Author: Team Avaantar

प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष हा आठवडा तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढवणारा आहे. आर्थिक प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. कुटुंबातील सगळ्यांबरोबर वेळ घालवू शकाल. तब्येतीची काळजी घ्या, पथ्य पाळा. महिलांनी मुलांना समजून घ्यावे, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील, प्रामाणिक प्रयत्न करा. ​वृषभ या आठवड्यात आर्थिक लाभ आणि मानसिक समाधान मिळू शकेल. व्यवसायात प्रगती होईल. नवीन मित्र आणि ओळखीने फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. प्रवास करावा लागेल. संयम आणि सकारात्मक धोरण ठेवावे लागेल. या राशीच्या महिलांच्या मैत्रिणींबरोबर भेटीगाठी होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात शिस्त बाळगावी, यश नक्की मिळेल. मिथुन या आठवड्यात उत्तम घडामोडी…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा देवान् भावयतानेन ते देवाः भावयन्तु वः । परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यय ॥11॥ जें येणेंकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां । मग ते तुम्हां ईप्सिता । अर्थांतें देती ॥95॥ या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥96॥ तुम्हीं देवतांतें भजाल । देव तुम्हां तुष्टतील । ऐसी परस्परें घडेल । प्रीति जेथ ॥97॥ तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल । तें आपैसें सिद्धी जाईल । वांछितही पुरेल । मानसींचें…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 सप्टेंबर 2025; वार : रविवार भारतीय सौर : 30 भाद्रपद शके 1947; तिथि : अमावास्या 25:23; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 09:31 योग : शुभ 19:52; करण : चतुष्पाद 12:46 सूर्य : कन्या; चंद्र : सिंह 15:57; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:36 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 सर्वपित्री दर्श अमावास्या अमावास्या श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – दांडूमारम्मा मंदिर…  वर्षातून फक्त नवरात्रीतच होते देवीची पूजा! दिनविशेष चतुरस्त्र गायक, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी टीम अवांतर चतुरस्त्र…

Read More

प्रदीप केळुस्कर जनाबाईला सतीश सांगत होता, “सुरेशचो फोन इल्लो… दहा तारखेक तो मुंबईत उतारतलो, दोन दिवस तेची मुंबईत कामा करून बारा तारखेक चिपी विमानतळावर उतरून हय येतलो, मग परत पंधरा तारखेक तुका घेऊन चिपीवरून मुंबई आणि त्याच रात्री अमेरिकेक जाऊची तिकिटा काढल्यानं तेनी…” जनाबाईने डोक्याला हात लावला. “आता या वयात माका अमेरिकेक न्हेता, माका प्रवास जमतलो रे… माजी ऐंशी सरली…” “पण तू हय एकटी रावतास, तेची काळजी वाटता तेका, आते…” “अरे, पण मी तुज्याकडे रवलंय असतंय, तुजा घर म्हणजे माजा माहेर न्हय! …आणि माजो भाऊस म्हणजे तुजो बापूस अजून हयात आसा ना!!” “होय गे आते, पण सुरेश ऐकणा नाय… मी…

Read More

रविंद्र परांजपे मागील तीन लेखात आपण आरोग्य हीच खरी धनसंपदा होय आणि निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा तसेच वेळ काढण्याची नितांत गरज आहे, हे ध्यानात घेतले. या लेखात आपण ‘निरामय आरोग्यासाठी पैशाचा यथायोग्य विनियोग आवश्यक’ या मुद्द्याविषयी जाणून घेणार आहोत. वास्तविक आपण सर्व जण अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तसेच शिक्षण, मनोरंजन आणि इतर अनेक बाबींवर पैसे खर्च करत असतो. परंतु याबरोबरच आपण आरोग्य या जीवनावश्यक बाबीवर खर्च करत नाही. या विधानाला काही अपवाद असतील, पण ते तुलनेने कमी आढळतील. शिवाय, आरोग्यावरील खर्च एकूण खर्चाच्या तुलनेत देखील नक्कीच कमी प्रमाणात दिसून येतो. हे वाचल्यावर आपल्याला जरा विचित्र वाटेलही कारण…

