Author: Team Avaantar

चंद्रकांत पाटील आमचा वाडा नदीला जायच्या वाटेवर होता… वाड्याच्या समोरच्या गल्लीला ‘खालची आळी’ असे म्हणत. तिथे दोन-तीन पाटलांची घरे पुढे साळुंखे, मोरे, बाजूला देशपांडे, कुलकर्णी आणि शेवटी सुनंदा अक्काचे घर… त्यापुढे रस्ता लहान बोळवजा होई आणि मेन रोडला मिळे. त्या बोळात शेवंता काकू आणि मुक्ता अक्का या सुनंदा अक्काच्या मैत्रिणी राहात… सुनंदा अक्का म्हणजे तब्येतीने मजबूत, उंचीपुरी, डोक्याचे निम्म्याला अधिक पांढरे झालेले केस, मोठाले डोळे, पसरटनाक आणि पुढचे दोन दात किंचित बाहेर आलेले… अक्का गल्लीतून हिंडायला लागली की, लहान मुलेच काय पण, मोठी माणसे देखील टरकून असायची… असा अक्काचा दरारा होता! अशी ही अक्का नवरा वारल्याने घरात एकटीच असे. अक्काचे…

Read More

माधवी जोशी माहुलकर वर्धेवरून काल सकाळी गोरस भांडारचा गोरस पाक घरी आला आणि मग काय घरातील खारी, बिस्किटे मागे सारली जाऊन पहिल्यांदा गोरस पाक चहासोबत पोटात गेला… वा! काय अप्रतिम चव! कल का तो दिन बन गया! वर्धा जिल्ह्याचे गोरस पाक हे प्रसिद्ध असे जागतिक स्तरावरील उत्पादन आहे. वर्धेच्या मगनवाडी प्रभागात 1939 साली महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांच्या संकल्पनेतून गोसंवर्धन गोरस पाक शाळेची निर्मिती झाली. स्थानिकांना ग्रामीण आणि कुटीर उद्योगातून रोजगार मिळावा, खेडीपाडी समृद्ध आणि स्वावलंबी व्हावीत, हाच उद्देश गोरस पाक भांडारच्या निर्मिती मागे या त्रयींचा असावा. गोरस भांडार येथे आजूबाजूच्या खेड्यातील गोपालक शेतकऱ्यांकडून, ग्रामविकास समित्यांमधून,…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा जो मुळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेंचि वरी सांकडला । फुगु धरी ॥214॥ क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायी गाजे । मणिपूरेंसीं झुंजे । राहोनियां ॥215॥ मग थांवली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घरडहुळी । बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ॥216॥ भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजी संचरे । कफपित्ताचे थारे । उरों नेदी ॥217।। धांतुचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥218॥ नाडीतें सोडवी ।…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मोठे आर्थिक व्यवहार टाळण्याचा शक्यतो प्रयत्न करा. कुणाचा सल्ला न घेता आज कुठलीही मोठी गुंतवणूक करू नका. कोणत्याही वादात पडू नका. कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यांचे वर्तन बघून अस्वस्थ होऊ शकता. आज मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. आध्यात्मिक कार्यासाठी खर्च केला जाईल. वृषभ – दिवस शुभ आणि फलदायी राहील. व्यवसायात चांगला नफा होईल, लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम राहील. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विवाहोत्सुक जातकांना जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे समाजातील प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा वाढेल. मिथुन – व्यवसायात यश मिळेल.…

Read More

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! मधल्या काळात मी चांगलीच जाडजूड झाले होते. अगदी रेडिमेड कपडे 4XL साइजचे लागायचे. बरेचदा आवडलेले कपडे, रंग, पॅटर्न, स्टाईल त्या साईजमध्ये मिळायची नाही. खूप वाईट वाटायचं… पण अलीकडेच जाणवत होतं की, आपण बारीक होतोय. ध्यानीमनी नसताना हे घडत आहे. गेल्या आठवड्यात मी स्वतःसाठी XL साईजचा ड्रेस विकत घेतला आणि तो व्यवस्थित झाला. त्यामुळे आता मैत्रिणी, शेजारणी, सहकलाकार या सगळ्यांना माझ्या बारीक होण्याचं कौतुक वाटायला लागलंय. “काय ग जाडे, एवढी बारीक कशी झालीस? आजारी तर दिसत नाहीयेस! आम्हाला तरी सांग तुझं गुपित…” अशा प्रतिक्रिया यायला लागल्यात. वास्तविक, हे गुपित मलाही उशिराने समजलं.…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. मग काहीतरी क्लृप्ती लढविली जाते. ‘फूड कॉर्नर’मध्ये वेगळ्या प्रकारची अळुवडी, फ्राय इडली अन् गुलबक्षीच्या कोवळ्या पानांची भजी बनविण्याच्या टिप्स पाहुयात. हेही वाचा – Kitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी… हेही वाचा – Kitchen Tips : एकसारखी गोल आणि झटपट बटाटाभजी, लज्जतदार पराठे! (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

