Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
सौरभ वैशंपायन इतिहास अभ्यासक मानवी मनाला कायमच इतिहासाची आवड असते. मराठी मातीला तर श्री शिवछत्रपती, शंभूछत्रपती, बाजीराव पेशवे अशा अनेक महापुरुषांचा इतिहास लाभलेला आहे. हा इतिहास जपायला हवा. पण तो जपायचा कसा? महापुरुषांची जयंती- पुण्यतिथी साजरी करण्याच्या नावाखाली चंद्रकोर, टॅटू, बाइक रॅली, घोषणा, मंडप घालून मोठमोठ्यांनी लावलेली गाणी, घशाच्या नसा ताणून भावनिक आणि तर्कशून्य, संदर्भहीन भाषण देणारे वक्ते… याने हा इतिहास जपला जाईल का? इतिहास जपण्यासाठी तीन गोष्टींची सर्वाधिक गरज आहे – संशोधन, संवर्धन आणि मांडणी. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी कुणीतरी दारोदार वणवण भटकून, अर्धपोटी राहून इतिहासाची प्रचंड साधने शोधली, त्यांच्यावरची धूळ – वाळवी झटकली, वर्षानुवर्षे मेहनत करून ती संगतवार लावली. अत्यंत…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत, किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – हेही वाचा – Kitchen Tips : कढीपत्त्याची चटणी, कोकम सार… हेही वाचा – Kitchen Tips : कांद्याची पेस्ट, वाटणाच्या वड्या अन् खोबऱ्याचा किस… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा एर्हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन । परि तें असो आइकें चिन्ह । प्राप्ताचें गा ॥92॥ कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥18॥ जो सकळकर्मीं वर्ततां । देखे आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगे निराशता । फळाचिया ॥93॥ आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी । बोधला असे ॥94॥ परि क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तरी…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – रणांगण… काळाची बंधने नाकारणारी साहित्यकृती दिनविशेष कवयित्री, गीतकार शांता शेळके टीम अवांतर मराठीतील ख्यातनाम लेखिका, कवयित्री, अनुवादक आणि गीतकार शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला. लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपरिक गीते, ओव्या, श्लोक शांताबाईंच्या कानावर पडत. त्यामुळे कवितेची आवड, वाचनाची आवड, त्या संस्कारक्षम वयात त्यांच्यात रूजत गेली. बी.ए. झाल्याबरोबर ‘मुक्ता आणि इतर गोष्टी’ नावाचा त्यांचा एक कथासंग्रहही प्रसिद्ध झाला. याला प्रा. श्री. म. माटे यांनी प्रस्तावना लिहिली. एम्.ए. झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक मासिकात, नंतर नवयुग या अत्रे यांच्या साप्ताहिकात आणि दैनिक मराठात दोन-तीन वर्षे काम केले. विविध प्रकारच्या…
डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ आपण अनेकदा “माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय!” असं ऐकतो आणि लगेचच घाबरतो. पण खरं पाहिलं तर, कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरातील एक अत्यावश्यक घटक आहे, जे प्रत्येक पेशीच्या निर्मितीत आणि अनेक महत्त्वाच्या क्रियांमध्ये सहभागी असते. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झालं, तर ते हृदयविकारासारख्या अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतं; पण योग्य प्रमाणात असलेलं कोलेस्ट्रॉल आपलं आरोग्य टिकवून ठेवतं. म्हणूनच, कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? त्याचे शरीरावर काय परिणाम होतात? ते कशामुळे वाढते? ते नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? हे जाणून घेणे आजच्या काळाची गरज आहे. कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरातील एक प्रकारचा लिपिड (चरबीसारखा पदार्थ) आहे, जो यकृतात (liver) तयार होतो.…
