Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
नितीन फलटणकर आता कुठे सूर्याने ढगांच्या पल्ल्याड डोकवायला सुरुवात केली होती. सतत एनरजेटीक असलेला तो आज व्हिटामिन डी कमी झाल्यासारखा आळसावलेला, थकलेला वाटत होता. पावसाळा नसतानाही पावसाळी वातावरण होतं… हवेत गारवा होता. सकाळचे 7 वाजले असतील. मंदार बेडवरच सारखा कूस बदलत होता. रात्रभर त्याला झोप नव्हती. एकतर यामिनी (त्याची बायको) रात्री माहेरहून उशिराने आली होती अन् दुसरे म्हणजे रात्री एका अन्-नोन कॉलने त्याची झोप उडवली होती. तो कसाबसा डोळे चोळत उठला. बेडरूममध्ये जात त्याने यामिनी उठली का, हे पाहिले. ती झोपलेलीच होती. ती झोपताना सहसा चादर घेत नसे, पण आज तिच्या अंगावर चादर होती. पूर्णपणे ओढलेली. ती आईकडे गेली होती,…
मयुरेश गोखले आज सकाळपासून तिने श्रीरंगचं जाम डोकं खाल्लं होतं. फोनवर तिचा सारखा एकच विषय चालू होता, “श्री सांग ना रे… आपलं काही चुकत तर नाहीये ना? तुझं ठीक आहे रे, पण माझ्यासारखी मुलगी अशी कशी तुझ्यात गुंतत चालली आहे! का आणि कसं होतंय हे सगळं, काही कळत नाहीये! तुझी आठवण खेचतेय मला तुझ्याजवळ… श्री मी वाट तर चुकत नाहीये ना?” सकाळपासून फोनवर या प्रश्नांचा भडिमार श्रीवर सुरू होता. त्यांना भेटून जेमतेम वर्ष झाले असेल आणि ती श्रीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. श्रीरंगला सुद्धा ती आवडायला लागली होती. पण आज सकाळपासून तिला काय झालंय काही कळत नव्हतं. ‘मी तुझ्यासोबत वाट…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये वेगळ्या चवीची कोथिंबीरवडी, खुसखुशीत मेदूवडा, कुरकुरीत शेव बनवताना वापरावयाच्या काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी… हेही वाचा – Kitchen Tips : घरात पातळ पोहे पाहिजेतच… कॉर्नफ्लोअरचा असाही उपयोग (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
गजानन देवधर जपानी संस्कृतीबद्दल थोडंफार वाचलेलं होतं, त्यानुसार तिथली संस्कृती म्हणजे एखादं तलम रेशमी वस्त्रच जणू! प्रत्येक धाग्यात परंपरेचा स्पर्श, हळुवार सौंदर्य आणि शिस्तीचं वैभव… त्या वस्त्रातला एक मोहक आणि गूढ धागा म्हणजे गेशा… गेशा म्हणजे फक्त नृत्य-गायन करणारी स्त्री नव्हे. कला, संवादकौशल्य, वागण्यातील नाजूकपणा आणि व्यक्तिमत्वातील तेज, या सगळ्याच्या संगमातून घडलेली एक सजीव मूर्ती… लहानपणापासून या मार्गावर येणारी मुलगी आधी मायको म्हणून ओळखली जाते. शुभ्र चेहरा, लालसर ओठ, झगमगणारे केसांतील अलंकार, रंगीत किमोनो हे तिचं बाह्यरूप. पण त्यामागे असते कठोर शिस्त. चालण्यापासून पाहुण्यांशी गप्पा मारण्यापर्यंत प्रत्येक हालचालीत शिस्त रुजवली जाते. कविता, नृत्य, संगीत, चित्रकला, साहित्य या असंख्य कलांमध्ये वर्षानुवर्षे…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता । मा अनुभवें तल्लीनता । नव्हेल केंवी ॥331॥ म्हणऊनि एथ कांहीं । अनारिसें नाहीं । परी नावभरी चित्त देई । बोला एका ॥332॥ आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परि न शके करुं पांगु । योग्यतेचा ॥333॥ सहजें आंगिक जेतुली आहे । तेतुलियाची जरी सिद्धि जाये । तरी हाचि मार्गु सुखोपायें । अभ्यासीन ॥334॥ नातरी देवो जैसें…