Read More

हर्षा गुप्ते झिरकसाठी साहित्य भाजून सोललेले शेंगदाणे – अर्धी वाटी भाजलेल सूके खोबर – 2 टेबलस्पून तीळ – 1 चमचा हिरव्या मिरच्या – 4 लसूण – 15 पाकळ्या कढीपत्ता –  10 पाने कोथिंबीर – 1 वाटी हिंग – चिमुटभर मोहरी – 1 लहान चमचा जिरे – 1 लहान चमचा तेल – फोडणीसाठी मीठ – चवीनुसार पुरवठा संख्या –  4 व्यक्तींसाठी एकूण वेळ – 15 मिनिटे कृती शेंगदाणे, सुक खोबरं आणि तीळ पाणी न घालता वाटून घ्यावे आणि ते बाजूला ठेवावे. मिरच्या, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता, थोडे मीठ आणि पाणी घालून वाटून घ्या. पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे यांची फोडणी…

Read More

शशी सामंत फार फार वर्षांपूर्वी एका नवीनच ओळख झालेला मित्राच्या गिरगावातल्या घरी गेलो होतो. थोड़ी ओळख झाल्यावर त्याच्या आईने विचारले, “काय रे, चहा घेतोस ना?” मी चटकन ‘नाही’ म्हणालो. तर ती म्हणाली, “घरी तरी नेहमी घेतोस ना! आमच्याकडे का नको?… घे आता, मी आणते…” या आग्रहाला माझ्याकडे काही उत्तर नव्हते. आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांकडे वेगळे द्यायला आणखी काय असणार? चहाच! घरी दिवसाला दोन वेळा चहा पिणे, हे आमच्या घरातले आद्य कर्तव्य होते. सकाळच्या चहाबरोबर खारी-बिस्कीट, लोणी लावलेला बुरूनपाव चहात बुडवून खाल्ला तर, तो नाश्ता म्हणून ओळखायला हरकत नव्हता. दुपारच्या चहामध्ये पण काही तरी बुडवायला असायचे, निदान पुढील दोन तास तरी पोटात काही…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा पार्था आणीकही एक । नेणसी तूं हें कवतिक । जें ऐसें कर्म मोचक । आपैसें असे ॥79॥ देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥80॥ यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः । तदर्थ कर्म कौन्तेय मुक्तसङ्ग समाचर ॥9॥ स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां । म्हणोनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥81॥ हा निजधर्मु जैं सांडे । कुकर्मी रति घडे । तैंचि बंधु…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 20 सप्टेंबर 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 29 भाद्रपद शके 1947; तिथि : चतुर्दशी 24.16; नक्षत्र : मघा 08:05 योग : साध्य 20:05; करण : विष्टी 11:53 सूर्य : कन्या; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:37 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 चतुर्दशी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. मात्र कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. व्यापार उद्योगात नव्या योजना तयार करताना त्या…

Read More

लीना जोशी परुळेकर मेकअप (Make-up) हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. आपण रोजच्या रोज पूर्ण Make-up नाही केला तरी, lipstick चा वापर नक्कीच करतो. Make up मुळे आपल्या सौंदर्यात आणखी भर पडते. व्यक्तिमत्व अधिक खुलते. सणासुदीला, लग्नकार्यात साग्रसंगीत केलेला Make – Up सौंदर्य अधिक खुलवतो. आजकाल Online Portal वर कित्येक make-up tutorial आढळतात. त्यात आपल्याला उत्तमोत्तम Make up उत्पादनांची माहिती प्रात्यक्षिकाबरोबर बघायला मिळते. Make-up ही एक कला आहे, त्यामुळे ती जमण्यासाठी थोड्याफार प्रमाणात का होईना सरावाची गरज असते. Make-up करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काही basic गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. जसे की, चेहऱ्याचा आकार, त्वचेचा रंग, कुठल्या कारणासाठी…

Read More