Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
डॉ. किशोर महाबळ नियमितपणे अभ्यास आणि गृहपाठ न करणे, शैक्षणिक उपक्रमांमध्ये भाग घेण्यात उत्साह नसणे, शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे, नेहमीच शाळेत तसेच वर्गात उशिरा पोचणे, परीक्षेच्या दिवशी शाळेत अनुपस्थित राहणे, परीक्षांमध्ये सातत्याने कमी गुण मिळणे किंवा नापास होणे, नियमित अभ्यास करून उत्तम गुण मिळविण्याऐवजी परीक्षेत गैरमार्गाने उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करणे, आपले हस्ताक्षर सुवाच्य असावे यासाठी कोणतेही प्रयत्न न करणे, वर्गात शक्यतो सर्वात शेवटच्या बाकांवरच बसायचे, शिक्षकांच्या शिकविण्याकडे दुर्लक्ष करायचे, वर्गात शिकण्याशिवाय अन्य जमेल ते सर्व करायचे, वर्गात मन लावून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करायचा, शिक्षकांचेही लक्ष विचलित व्हावे यासाठी मुद्दाम तसे वागायचे, शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात पुढाकार न…
शोभा भडके भाग – 1 “आरू… अगं झालं का नाही तुझं? किती उशीर! बस निघून जाईल ना…” राम बाहेरच्या अंगणात बॅग घेऊन उभा राहात तिला आवाज देत होता. “आले रे दाद्या किती जोराने ओरडतो… येतच होते ना!” ती लगबगीने खांद्यावर पर्स अडकवत, पायात सँडल घालत म्हणाली. ही आरु म्हणजे आपल्या कथेची नायिका… म्हणजे आराधना शिंदे… बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारी… तशी घरची परिस्थिती ठीक… घरी पाच एकर शेती… आई, वडील, ती आणि तिचा मोठा भाऊ असं त्यांचं चौकोनी कुटुंब… तसे चुलत काका, काकी, भावंडं वगैरे असा बराच मोठा गोतावळा आहे… पण सगळे वेगवेगळे! आईचं नाव कलावती तर, बाबा सखाराम…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये डोसा किंवा इडलीचे पीठ उरले तर काय करायचे? तसेच शिळ्या भाताचे काय करायचे, याच्या काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : कोथिंबीर वडी, अळुवडी आणि केक करताना…. हेही वाचा – Kitchen Tips : घरात पातळ पोहे पाहिजेतच… कॉर्नफ्लोअरचा असाही उपयोग (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें । मग आपणपांचि आपण असे । अखंडित ॥105॥ ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी । सहजें अपरिग्रही जे तिहीं लोकीं । तोचि म्हणऊनि ॥106॥ ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें । आपुलेनि बहुवसपणें । कृष्ण म्हणे ॥107॥ तो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु । जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ॥108॥ प्रणवाचिवे पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठें । तें जयाचिये यशा धाकुटें । वेढूं न…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – होप फॉर द बेस्ट! दिनविशेष विज्ञानवादी अभिनेता डॉ. श्रीराम लागू टीम अवांतर आपल्या समर्थ अभिनयाने रंगभूमी, सिनेमा ही माध्यमे गाजवणाऱ्या डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय आणि नंतर पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयांमधून झाले. 1950 च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्यावरील शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेऊन पुण्यात 5 वर्षे काम केले. नंतर उच्च शिक्षणासाठी ते कॅनडा आणि इंग्लंड येथे गेले. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच श्रीराम लागू यांनी नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांवर लहानपणापासूनच मराठी नाटकांचा…
डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ धुक्याच्या कुशीत हिवाळ्याने अलगद प्रवेश केला आहे… हवेत गारवा आणि वातावरणात प्रसन्नता भरली आहे. शरीर आणि मन दोघांनाही विश्रांती देणारा, हा ऋतू अनेकांना आवडतो. मात्र या ऋतूत हवेतील कोरडेपणा वाढलेला असल्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. हिवाळा सुरू होताच, शरीराला तापमानातील बदलाशी जुळवून घ्यावं लागतं. हवेत गारवा वाढल्यावर शरीराचं तापमान कायम ठेवण्यासाठी मेंदू काही विशेष प्रतिक्रिया देतो. वाढत्या थंडीशी जुळवून घेण्यासाठी आपले शरीर ‘हिस्टामिन’ नावाचे एक रसायन तयार करते. हिस्टामिनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे शरीरातून उष्णता बाहेर जाणं कमी होतं. त्यामुळे हातपाय थंड वाटू शकतात, पण शरीरातील उष्णता केंद्रभागी टिकवली जाते. थंड हवेत…
कामिनी व्यवहारे सारणाचे साहित्य कव्हरसाठी साहित्य हेही वाचा – Recipe : डाळिंब्याची खिचडी (वालाची खिचडी) कृती हेही वाचा – Recipe : कुरकुरीत ब्रेड रोल्स… टीप एकूण कालावधी – साधारणपणे पाऊण तास पुरवठा संख्या – चार ते पाच व्यक्तींसाठी तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
विवेक वैद्य “हॅलो…” “बोला वैद्यकाका…” “वेळ आहे का रे? जरा बोलायचे आहे तुझ्याशी…” “बोला ना काका.” “काही नाही. आई भेटली होती बाजारात परवा…” “मला खंडीभर शिव्या दिल्या असतील?” “ते जाऊ दे. पण मला तुझी बाजूही समजून घ्यायची आहे. लग्नाला दोन-अडीच वर्षे झाली जेमतेम. मुलगाही अजून लहानच आहे तुझा… तरीही तू वेगळा झाला अन् तेही भाड्याच्या घरात!” “इलाज नव्हता काका.” “तू आणि तुझी बायको तर किती समंजस. शिवाय, आता वडीलही वारले तुझे. अशावेळेस आईला आधार द्यायला हवा ना तू? राग नको मानू. वडिलकीच्या नात्याने बोलतो…” “नाही काका, काही राग नाही. तुम्हाला जाब विचारण्याचा हक्कच आहे… पण माझा आधार हवा की नको,…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु । साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥9॥ तेथ सुहृद आणि शत्रु । कां उदासु आणि मित्रु । हा भावभेद विचित्रु । कल्पूं कैंचा ॥94॥ तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा । मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ॥95॥ मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरीटी । काय परिसाचिये कसवटी । वानिया कीजे ॥96॥ ते जैशी निर्वाण वर्णुचि करी । तैशी जयाची बुद्धि चराचरीं । होय साम्याची उजरी । निरंतर ॥97॥ जे…
दर्शन कुलकर्णी उत्पत्ति एकादशी / आळंदी यात्रा वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाचे वेळापत्रक तुमच्या आनंद आणि शांतीवर परिणाम करेल. मानसिक आणि शारीरिक विश्रांती घेण्याची गरज वाढेल. समाजातील मान्यवरांचा मोठा पाठिंबा मिळेल. नफ्यात वाढ होत राहील. नवीन उपक्रमांच्या संधी वाढतील. मनोकामना पूर्ण होतील. एक आनंददायी वातावरण तयार होईल. धार्मिक कार्यात रस निर्माण होईल. वृषभ – उत्पन्न आणि खर्चात समतोल राहील. व्यापार आणि व्यवसायाकडे लक्ष दिल्यास मोठे यश मिळेल. तुम्हाला प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल. जोडीदार आणि मुलांशी संबंधित काही बाबींनी चिंतीत व्हाल; गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतील की, नाही याबद्दल शंका असेल. शैक्षणिक कामात सहज यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वाईट…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 249
- अवांतर 177
- आरोग्य 92
- पंचांग आणि भविष्य 363
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 186
- मैत्रीण 17
- ललित 515
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
