Author: Team Avaantar

सुरेश महाबळ आज गुरू पौर्णिमा… मला अनेक गुरुजनांचा सहवास आणि सेवा करण्याची संधी मिळाली. अशाच एका महान गुरूंची आठवण मी आज सांगणार आहे. शैक्षणिक तफावत असून सुद्धा माझ्या वाचनाची आवड लक्षात घेऊन अनेक विषयांवर त्यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांनी पण माझी पाठ थोपटून माझ्याकडून अनेक पुस्तके स्वतःच्या संदर्भासाठी वापरली. हे गुरू म्हणजे प्रा. म. मो. केळकर. अत्यंत स्वच्छ वर्तन, उंची जेमतेम पाच फूट, वर्ण गोरा, केस मागे फिरविलेले – त्यामुळे कपाळ मोठे दिसायचे. निळे डोळे समोरच्याचा वेध घेणारे. अंगावर कायम आवडता पेहराव म्हणजे झब्बा आणि पायजमा… ते एम. जे. कॉलेज, जळगाव येथे संस्कृत विभागाचे प्रमुख होते. जळगाव, धुळे,…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 जुलै 2025, वार : गुरुवार भारतीय सौर : 19 आषाढ शके 1947, तिथि : पौर्णिमा 26:06, नक्षत्र : पूर्वाषाढा 29:55 योग : एद्रा 21:37, करण : विष्टी 13:55 सूर्य : मिथुन, चंद्र : धनु, सूर्योदय : 06:07, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 गुरू पौर्णिमा; व्यास पूजन; संन्यासी जन चातुर्मास आरंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – सर्जनशीलता आणि उत्साह यामुळे स्थिती अनुकूल होईल. निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्याच्या वृत्तीमुळे यशप्राप्ती…

Read More

अजित गोगटे पत्रकारितेमधील अनीतिमूल्ये कशाप्रकारे डोके वर काढत असतात, त्याचा बराच अनुभव घेतला आहे. पत्रकारितेच्या नोकरीच्या सुरुवातीस म्हणजे सन 1978-79मध्ये मी त्यावेळच्या भारतातील एकमेव सरकारी वृत्तसंस्थेत नोकरीला होतो, तेव्हाचा हा प्रसंग. मूळचे रशियन असलेले `व्होडका` हे विदेशी मद्य त्या काळात भारतात आजच्यासारखे सर्रासपणे मिळत नसे. त्यामुळे पट्टीच्या पिणार्‍यांना व्होडकाबद्दल आकर्षण आणि कुतूहल असे. त्यावेळच्या सोवियत संघाची एक विमानवाहू युद्धनौका मैत्रीपूर्ण सदिच्छा भेटीसाठी मुंबईच्या नौदल गोदीत आली होती. तेव्हा भारत पूर्णपणे सोवियत संघाच्या कंपूत होता. त्या युद्धनौकेच्या कमांडिंग ऑफिसरने मुंबईतील पत्रकारांना युद्धनौकेला भेट देण्यासाठी निमंत्रित केले. ही भेट दुपारच्या वेळी होती आणि त्यात युद्धनौकेवर जेवणही होते. जेवणाच्या आधी कमांडिंग ऑफिसरच्या वार्तालापानंतर…

Read More

आराधना जोशी मुंबई आणि परिसरात राहणाऱ्यांना लोकल ट्रेन किती महत्त्वाची आहे, हे सांगण्याची गरज नाही. सकाळ आणि संध्याकाळच्या लोकल या अनेकांचे एक कटुंबच बनले आहे. पण स्मार्टफोनने यात बिब्बा घातला आहे, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून वेगवेगळ्या कारणांनी मुंबईतल्या लोकल ट्रेनचा प्रवास मी करतेय. गेल्या काही वर्षांपासून त्यात नियमितता नसली तरी, पूर्णपणे खंडही पडलेला नाही. त्यामुळे लोकल प्रवास आणि त्यातले किस्से यांचा प्रचंड साठा माझ्याकडे जमलेला आहे. पण आजचा लेख यावर आधारलेला नाही. तो आहे मोबाइल फोन संस्कृतीवर. आता प्रश्न असा आहे की, लोकलचा आणि मोबाइल फोनचा काय संबंध? खूप लहानपणापासून लोकलमधून जो प्रवास मी केलेला…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 जुलै 2025, वार : बुधवार भारतीय सौर : 18 आषाढ शके 1947, तिथि : चतुर्दशी 25:36, नक्षत्र : मूळ 29:49 योग : ब्रह्मा 22:08, करण : गरज 13:11 सूर्य : मिथुन, चंद्र : धनु, सूर्योदय : 06:06, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीमुळे सहकाऱ्यांवर तुमचा प्रभाव राहील. प्रवासामुळे नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी…

