Author: Team Avaantar

दिलीप कजगांवकर “बेटा लाडू खातोस का?” हे ऐकून मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न असलेला राज क्षणभर हरवून गेला, कारण त्या आवाजात आईची माया होती… राज इंटरव्ह्यूसाठी ट्रेनने कोल्हापूरहून मुंबईला निघाला होता. त्याच्या समोरील सीटवर बसलेल्या काकूंनी डब्यातून लाडू काढले आणि त्या त्याला विचारत होत्या, “बेटा लाडू खातोस का?” “हो… नको नको,” राज गडबडला. “घे रे पोरा, साजूक तुपाचे आहेत आणि मी स्वतः केले आहेत,” म्हणत अगदी मायेने त्यांनी राजला लाडू दिला. “काकू खूपच छान,” म्हणत राजने दोन लाडू फस्त केले. राजचे नुकतेच लग्न झाले होते आणि तो कोल्हापूरच्या एका छोट्या कंपनीत काम करत होता. मुंबईतील एका मोठ्या कंपनीची जाहिरात होती, काम…

Read More

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये कोबीची भाजी, मसालेभात, पालक-पनीर, पुदिन्याचे दही करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : मसाल्याच्या रस्सा भाज्या, सँडविचची चटणी, भाज्यांवरील तवंग आणण्यासाठी… हेही वाचा – Kitchen Tips : भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी अन् पडवळाची कोशिंबीर… तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

स्नेहल अ. गोखले गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ गुरू म्हणजे ज्ञान देणारा, मार्गदर्शक, शिकवणारा… म्हणूनच पंडित विजय बक्षी सरांबद्दल हा लेखप्रपंच…  ते जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी, मी त्यांना गुरूसमान मानते. अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी लहानांकडूनही गुरुमंत्र घेतला आहे. (उदाहरणार्थ, मुक्ताबाईंकडून चांगदेवांनी गुरुमंत्र घेतला). आपला ‘जिव्हाळा नागरिक संघ’ 2005मध्ये सुरू झाला. तेव्हा असलेल्या लहान रोपट्याला आता वृक्षाचे (70-80 सभासद) रूप आले आहे. तेव्हापासूनच नवनवीन कल्पना घेऊन कार्यक्रम होत असत. त्यामध्ये प्रामुख्याने पंडित बक्षी सर, सुलभाताई कुलकर्णी आणि बाकी सर्वजण कार्यक्रम महिन्यांतील दोन गुरुवारी करत असत. 2007मध्ये पुण्यातील जेष्ठ नागरिकांच्या विविध 36 संघांची देशभक्तीपर…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये । तैसें मज करणें आहे । भूतांचे हें ॥109॥ अगा नगर हें रायें केलें । या म्हणणया साचपण कीर आलें । परि निरुतें पाहतां काय शिणले । रायाचे हात ॥110॥ आणि मी प्रकृति अधिष्ठीं तें कैसें । जैसा स्वप्नीं जो असे । मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे ॥111॥ तरि स्वप्नौनि जागृती येतां । काय पाय दुखती पंडुसुता । कीं स्वप्नामाजीं असतां । प्रवासु होय ॥112॥ या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हें भूतसृष्टीचें कांहीं । मज एकही करणें नाहीं । ऐसाचि अर्थु ॥113॥ जैशी रायें अधिष्ठिली प्रजा…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमचा आदर आणि सन्मान वाढवणारा असेल. सरकारी कामात तुमची विश्वासार्हता वाढेल आणि तुमचे मनोबल उंच राहील. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना एखादा सन्मान मिळू शकतो. सौम्य बोलण्यामुळे नवीन मित्र बनण्यास मदत होईल, त्यामुळे कठोर शब्द टाळा. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्याने तुम्ही चिंतित असाल. वृषभ – आजचा दिवस तुमच्या छंदांना वाव देण्याचा असेल. त्याचा मनसोक्त आनंद घ्या. मात्र वाढत्या खर्चाकडे दुर्लक्ष करू नका. आज जोडीदाराच्या मदतीने एखादा व्यवसाय सुरू करू शकता. एखाद्या कराराला अंतिम स्वरुप देता येईल. कोणाहीबद्दलचा मत्सर टाळा. तुमच्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. तब्येतीची काळजी घ्या,…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. माझी एक मैत्रीण होती, सखी. मी तिला बरेचदा सखुबाई म्हणायचे. तशी ती तोंडात चांदीचा नाही तर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली. सासर सुद्धा श्रीमंत. नवऱ्याचा मोठा उद्योग. एकुलती एक मुलगी. खूप शिकलेली. हुशार, सुंदर. तशी मी आणि सखी खूप उशिराने भेटलो. मैत्री व्हायला पण उशीरच झाला. सखीची मुलगी माझ्यापेक्षा तीन-चार वर्षांनी मोठी. सखीला वयोमानाप्रमाणे विस्मरण व्हायला लागलं होतं. माझ्यावर खूप जीव तिचा. त्यामुळे तिची मुलगी तिला ब्लॅकमेल करायची… ‘तू जेवलीस तर, तुला हर्षाकडे घेऊन जाईन…’ ‘तू औषधं घेतलीस तर हर्षाला फोन लावून देईन…’ म्हणजे एवढ झालं की, सखी मला सगळ्यांच्या नकळत…