पराग गोडबोले ऋचा… छानशी, चुणचुणीत मुलगी. एकुलती एक. छान शिकली, सवरली आणि एका खासगी कंपनीत नोकरीही लागली तिला. यथावकाश नाव नोंदवलं एका संस्थेत आणि वर संशोधनाला सुरुवात झाली. फार काही अपेक्षा नव्हत्याच तिच्या! बऱ्याच मुलांमधून प्रथमेश आवडला तिला. त्याचे आईवडील चिपळूणजवळच्या एका छोट्याश्या गावात स्थायिक. तिथे स्वतःचं टुमदार घर, थोडी शेती आणि सासऱ्यांची शिक्षकाची नोकरी. खाऊनपिऊन सुखी कुटुंब. तो, चिंचवडला एका प्रसिद्ध कंपनीत नोकरीला. BE झालेला. भाड्याचा 1 BHK फ्लॅट, चिंचवडमध्येच… कार नव्हती, पण बाइक होती स्वतःची. ऋचाला पुरेसं होतं एवढं. एका शांत हॉटेलमध्ये दोन तास गप्पागोष्टी झाल्या आणि आपलं जमेल असं वाटून गेलं त्यांना. Vibes match झाल्या त्यांच्या… हल्ली…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि आधींचा मार्गु मोडे । तेथ अपानु आंतलीकडे । वोहोंटो लागे ॥200॥ समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः । संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥13॥ तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं बैसे । बाहुमूळीं दिसे । थोरीव आली ॥201॥ माजि उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें । नेत्रद्वारींचीं कवाडें । लागूं पाहती ॥202॥ वरचिलें पातीं ढळती । तळींची तळीं पुंजाळती । तेथ अर्धोन्मीलित स्थिती | उपजे तया ॥203॥ दिठी राहोनि आंतुलीकडे ।…

Read More

दर्शन कुलकर्णी विनायक चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडतील. कठोर परिश्रम करणाऱ्यांना सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. व्यवसाय चांगला होईल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो. वरिष्ठांशी बोलताना संयम बाळगा. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कुटुंब आणि मित्रांसह सहलीला जाऊ शकता. आरोग्य चांगले राहील. वृषभ – व्यवसायात आर्थिक फायदा आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. दिवस कठोर परिश्रमांचा असेल. तरीही तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल, कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल. मुलांच्या करिअरबाबत कुटुंबातील ज्येष्ठांकडून सल्ला घ्याल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मिथुन -…

Read More

डॉ. किशोर महाबळ सर्व शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक मुलीला आणि मुलाला सर्वोत्तम शिक्षण मिळाले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची दखल घेऊन त्याला ती गुणवत्ता विकसित करण्याची पूर्ण संधी आणि प्रोत्साहन मिळालेच पाहिजे. विज्ञान आणि गणितात उत्तम गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच भाषा, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल असे अन्य विषय तसेच चित्रकला, गायन, वादन, नृत्य अशा कलांमध्ये गती असलेल्या विद्यार्थ्यांनाही सारखेच महत्त्व दिले गेले पाहिजे. कोणीही विद्यार्थी प्रोत्साहनापासून वंचित राहायला नको, याचे आपण महत्त्व समजून घेत आहोत. आपल्या शाळेत आपण यासाठी काय करू शकतो, याचा विचार करूयात! दरवर्षी सर्व शाळांमध्ये कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेतली जाते. त्यानंतर सहसा स्पर्धकांच्या चित्रांतील पारितोषिक प्राप्त चित्रेच विशेष…

Read More