दर्शन कुलकर्णी दत्त जयंती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला आणि खूप शुभ असेल. मन आनंदी असेल आणि कष्टाचे फळ मिळेल. प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभामुळे मोठी रक्कम मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेच्या विक्रीतूनही मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. वृषभ – कामाच्या ठिकाणी कोणतेही काम संयम आणि शांततेने करावे लागेल. व्यावसायिकांचा दिवस सामान्य राहील. अनेक योजनांपैकी एखादी योजना आज पुढे सरकेल, ज्याचे भविष्यात महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च होऊ शकतो. काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील. अन्यथा नुकसान होऊ शकते, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. मिथुन – आजचा…
दीपक तांबोळी भाग – 1 माळी आल्याची चाहूल लागली तसे नाना मागच्या दरवाजाने बागेत शिरले. पेरूच्या झाडाकडे त्यांचं लक्ष गेलं. शेकडो पेरू तिथे लागले होते. शेजारच्या सीताफळाच्या झाडावर देखील बरीच सीताफळं लटकत होती. एकेका झाडाचं निरीक्षण करत ते आंब्याच्या झाडाजवळ आले. त्या उंच डेरेदार झाडावर त्यांनी मायेने हात फिरवला. उन्हाळ्यात याच झाडाला शेकडो कैऱ्या लागायच्या. लोणच्यासाठी कैरी आणायची कित्येक वर्षात कधी गरजच पडली नव्हती. नातेवाईक, मित्रांना कैऱ्या वाटून झाल्या की, आंबे पिकवले जायचे. नानांनी चिकू, डाळिंब, पपई यांच्या झाडावर नजर टाकली. कुठे काही किड लागली नसल्याची खात्री केली. मग ते भाज्यांकडे वळले. कांदे, बटाटे आणि काही भाज्या सोडल्या तर जवळजवळ…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये घोसाळ्याचे पोहे, शिळ्या पोळ्यांची शेव अन् खरवसाचा केक बनविण्याच्या काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसे, स्वादिष्ट चकली आणि दहिवडे, स्पाँजी ढोकळा हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर एक मतिमंद लहान मुलगा त्याच्या आजीसह ओपीडीत आला होता, बराच आजारी तरीही एकदम खूश! आपला नातू चारचौघांसारखा नाही म्हणून आजीनं नातवाला इतकं प्रशिक्षण दिलं की, पठ्ठ्या समवयस्क अन् तथाकथित नॉर्मल मुलांपेक्षाही हुशार होता… कमांड ऐकणं -ती फॉलो करणं – ॲटिक्वेट्स वगैरे… जाताना मंगोल डोळे अजूनच बारीक करून ‘बाय’ म्हणत एक फ्लाइंग किसही देऊन गेलं! मला क्षणभर त्याचं खूप कौतुक वाटलं… पण अचानक विलोजब्रुक आठवलं आणि तोंड कडू झालं! साठच्या दशकात न्यूयॅार्कस्थित स्टेटन आयलंडमधलं विलोजब्रुक स्टेट स्कूलचं लोखंडी गेट रोज कुरकुरत उघडायचं… आत लांब निर्जंतुक कॉरिडॉर आणि त्यात दोन्ही बाजूला बाकांवर बसलेली मानसिकदृष्ट्या विकलांग मुलं… बाहेरच्या जगाला वाटायचं,…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य । अनादि जें अगण्य । परमतत्त्व ॥320॥ जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु । जेथ आदि आणि अंतु । विरोनी गेले ॥321॥ जें विश्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ । जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा ॥322॥ जें महाभूतांचें बीज । जें महातेजाचें तेज । एवं पार्था जें निज । स्वरुप माझें ॥323॥ ते हे चर्तुभुज कोंभेली । जयाची शोभा रूपा आली । देखोनि नास्तिकीं नोकिलीं…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