रविंद्र परांजपे निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी आपण मागील लेखात दिनचर्येपासून मार्गदर्शनाचा श्रीगणेशा केला. दिवसाची सुरुवात सकाळी लवकर उठून केल्यास त्याचे मिळणारे फायदे देखील आपण जाणून घेतले. पूर्वापार प्रचलित असलेल्या उक्तीचे आपण पुन्हा स्मरण करूया. लवकर निजे, लवकर उठे, तयास ज्ञान, सुख, शांती, आरोग्य, धनसंपदा लाभे. या उक्तीची सुरुवात रात्री लवकर झोपावे, अशी आहे. या लेखात आपण लवकर झोपण्याविषयी माहिती घेऊया. रात्री लवकर झोपणे दररोज रात्री वेळेवर झोपणे महत्त्वाचे आहे. साधारणपणे रात्री 9:30 ते 10 या दरम्यान झोपी जावे. रात्री 10 वाजेपर्यंत कफाचा काळ असल्याने त्या वेळेपर्यंत झोपणे निरामय आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच हितावह असते. फार दिवसांपूर्वी मी रात्री लवकर झोपण्याविषयी…
माधवी जोशी माहुलकर आज खूप दिवसांनी हंडीतला मसूर पुलाव केला. कधी कधी घरी एकटं असलं की, माझ्या आवडी निवडीनुसार स्वयंपाक करत असते. रोजच्या रामरगाड्यातून वेळ काढावाच लागतो कधी कधी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी, नाही का? मसूर पुलाव मला विशेष आवडतो. करायला सोपा आणि वन पॅाट मिल म्हणून बेस्ट आहे. साहित्य हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात कृती हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… मिरचीची भाजी- भाकरी टीप्स
दीपक तांबोळी भाग -2 सरकारी नोकरीतील 39 वर्षांच्या सेवेनंतर मकरंद कापडे निवृत्त झाला. कोरोना काळातच निवृत्त झाल्याने केवळ पाच जणांच्या उपस्थितीत त्याचा निरोप समारंभ झाला. जड अंत:करणाने तो घरी आला. त्याच्या हाताखालच्या एकाही इंजीनियरने त्याची भेट घेतली नव्हती किंवा साधा फोनही केला नव्हता. इतकं सगळ्यांशी चांगलं वागूनही लोकांनी साध्या शुभेच्छा देण्याचंही सौजन्य दाखवलं नव्हतं. काय कारण असेल? असा तो विचार करत होता. “साहेब सूर्यवंशी साहेब आलेत…” मुरली म्हणाला. तशी त्याची तंद्री भंगली. त्याने दाराकडे पाहिलं, सूर्यवंशी हातात बुके घेऊन उभा होता. “या, या, सूर्यवंशी!” सूर्यवंशी चेहऱ्यावर मोठं हसू घेऊन आत आला. “सॉरी साहेब, आज आपल्या ऑफिसमधला एक जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे…
हिमाली मुदखेडकर पुण्यात पाषाण आणि बाणेरच्या मधे सोमेश्वर वाडी नावाचे ठिकाण आहे. इथे साधारण 900 वर्षे जुने सोमेश्वर महादेवाचे एक खूप सुंदर हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराचा परिसर भव्य असून अतिशय सुबक असे नक्षीकाम केलेले दगडी बांधकाम आहे. येथील शिवलिंग स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. मुळा नदीची उपनदी असणार्या राम नदीच्या काठावर हे मंदिर आहे. मंदिराला चार प्रवेश द्वार असून मुख्य प्रवेशद्वारा समोर एक भव्य चाळीस फूट उंचीची दीपमाळ आहे. दगडी कोरीवकाम असणारी एक भिंत सभोवताली असून तिच्या एका कोपर्यात एक छान गॅलरी आहे. त्या गॅलरीत मोडी लिपीतील जुनी पत्रे, चित्रे, काही खास छायाचित्रे जतन करून ठेवली आहेत. मंदिरात ठिकठिकाणी स्मरण शिळा……
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः । कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥15॥ मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐशियाचि जाणोनि मातें । कर्मे केलीं समस्तें । धर्नुधरा ॥82॥ परी तें बीजें जैसीं दग्धलीं । नुगवतीचि पेरलीं । तैशीं कर्मेंचि परि तयां जाहली । मोक्षहेतु ॥83॥ एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना । आपुलिये चाडे सज्ञाना । योग्य नोहे ॥84॥ किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः । तत् ते…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 249
- अवांतर 175
- आरोग्य 92
- पंचांग आणि भविष्य 363
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 186
- मैत्रीण 17
- ललित 514
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
