Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 सप्टेंबर 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 03 आश्विन शके 1947; तिथि : तृतीया 07:05; नक्षत्र : स्वाती 19:07 योग : वैधृती 21:52; करण : वणिज 20:17 सूर्य : कन्या; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:32 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 विनायक चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – भावंडांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण असतील आणि घरातील वातावरण आनंददायी असेल. एखादा महत्त्वाचा प्रवास दौरा होण्याची शक्यता आहे, जो फायदेशीर ठरेल. विद्यार्थी त्यांच्या…
प्रदीप केळुस्कर भाग – 3 आपला दोन नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्यामागे कसे होईल, याची केशवराव यांना काळजी वाटे. मोठा मोहन अभ्यासात हुशार होता. सीए झाला आणि मोठा सरकारी ऑफिसर बनला. केशवराव गेल्यावर तेराव्या दिवशी नाडकर्णी वकिलांनी मोहन आणि वसंताला मृत्यूपत्र वाचून दाखवलं. त्यानुसार राहते घर मोहन आणि वसंत यांच्या नावावर तर, गावातील 32 गुंठे जमीन आणि त्यावरील 26 आंब्याची कलमे, 20 काजूची झाडे तसेच 10 गुंठे भातशेती जमीन फक्त वसंत याच्या नावावर ठेवली होती. त्यावरून मोहन आणि त्याची पत्नी आशा यांनी वसंता याच्यावर तोंडसुख घेतले. त्यावेळी त्यांची बहीण यशोदाने वसंताची पाठराखण केली. घरातून रागात बाहेर पडलेले मोहन आणि आशा…
सुनील शिरवाडकर अलीकडचीच गोष्ट. एक तिशीचा तरुण दुकानात आला. चांदीचा ताईत त्याला हवा होता. एक ताईत घेतला त्याने. सहजच चौकशी केली, कशासाठी वगैरे… त्याने जे सांगितलं, त्यानं अचंबित झालो! हिरावाडीमध्ये रहात होता तो. पूर्वी कुठेतरी भद्रकालीत राहायचा… त्यांचा जुना वाडा आहे तिथे. शेजारी काका-काकूंचे घर… म्हणजे तेही घरचेच! त्यांच्याकडे खायला-प्यायला हे तिघे भाऊ जात. काका-काकूंची मुलेही यांच्याकडे येत. तर, यांचा असा समज की, ती काकू आपल्या वाईटावर आहे. कोणी आजारी पडले की… त्या काकूनेच काहीतरी ‘करणी’ वगैरे केली… हे डोक्यात फिटट्! ते घर सोडून आता हिरावाडीत रहातात. “मग आता काय त्रास होतो तुला?” मी विचारले. “त्या काकूनेच काहीतरी केलंय… अंगात…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा म्हणून समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु । नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥139॥ तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी ॥ जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥140॥ तें जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ । जैसें कां अभ्रपटळ । अकाळींचें ॥141॥ कां गळा स्तन अजेचे । तैसें जियालें देखें तयाचें । जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥142॥ म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणे न संडावा ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 सप्टेंबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 02 आश्विन शके 1947; तिथि : तृतीया अहोरात्र; नक्षत्र : चित्रा 16:15 योग : ऐंद्र 21:01; करण : तैतिल 17:56 सूर्य : कन्या; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:33 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी कष्टाचे फळ मिळेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडाल. कुटुंबाशी समन्वय सुधारेल आणि जुने मतभेद दूर होऊ…
