Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 01 आश्विन शके 1947; तिथि : द्वितीया 28:51; नक्षत्र : हस्त 13:39 योग : ब्रह्मा 20:22; करण : बालव 15:50 सूर्य : कन्या; चंद्र : कन्या 26:55; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:34 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज मिळणाऱ्या संधींमध्ये वाढ होईल. दिवसभर अनेक शुभ आणि सकारात्मक बातम्या मिळतील. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. कामावर एखादी अशी नवीन जबाबदारी…
पराग गोडबोले शाळेत असताना एक नियम होता, डब्यात रोज पोळी-भाजीच हवी असा! कोण हे नियम बनवतात कोणास ठाऊक? पण होता. मधेच कधीतरी बाई डबा तपासायच्या आणि पोळी भाजी नसेल तर रट्टा मिळायचा. कधीकधी डबा न तपासतासुद्धा बाई हाक मारायच्या आणि विचारायच्या. आज डब्यात काय होतं? च्या मारी, त्या दिवशी नेमका डबा नसायचा आणि आईने वडापाव खायला पैसे दिलेले असायचे… ‘खरं सांग. खोटं बोललास तर, दोन पट्ट्या आणखी खाव्या लागतील…’ नक्कीच कोणीतरी बाईंकडे चुगली केलेली असायची… “बाई बाई, आज ना त्याने डबा नव्हता आणला… गपचूप वडापाव जाऊन खाऊन आला…” बाईंचे ‘चष्मिष्ट’ खबरी बाईंना बित्तंमबातमी पोहोचवायचे. असे तीन-चार होते, त्यामुळे कोणाला धरून…
रश्मी परांजपे मागील लेखात आपण ‘विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी’ या विषयाची सुरुवात प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी या मुद्द्यापासून केली. या लेखात आपण प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी याबाबत जाणून घेणार आहोत. शालेय वर्ष जूनमधे सुरू होते आणि प्रवेशप्रक्रिया साधारणतः जानेवारी / फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. शाळेत एकंदर किती प्रवेश द्यायचे हे ठरवले जाते आणि त्यापैकी बरेच प्रवेश एप्रिल महिन्यात पूर्ण होतात. प्रवेशाच्या काही जागा राखून ठेवाव्या लागतात. अशा जागा तसेच नियोजित प्रवेश संख्येतील उर्वरित जागा यांचे प्रवेश शाळा सुरू होण्याच्या वेळेस पूर्ण केले जातात. एप्रिल महिन्याच्या अखेरीस प्रवेश पूर्ण झालेल्या मुलांच्या पालकांना माहितीपत्रक घेण्यासाठी बोलवावे लागते. आता आपण माहितीपत्रकात कोणते मुद्दे असणे आवश्यक आहे,…
कामिनी व्यवहारे साहित्य बटाटे – अर्धा किलो सुके खोबरे (किसलेले) – पाव वाटी आले – 1 इंच हिरव्या मिरच्या – 3 ते 4 लाल तिखट – पाव चमचा खसखस – 1 चमचा धणे – 1 चमचा काळीमिरी – 4 ते 5 दाणे लवंगा – 3 ते 4 मसाला वेलची – 2 दालचिनी – छोटा तुकडा तूप – 1 चमचा दही – पाव वाटी साय किंवा क्रीम – पाव वाटी तुकडा काजू – 10 ग्रॅम केशर – 3 ते 4 काड्या कांदा – 1 दूध – 1 छोटा चमचा मीठ – चवीप्रमाणे हेही वाचा – Recipe : सात्विक पंचामृत केक कृती बटाट्याची…
माधवी जोशी माहुलकर नवरात्र म्हणजे आनंद, भक्ती, शक्ती, समर्पण, शांती, श्रद्धा, आस्था, उत्साह, सृजन… या नवरसांचे उधाण! पितृपक्षाचे पंधरा दिवस संपले की, आदिमायेचा हा जागर संपूर्ण भारतात भक्तिमय वातावरणात पार पाडतो. नवरात्राचे हे नऊ दिवस नवनवीन संकल्प, सिद्धी पूर्णत्वास नेण्याचे दिवस! या नऊ दिवसांत आदिमायेच्या विविध रुपांचा संचार सर्वत्र दिसून येतो. या नऊ दिवसांच्या उत्सवात देवीच्या शक्तिपीठांमध्ये त्या जगद्जननीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून भक्तजनांच्या अलोट गर्दीचा पूर आलेला दिसतो. अलीकडच्या काळात तर नवरात्रीचा हा उत्सव साजरा करण्याचे नवनवीन ट्रेण्ड दृष्टीस पडतात. त्यातील एक म्हणजे नऊ रंगाचे नऊ दिवस… त्याप्रमाणे कपडे परिधान करणे! मला आठवते त्याप्रमाणे साधारणपणे विसेक वर्षांपूर्वी नऊ दिवसांच्या…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा मग सकळ दोष भंवते । गिंवसोनि घेती तयातें । रात्रिसमयीं स्मशानातें । भूतें जैशीं ॥