Author: Team Avaantar

आराधना जोशी कोकमाच्या सारासाठी साहित्य भातासाठी साहित्य पुरवठा संख्या – दोन व्यक्तींसाठी हेही वाचा – Recipe : हिरवे टोमॅटो आणि दाण्याची भाजी तयारीसाठी लागणार वेळ – साधारणपणे 20 मिनिटे पाककृती करण्यासाठी – 40 मिनिटे एकूण वेळ – एक तास कृती भाताची पेज आणि वाफाळता भात कोकमाचे सार हेही वाचा – Recipe : लो कार्ब वेजी टोस्ट टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

दिलीप कजगांवकर “एक रिक्वेस्ट आहे, माझा एक फोटो घ्याल का प्लीज? बॅकग्राऊंडमध्ये विद्यापीठाची मेन बिल्डिंग पूर्ण घेता येते का पाहा…” एका अतिशय सुंदर तरुणीने राजला विनवले. हाफ बाह्यांचा लाल टी शर्ट, काळ्या रंगाची जीन्स, गोरा वर्ण, मध्यम उंची, सडपातळ बांधा, आकर्षक चेहरा, लांब मोकळे केस, अतिशय गोड आवाज… बोलण्यावरून स्पष्ट होत होते की, ती नक्कीच भारताबाहेर राहात असावी. “व्हाय नॅाट?” म्हणत राजने तिने सांगितल्याप्रमाणे तीन-चार फोटो काढून तिला दाखविले. “खूप छान काढलेत फोटो, एक्सलंट फोटोग्राफी!” ती खूश होत म्हणाली… “तुमचाही घेऊ का मी फोटो? माय फोटोग्राफी इज नॉट गुड… पण मी प्रयत्न करते… इफ यू डोंट माइंड.” तिने काढलेले फोटो…

Read More

अध्याय सातवा हें रोहिणीचें जळ । तयाचें पाहतां येईजे मूळ । तैं रश्मि नव्हती केवळ । होय तो भानु ॥29॥ तयाचिपरी किरीटी । इया प्रकृति जालिये सृष्टी । जैं उपसंहरूनि कीजेल ठी । तैं मीचि आहें ॥30॥ ऐसें होय दिसे न दिसे । हें मजचि माजिवडे असे । मियां विश्व धरिजे जैसें । सूत्रें मणि ॥31॥ सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाचां सुतीं वोविले । तैसें म्यां जग धरिलें । सबाह्याभ्यंतरीं ॥32॥ रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः । प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥8॥ पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ । जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥9॥ म्हणोनि उदकीं रसु ।…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नवीन प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न करताना काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील एखाद्याला आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. खर्च वाढतील आणि कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक ताण येईल. त्यामुळे शक्यतो शांत राहण्याचा प्रयत्न करा. वृषभ – आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला असेल. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांसोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखली जाईल, जी यशस्वी होऊ शकते. कामामुळे परदेशात जावे लागू शकते. जोडीदार आणि संततीसोबत घालवलेला कौटुंबिक वेळ चांगला जाईल. मिथुन – आजचा दिवस आनंदाच्या बातम्यांनी भरलेला असेल. एखादी नवीन नोकरीची संधी तुमच्याकडे चालून येईल. एखादा मित्र…

Read More

दीपक तांबोळी भाग – 3 नानांचा ॲक्सिडंट झाल्याचे ऐकून सारेच हादरले. हॉस्पिटलबाहेर खूप गर्दी जमली होती, ती फक्त नानांना बघण्यासाठी! हे विवेकला कळल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. नाना इतके लोकप्रिय असतील, असं त्याला वाटलं नव्हतं. थोड्या वेळाने त्याचे दोन्ही भाऊ बायका आणि मुलांसह आले. मुलांना आपल्या आजोबांना भेटायचं होतं. त्यांचा आजोबांवर आणि आजोबांचा त्यांच्यावर खूप जीव होता. त्यामुळे हट्ट करुन ते हाँस्पिटलला आले होते. विवेक डाँक्टरांना भेटला. तब्येतीबद्दल विचारणा केली… “आताच काही सांगता येणार नाही. सीटी स्कॅनचे रिपोर्ट्स आल्यानंतर परफेक्ट काहीतरी बोलता येईल. त्यांच्या मेंदूला जबरदस्त मार लागलाय. ब्रेन हॅम्रेजची शक्यताही असू शकते. आमचे प्रयत्न सुरू आहेत… लेट्स वेट अँड वॉच!”…