डॉ. अस्मिता हवालदार ‘बोल माधवी’ हे चंद्रप्रकाश देवल यांच्या ‘बोलो माधवी’ या दीर्घकाव्याचा अनुवाद आहे. काव्याचा अनुवाद करण्याचे कठीण काम आसावरी काकडे यांनी समर्थपणे केले आहे. मी हे पुस्तक वाचलं तेव्हा माधवी कोण? मला माहीत नव्हतं. ‘माधवी’ ही ‘गालव आख्याना’ची नायिका आहे. मला पुस्तक वाचावेसे वाटले ते मुखपृष्ठावरील चित्रामुळे! मुखपृष्ठावर ठकीचे चित्र फार बोलके आहे. ठकी म्हणजे पूर्वीची लहान मुलींची लाकडाची बाहुली… या ठकीचा उपयोग अनेक कामांसाठी व्हायचा… अगदी जात्याची खुंटी म्हणून सुद्धा! ठकी असलेल्या माधवीच्या ओठावर पट्टी आहे, हात जोडलेले आहेत, अर्ध्या बाजूवर काळोख आणि अर्धी बाजू उजळलेली, बाजूला तिच्या अस्पष्ट होत जाणाऱ्या प्रतिकृती… गालव आख्यान महाभारताच्या उद्योगपर्वात आलेले…
सतीश बर्वे मित्रासोबत त्याच्या वडिलांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी मुंबईमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नंबर येण्याची वाट बघत होतो. अचानक पलिकडे दोन-तीन ओळी सोडून एका आरामदायी खुर्चीवर ती बसलेली दिसली… माझ्या मित्राने खांद्यावर हात ठेवून विचारले, “काय बघतोयस एवढा निरखून?” मी समोर हात करून त्याला खूण केली आणि आमच्या दोघांच्या तोंडून एकच नाव बाहेर पडले… “केतकी!” आम्ही दोघांनीही एकमेकांकडे दचकून बघितलं… कारण रुमाल बांधून तिचं डोकं झाकलं होतं. क्षण दोन क्षण असेच गेले… तेवढ्यात कशी काय कोण जाणे, पण तिची अन् आमची नजरानजर झाली. तिने खुणेनेच आम्हाला बोलावलं. स्तंभित होऊन आम्ही तिच्याजवळ गेलो. तिने खुणेनेच आम्हाला शेजारच्या खुर्चीवर बसायला सांगितले. आम्ही काही…
हर्षा गुप्ते मंगोडी चाट पुरवठा संख्या – दोन व्यक्तींसाठी एकण कालावधी – साधारणपणे 1 तास साहित्य मूगडाळ – अर्धी वाटी उडीदडाळ – अर्धी वाटी हिरवी मिरची – 2-3 (आवश्यकतेनुसार) आलं – 1 इंच लसूण – 5 – 6 पाकळ्या चिरलेली कोथिंबीर – मूठभर कांदा – 1 मोठा (बारीक चिरलेला) जिरे – 1 लहान चमचा काळीमिरी – 1 लहान चमचा पुदिना चटणी – 1 वाटी चिंचेची चटणी – 1 लहान वाटी दही – 1 वाटी (मीठ घातलेले) शेव – 1 वाटी तेल – तळणासाठी हळद – 1 लहान चमचा मीठ – चवीनुसार हिंग – चिमुटभर कृती मूगडाळ आणि उडीदडाळ अर्धा तास…
चंद्रकांत पाटील बी. के. सर राहुरी कृषी विद्यापीठातून मोठ्या पदावरून निवृत होऊन पुण्यातील कोरेगाव पार्कमधील आलिशान फ्लॅटमध्ये स्थायिक झाले होते. सरांना एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांचीही लग्ने होऊन परदेशात सेटल झाली होती. मॅडम् जवाहर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झालेल्या… दोघांनाही चांगल्यापैकी पेंन्शन चालू होती. मुलाने इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेल्या फ्लॅटचे भाडे येत होते. पोस्टातील गुंतवणुकीच्या इंटरेस्ट व्यतिरिक्त शेतीतून उसाचे पैसे मिळत होते. गावाकडे दहा एकर पानथळ जमीन पुतण्या सांभाळीत होता. एकंदरीत सगळे व्यवस्थित चालले होते… पण अलीकडे त्यांच्या आणि मॅडमच्यां तब्बेतीच्या तक्रारी वाढल्या होत्या आणि सर्वांचे कारण ‘भेसळ’ असल्याचा शोध सरांनी लावला होता. भेसळीचे दूध, दही, तेल, तूप, कीटकनाशके मारलेल्या…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा जें देहचि आपणपें मानिति । आणि विषयांतें भोग्य म्हणती । यापरतें न स्मरती । आणिक कांहीं ॥127॥ हे यज्ञोपकरण सकळ । नेणतसांते बरळ । अहंबुद्धी केवळ । भोगूं पाहती ॥128॥ इंद्रियरुचीसारखे । करविती पाक निके । ते पापिये पातकें । सेविती जाण ॥129॥ जे संपत्तिजात आघवें । हें हवनद्रव्य मानावें । मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषीं ॥130॥ हें सांडोनिया मूर्ख । आपणपेंयांलागीं देख । निपजविती पाक । नानाविध ॥131॥ जिहीं यज्ञु…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