113॥ तैशीं त्रिभुवनींचीं दुःखें । आणि नानाविधें पातकें । दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे ॥114॥ ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापां रुदतां । परी कल्पांतींही सर्वथा । प्राणिगण हो ॥115॥ म्हणऊनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रियें बरळों नेदावीं । ऐसें प्रजांतें शिकवी । चतुराननु ॥116॥ जैसें जळचरा जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 सप्टेंबर 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 01 आश्विन शके 1947; तिथि : प्रतिपदा 26:55; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 11:23 योग : शुक्ल 19:58; करण : किंस्तुघ्न 14:06 सूर्य : कन्या; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:35 पक्ष : शुक्ल; मास : अश्विन; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 शारदीय नवरात्रारंभ घटस्थापना वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणावाचे मळभ असेल. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट नियोजन करा. कुठलेही…
डॉ. किशोर महाबळ नव्या पिढीतील लक्षावधी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी दरवर्षी शाळेत मोठ्या उत्साहाने तसेच उमेदीने येतात. हे सर्वचजण कोणत्याना कोणत्या असामान्य अशा निसर्गदत्त क्षमतेने संपन्न असतात. बुद्धिमत्ता, क्षमता, कला, कौशल्ये, अनुभव, आकलन, समजूतदारपणा, शहाणपण याबाबतीत सर्वचजण वेगळे आहेत. प्रतिकूल आर्थिक आणि सामाजिक वातावरणातून येणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांमध्ये तर काही वेगळेच असामान्य गुण असतात आणि म्हणूनच तर, ते सर्व समस्यांचा सामना करीत शिकण्यासाठी शाळेत येतात. या सर्वांच्यात प्रकर्षाने कोणता ना कोणता तरी एक किंवा अनेक गुणही असतात. मुख्य म्हणजे, या साऱ्याजणांना आपल्यातील या सर्व गुणांपैकी, क्षमतांपैकी कोणत्यातरी एका गुणाचे, क्षमतेचे वर्गात आणि शक्य झाले तर, शाळेतील सर्वांसमोर वर्षांत एकदातरी कौतुक होईल,…
यश:श्री मनुष्य हा सुरुवातीपासूनच प्राणीमित्र. मंदिराच्या कोरीव कामात, विविध उत्खननात तसेच विविध लेण्यांमधील चित्रांमध्ये याचा प्रत्यय येतो. आजही कुत्रे, मांजरी, पक्षी, मांजरे पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण लहानापासून थोरांपर्यंत सर्वांना आकर्षण असते ते हत्तीचे! या अजस्त्र प्राण्यालाही मानवाने अंकित केले आहे. या हत्तींचे पालन राजेमहाराजांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात होत असे. हत्तीवरील अंबारीतून राजेमहाराजे फिरत असत. त्याचप्रमाणे युद्धातही याचा वापर केला जात असे. थोर विदुषी दुर्गा भागवत यांचा हत्तीसंदर्भातील एक लेख अलीकडेच वाचनात आला. त्यात त्या म्हणतात, हत्तीचा मोठा आकार, युद्धातील त्याचे शौर्य आणि त्याच्या देखभालीसाठी येणारा प्रचंड खर्च पाहता, त्याकाळी ते केवळ सरदार आणि राजेमहाराजांच्या अखत्यारित असत. त्यातही पांढरा…
माधवी जोशी माहुलकर नागपूरचा तर्री पोहा हा आता इतका प्रसिद्ध झाला आहे की भल्या भल्या शेफ मंडळींचे कुतुहल या डीशने वाढवले आहे. सुप्रसिद्ध शेफ रणजित ब्रार हे नागपूरात येऊन गेले तेव्हा त्यांनाही या तर्री पोह्याने भुरळ घातली. त्यांनी याची चव चाखली आणि ते या तर्री पोह्याच्या प्रेमातचं पडले व लगेचचं आपल्या किचनमधे त्यांनी या तर्री पोह्याचा सफल प्रयोग केला. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तर्रीपोहा जास्त प्रसिद्ध आहे. तर्री पोहे करताना पोहे नेहमीप्रमाणेच करायचे, पण तर्रीवर विशेष लक्ष द्यायचे. यामध्ये तर्री महत्त्वाचा घटक आहे. तर्रीसाठी साहित्य गावरान चणे / हरभरे – 1 वाटी (रात्रभर भिजवलेले) मोठा कांदा –…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
