म्हणजे एखादं तलम रेशमी वस्त्रच जणू! प्रत्येक धाग्यात परंपरेचा स्पर्श, हळुवार सौंदर्य आणि शिस्तीचं वैभव… त्या वस्त्रातला एक मोहक आणि गूढ धागा म्हणजे गेशा… गेशा म्हणजे फक्त नृत्य-गायन करणारी स्त्री नव्हे. कला, संवादकौशल्य, वागण्यातील नाजूकपणा आणि व्यक्तिमत्वातील तेज, या सगळ्याच्या संगमातून घडलेली एक सजीव मूर्ती… लहानपणापासून या मार्गावर येणारी मुलगी आधी मायको म्हणून ओळखली जाते. शुभ्र चेहरा, लालसर ओठ, झगमगणारे केसांतील अलंकार, रंगीत किमोनो हे तिचं बाह्यरूप. पण त्यामागे असते कठोर शिस्त. चालण्यापासून पाहुण्यांशी गप्पा मारण्यापर्यंत प्रत्येक हालचालीत शिस्त रुजवली जाते. कविता, नृत्य, संगीत, चित्रकला, साहित्य या असंख्य कलांमध्ये वर्षानुवर्षे…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता । मा अनुभवें तल्लीनता । नव्हेल केंवी ॥331॥ म्हणऊनि एथ कांहीं । अनारिसें नाहीं । परी नावभरी चित्त देई । बोला एका ॥332॥ आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परि न शके करुं पांगु । योग्यतेचा ॥333॥ सहजें आंगिक जेतुली आहे । तेतुलियाची जरी सिद्धि जाये । तरी हाचि मार्गु सुखोपायें । अभ्यासीन ॥334॥ नातरी देवो जैसें…
दर्शन कुलकर्णी दत्त जयंती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला आणि खूप शुभ असेल. मन आनंदी असेल आणि कष्टाचे फळ मिळेल. प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभामुळे मोठी रक्कम मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेच्या विक्रीतूनही मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. वृषभ – कामाच्या ठिकाणी कोणतेही काम संयम आणि शांततेने करावे लागेल. व्यावसायिकांचा दिवस सामान्य राहील. अनेक योजनांपैकी एखादी योजना आज पुढे सरकेल, ज्याचे भविष्यात महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च होऊ शकतो. काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील. अन्यथा नुकसान होऊ शकते, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. मिथुन – आजचा…