Read More

चंद्रशेखर माधव सुमारे 22-23 वर्षांपूर्वीची गोष्ट असावी. विजय दादाचे लग्न नुकतच झालेलं होतं. लग्न झाल्या झाल्या दादा औरंगाबादला एका कंपनीमध्ये रुजू झाला. सोनाली वहिनीची नोकरी ऑडिटिंग कंपनीत असल्यामुळे औरंगाबादच्याच एका कंपनीमध्ये ऑडिटला जाण्याकरता तिने पुण्यातून बदली करून घेतली. दोघेही औरंगाबादला स्थिरावले. त्याकाळी मी व्यवसाय करत होतो. काही महिने गेल्यानंतर दोन-तीन दिवस औरंगाबादला सुट्टीवर जावं, असं माझ्या मनात आलं. बसनेच गेलो. दोन-तीन दिवस निवांत राहणार होतो, आराम करण्याकरिता. संध्याकाळच्या वेळी पोहोचलो. दादा आणि वहिनी दोघेही सकाळी साडेसात-आठ वाजताच घर सोडत असत. मला तिथे बाकी काही काम नव्हतं आणि घरातही मी दिवसभर एकटाच असल्याने एकूणच मजेत जाणार होते, ते दोन-तीन दिवस. दुसऱ्या…

Read More

मनोज जोशी सध्या बायोमॅट्रिक आणि टार्गेटच्या जमान्यात प्रत्येकाची फरफट सुरू आहे… प्रत्येकाची ‘दमलेल्या बाबाची कहाणी…’ आहे. पत्रकारितेत साधारणपणे 31-32 वर्षे आहे. ‘आपलं महानगर’चं भावंड असलेल्या ‘हमारा महानगर’पासून या वाटचालीला सुरुवात झाली. या वाटचालीत अनेक नोकऱ्या बदलल्या. ‘नवशक्ति’, ‘लोकमत’, ‘प्रहार’, ‘ईटीव्ही’ (चॅनल आणि वेबसाइट) आणि महानगर येथे दोन वेळा रुजू झालो होतो. त्यात सर्वाधिक काळ ‘लोकमत’मध्ये! सर्वात आधी 2002मध्ये लोकमत जॉइन केले आणि 2009मध्ये ते सोडले. वृत्तपत्राचा जॉब हा कायम संध्याकाळचा. लोकमतचे ऑफिस आधी चिंचपोकळीला होते आणि घरातून मी साधारणपणे साडेतीन-चार वाजता निघत असे. घरी यायला साधारणपणे रात्रीचे एक-दीड वाजायचे. माझी पत्नी आराधना त्यावेळी अल्फा वाहिनीसाठी (आताचे झी) काम करत होती.…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 जुलै 2025, वार : मंगळवार भारतीय सौर : 17 आषाढ शके 1947, तिथि : त्रयोदशी 24:38, नक्षत्र : ज्येष्ठा 27:14 योग : शुक्ल 22:16, करण : कौलव 11:57 सूर्य : मिथुन, चंद्र : वृश्चिक 27:14, सूर्योदय : 06:06, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 भौम प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा दिवस. कामात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वेळच्या वेळी आणि हुशारीने कृती केली…

Read More

सुहास गोखले सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हटले जाते. चंद्र पृथ्वीभोवती 27.3 दिवसांत एक फेरी मारतो. त्यामुळे रोज तो आकाशात वेगवेगळ्या ताऱ्यांच्या मांडणीसमोरून जाताना दिसतो. हेच आयनिकवृत्ताचे 27 भाग चंद्राची घरे किंवा नक्षत्र म्हणून कल्पिलेले आहेत. आकाशस्थ नक्षत्रांसंदर्भातील लेखमालेचा हा पाचवा भाग. आतापर्यंतच्या चार लेखांमध्ये अश्विन, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आद्रा, पुनर्वसू, पुष्य, अश्लेषा, मघा, फाल्गुनी आणि हस्त या नक्षत्रांची माहिती घेतली. आज आपण पुढच्या दोन नक्षत्रांची माहिती पाहुया. चित्रा : हस्त नक्षत्राच्या थोडे पुढे पाहिल्यास आपणास एक सुंदर चांदणी चमकताना दिसेल, तिचेच नाव चित्रा. उत्तर इजिप्शियनांच्या एका लोककथेनुसार इसिस ही देवता टायफून नावाच्या दैत्यावर स्वार होऊन…

Read More

मानसी देशपांडे ‘उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे…’ या गाण्याच्या ओळी ‘उंबरठा’ चित्रपटातील आहेत, पण ज्यांच्या लेखणीतून हे गीत साकारले गेले ते म्हणजे आपले लाडके सुरेश भट! गझल हा काव्यप्रकार आपल्या सर्वांना परिचयाचा आहेच, तरीही त्यात देखील किती गहिरा अर्थ असतो, हे समजले ते भट साहेबांमुळे. इथे मी प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांचा माझ्या अत्यंत आवडीचा विचार मांडत आहे, ‘काही फुलपाखरं उडून गेली तरी, हाताच्या बोटावर रंग ठेवून जातात…’ तुम्हाला सांगते, मी जी लेखाची सुरुवात ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या…’ या गाण्यांच्या ओळींनी केली; कारण, या गाण्याच्या माध्यमातून मनात साचलेल्या असंख्य भावना भट साहेबांनी व्यक्त केल्या आहेत. तुमची…

Read More