Read More

रश्मी परांजपे मागील तीन लेखांत आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या विषयाची सविस्तर माहिती घेतली. आता आपण बालशाळेतील गणित या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. वास्तविक, गणित हा अवघड विषय म्हणूनच प्रसिद्ध आहे. काही अंशी ते खरंही आहे. विशेषतः, माध्यमिक शाळेच्या अभ्यासक्रमातील गणित विषय अवघड वाटू शकतो. पण खरं पाहिलं तर गणित हा पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय आहे. गणित विषयातील संकल्पना सुरुवातीपासूनच स्पष्टरीत्या समजावून सांगितल्या आणि विद्यार्थ्यांनी समजावून घेतल्या तर, गणित विषयासारखा सोपा विषय नाही. यावरूनच गणित विषयाचे प्रगतीपुस्तकातील सर्वाधिक गुण मिळवून देणारा विषय म्हणून महत्त्व अधोरेखित होते. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी बालपणापासूनच लागायला हवी… आणि बालशाळेतील शिक्षिकांनी…

Read More

सतीश बर्वे भाग – 3 माझा मित्र सुबोधने त्याच्या हस्ताक्षरातील मजकूर आणि जोशी काकूंची डायरी मला आणून दिली. जोशी काकूंच्या डायरी वाचत असताना त्यांच्या मनाचे हिंदोळे समजले… अरविंदचं जाणं अतिशय धक्कादायक आणि वेदनादायी होतं. मी पुण्याला जायला नको म्हणत असताना देखील हट्टाने गेला तो आणि शेवटी परत आला, तो शांतपणे झोपलेल्या चिरनिद्रा अवस्थेत! सुबोधच्या एका फोनवर सारे मित्र आमच्या घरी जमा झाले होते. त्यांनी आपापसात कामं वाटून घेतली आणि शक्य तितक्या लवकर ते अरविंदचा देह घेऊन आमच्या घरी परतले. अरविंदला बघून अजूनही वाटत होतं की, तो नकळत डोळे उघडेल आणि म्हणेल मला की, ‘आई तुझं ऐकून घरीच थांबलो असतो तर,…

Read More

पराग गोडबोले आबा आणि आम्ही म्हणजे एक वेगळंच समीकरण. आबा घोळ घालणार आणि मग तो आम्ही निस्तरत बसणार, हा आमचा उंदरा-मांजराचा खेळ अव्याहत सुरू असतो. आबा कधी कुठे काय करतील आणि आम्ही गोत्यात येऊ… याचा नेम नसतो, कधीच. खूप सावध राहावं लागतं आम्हाला, नाहीतर, ‘नजर हटी, दुर्घटना घटी‘ याचा प्रत्यय कधी येईल, हे सांगणं कठीण! तसं तर अगदी शहाणे असतात ते. नीट विचार करून बोलतात आणि कृती करतात, फार विवेकाने वागतात. सकाळी फिरून येताना रिक्षावाले, सोसायटीचे रखवालदार, गाडी पुसणारे यांच्याशी दोन शब्द बोलल्याशिवाय त्यांचे पाय घराकडे वळतच नाहीत मुळी… प्रत्येकाला आवर्जून फराळाचे जिन्नस दिल्याशिवाय त्यांची दिवाळी साजरी होतच नाही कधी. चार…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् । कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥7॥ जिये नांव गा प्रकृती । जे द्विविध सांगितली तुजप्रती । एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरूपा ॥98॥ हा प्रकृतीविखो आघवा । तुंवा मागां परिसिलासे पांडवा । म्हणोनि असो काइ सांगावा । पुढतपुढती ॥99॥ तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाचां अंतीं । सर्व भूतें अव्यक्तीं । ऐक्यासी येती ॥100॥ ग्रीष्माचां अतिरसीं । सबीजें तृणें जैसीं । मागुती भूमीसी । सुलीनें होती ॥101॥ कां वार्षिये ढेंढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे । तेव्हां घनजात आटे । गगनींचें गगनीं ॥102॥ नातरी आकाशाचिये खोंपे । वायु निवांतुचि लोपे…

Read More