Author: Team Avaantar

पराग गोडबोले हे माझं दरवर्षीचंच आहे… दसरा संपून, दिवाळीची चाहूल लागायला लागली की, मला फराळाच्या पदार्थांची आठवण यायला सुरुवात होते. तसे हे पदार्थ हल्ली अगदी बाराही महीने मिळतात, पण सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी प्रसादाचा शिरा जसा जास्त चविष्ट लागतो, तसा दिवाळीत फराळ अंमळ जास्तच रुचकर असल्याचं जाणवतं… हा माझा कायमचा अनुभव! वाण सामानाची यादी करून ती नेऊन देणे हे काम मी चोख करतो. अर्थात, ती सांगते आणि मी लिहून घेतो. तिच्यापेक्षा माझं हस्ताक्षर वाण्याला नीट कळतं, असा तिचा ग्रह आहे. हस्ताक्षर स्पर्धेत कधी उत्तेजनार्थ पारितोषिकही न मिळालेला असा मी अन् माझं अक्षर जर छान असेल, तर तिचं कसं असेल याची तुम्ही…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा श्रीभगवानुवाच : अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः । स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥1॥ आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनानें झणीं मानी । एऱ्हवी विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ॥39॥ सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगी तोचि संन्यासु । पहातां ब्रह्मीं नाही अवकाशु । दोहींमाजी ॥40॥ जैसें नामाचेनि अनारिसपणें । एका पुरुषातें बोलावणें । कां दोहीं मार्गीं जाणें । एकचि ठाया ॥41॥ ना तरी…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. परंतु आपला प्रभाव कमी होईल, असे काही कृत्य घडणार नाही, याकडे लक्ष द्या. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रकृती चांगली राहील. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. वृषभ – सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. मिथुन – पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत बचतीचे पैसे गुंतवलेत तर फायदा होईल. नोकरदारांनी कामावर लक्ष…

Read More

यश:श्री स्मार्टफोन हाती आल्यापासून काही जुन्या गोष्टींनाही उजाळा मिळत आहे. अलीकडेच अभिनेता अमजद खान याच्या एका मुलाखतीची क्लिप पाहायला मिळाली. चित्रपटांच्या यशाबद्दल त्याला विचारले असता, “कोणता चित्रपट चालेल हे सांगता येत नाही. पण कुत्रा, मांजर, साप यांचे चित्रपट मात्र चालतात…” अशा आशयाचे उत्तर त्याने दिले. वास्तवात, असे चित्रपट चालल्याची अनेक उदाहरणे आहे. त्यातही चित्रपटाला हमखास यश देणारे प्राणी म्हणजे, कुत्रा, घोडा, नाग-नागिण आणि हत्ती! ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटाच्या यशामध्ये मोठा वाटा त्यातील हत्तींचा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातही युद्ध असो की मनोरंजन हत्तीचे महत्त्व कायम राहिले आहे. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी एका लेखात हत्तीच्या मृत्यूबद्दलचा उल्लेख केला…

Read More

डॉ. किशोर महाबळ वर्गात नियमित येणारी, गृहपाठ नियमित करणारी एक मुलगी एक दिवस गृहपाठ न करताच शाळेत आली. शिक्षिकेला आश्चर्य वाटले आणि तिने त्या मुलीला कारण विचारताच त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली की, “काल रात्री मी अभ्यास करायला बसले. आमच्या झोपडीत एकच दिवा आहे. बाबा दारू पिऊन घरी आले आणि रागाने त्यांनी तो दिवाच फोडून टाकला व त्यामुळे मला गृहपाठ करता आला नाही!” नागपूर महानगरपालिकेच्या एका शाळेतील एका मुलीचा हा अनुभव आहे. यासारखे असंख्य चांगले-वाईट अनुभव सर्व समाजघटकांतील, शालेय स्तरावरील मुलामुलींना रोज येत असतात. या अनुभवातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. आपले आईवडील, शिक्षक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि समाजातील…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : इडली ढोकळा, फिंगर चिप्स अन् बटाटेवडे… हेही वाचा – Kitchen Tips : दहीवडा, सँडविचची चटणी अन् रगडा पॅटीस बनवताना हे करून पाहा (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराची कुरोंडी । तेवांचुनी एथींची गोडी । नेणती आणिक ॥28॥ जैसा वायसीं चंद्र नोळखिजे । तैसा ग्रंथु हा प्राकृतीं नेणिजे । आणि तो हिमांशुचि जेवि खाजें । चकोराचें ॥29॥ तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । अज्ञानासी आन गांवो । म्हणोनि बोलावया विषय पहाहो । विशेषें नाहीं ॥30॥ परि अनुवादलो मीं प्रसंगें । तें सज्जनीं उपसाहावें लागे । आतां सांगेन काय श्रीरंगे । निरोपिलें जें ॥31॥ तें बुद्धीही आकळितां सांकडें…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारतीय भ्रूणशास्त्राचे जनक पंचानन माहेश्वरी टीम अवांतर पंचानन माहेश्वरी यांचा जन्म राजस्थानातील जयपूर येथे 9 नोव्हेंबर 1904 रोजी झाला. एविंग ख्रिस्तियन कॉलेजातून ते बी. एस्सी. आणि एम. एस्सी झाले. वस्तुत:, वैद्यकीय शिक्षणाकडे कल असलेल्या माहेश्वरी यांच्यावर त्यांच्या महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक विनफीड दुडगॉन यांचा प्रभाव असल्याने ते वनस्पतीशास्त्राकडे ओढले गेले. माहेश्वरी यांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शरीर- रचनाशास्त्र आणि भ्रूणशास्त्र (गर्भविज्ञान) या विषयात पीएच्.डी. प्राप्त केली. त्यांनी आग्रा, लखनऊ, अलाहाबाद, ढाका आणि दिल्ली येथे अध्यापनाचे काम केले. वनस्पतीशास्त्रातील सर्व उपविषयांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. युरोप आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञ त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे अभ्यासासाठी येत असत.…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला पदार्थांमध्ये काही ना काही तरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्या काही क्लृप्त्या लढवितात. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : पौष्टिक नूडल्स, चटपटीत शेवेची भाजी अन् मिरिंडा केक… हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

विवेक वैद्य वनिताबाई आणि सुनेचे भांडण झाले. भांडण काही मिटेना. वाढतच गेले. अशातच वनिताबाईंच्या मुलाने (साहजिकच) बायकोची बाजू घेतली. मग वनिताबाईंनी थेट फोन करून लेकीला बोलावले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लेक जावयाला घेऊन वनिताबाईंसमोर हजर झाली. चहापाणी झाले आणि पुन्हा वादाला सुरुवात झाली… वाद वाढतच गेला. सासू आणि सून एकमेकांवर ‘जगणे असह्य करत’ असल्याचा आरोप करत होते. लेकीने आईचीच कड घेतली. जावई त्यांच्या कौटुंबिक कलहात आपण कशाला पडा? म्हणत बाहेर बसून होता. सूर्य डोक्यावर आला तरी वाद शमण्याची चिन्हे दिसेना. शेवटी जावई उठला आणि मधे येत म्हणाला, “जेवणाचे जरा बघता का? आम्हा तिघांना जेवण करून परत जायचे आहे?” “तिघे? तिसरा…

Read More