Read More

सायली कान्हेरे थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अशा वातावरणात गरमागरम सूप प्यायला खूप मजा येते. पण ही सूप्स करायला काहींना कठीण वाटतात. आज मी एका सोप्या सूपची रेसिपी सांगणार आहे. जी करायला सोपी आणि खूप टेस्टी आहे. तुम्हीही नक्की करून बघा. साहित्य पुरवठा संख्या – चार व्यक्तींसाठी हेही वाचा – Recipe : एकदम टेस्टी कुळीथ सूप तयारीसाठी लागणार वेळ – सर्व भाज्या चिरण्यासाठी 10 मिनिटे शिजवून घ्यायला – 15 मिनिटे मिक्सरमधून फिरवायला – 10 मिनिटे एकूण वेळ – 35 मिनिटे कृती हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या…

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर जपानच्या ओसाकामधील एक श्रीमंत व्यापारी ‘काझुकी’ हा ढोबळ अर्थानं प्रचंड सुखी होता… घरात नोकरचाकरांची फौज होती, दारात टोयोटा, निसान, होंडा, इसुझू, सुझूकी अशा अत्याधुनिक गाड्यांचा ताफा होता… सगळी सुखं पायाशी लोळण घेत असतानाही रोजची व्यापारी स्पर्धा, कामाचा प्रचंड व्याप, धकाधकीचं जीवन यामुळं काझुकी नेहमी कुठंतरी अस्वस्थ असे! एके दिवशी एका रूटिन व्यापारी बैठकीनंतर घरी जात असताना त्याला रस्त्यात अचानक त्याचा बालमित्र ‘हारुतो’ दिसला आणि त्यानं शोफरला त्वरित गाडी थांबावयला सांगितली. तो हारुतोला घेऊन घरी आला. बालपणीच्या गप्पा रंगल्या, आठवणी ताज्या झाल्या, खूप दिवसानंतर काझुकी इतका आनंदी दिसत होता… हारुतो पेशानं शिक्षक होता अन् आपल्या कामात तो अतिशय…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सातवा भूमिरापोऽनलो वायु: खं मनो बुद्धिरेव च । अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥4॥ तरी अवधारीं गा धनंजया । हे महदादिक माझी माया । जैसी प्रतिबिंबे छाया । निजांगाची ॥15॥ आणि इयेतें प्रकृति म्हणिजे । जे अष्टधा भिन्न जाणिजे । लोकत्रय निपजे । इयेस्तव ॥16॥ हे अष्टधा भिन्न कैसी । ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसीं । तरी तेचि गा आतां परियेसीं । विवंचना ॥17॥ आप तेज गगन । मही मारुत मन । बुद्धि अहंकार हे…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवसाची सुरुवात थोडीशी दडपणाखाली झाली, असे वाटू शकते. एकाच वेळी मनात अनेक गोष्टी येतील, ज्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते. कामात घाई करणे हानिकारक ठरेल, म्हणून काहीही करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो, परंतु वाद जास्त वाढवू नका. संध्याकाळी गोष्टी शांत होतील आणि हलके वाटेल. वृषभ – आजचा दिवस शांत आणि संतुलित असेल. दैनंदिन कामे तणावाविना पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्याशी संवाद साधल्याने सकारात्मक मूड येईल. क्षमतेनुसार खर्च करा आणि दिखाऊपणा टाळा. आरोग्य चांगले राहील, फक्त आळसाला वर्चस्व गाजवू देऊ नका. मिथुन – संभाषण करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.…

Read More

डॉ. किशोर महाबळ सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. शाळेतील त्यांचे अध्यापन, विद्यार्थ्यांशी वर्तणूक, विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखण्याची क्षमता, विद्यार्थ्यांच्या विकासातील योगदान, शिक्षणाबद्दल तसेच शिक्षकांच्या भूमिकेबद्दलचे विचार, वर्गातील आणि शाळेतील वर्तन, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, बौद्धिक क्षमता आणि शैक्षणिक गुणवत्ता या सर्व बाबीं शिक्षकांची शैक्षणिक व्यवस्थेतील भूमिका निर्धारित करतात. शिक्षकाचा हा दृष्टिकोन जर नकारात्मक असेल तर, तो वर्ग घेण्यात टाळाटाळ करेल, फक्त परीक्षेपुरते शिकवेल. अभ्यास करणे टाळेल. विद्यार्थ्यांना मारहाण करणे, हा शिस्त लावण्याचा एकमेव मार्ग आहे, असे मानेल. विद्यार्थ्यांमधील गुण शोधण्याऐवजी त्यांच्यावर टीका करण्यात समाधान मानेल. असा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे अत्यंत नुकसानच करेल. शिक्षणव्यवस्था डबघाईला नेईल. सकारात्मक दृष्टिकोन असलेला…

Read More