Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
शरद महाबळ अचानकपणे मुंबईतील एका वास्तूला भेट देण्याचा योग आला. जेमतेम 48 तासांच्या सहवासात आम्हा उभयतांना जी काही येथे सकारात्मक ऊर्जा मिळाली, त्या प्रेरणेतून मनाच्या गाभाऱ्यात जो हुंकार उमटला, त्यातूनच निर्माण झालेली ही सर्जनशीलता. या दाम्पत्याची थोडी पार्श्वभूमी विशद करतो. दोघांनाही सरितेची उपमा देतो आणि त्या रूपकातून त्यांचा मला उमजलेला जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करतो. या दोन्ही सरिता एकाच गावच्या. आपापल्या परीने आपापल्या जन्मदात्यांच्या संस्कारात वाहात होत्या. तरुण वयात त्यांच्यात नकळतपणे प्रेमाचा अंकुर फुलला… तो व्यक्त झाला आणि दोन्ही घरांतील वरिष्ठांकडून त्याला मंजुरी मिळाली…. आणि मग काय ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे…’ दोन्ही सरितांचा संगम होऊन, आपलं गांव सोडून त्या…
मंदार अनंत पाटील मी अगदी गेली 18 वर्षं या क्षणाची वाट बघत होतो, तो क्षण आणि नंतरचे तीन महिने, त्यात साठवलेले अविस्मरणीय क्षण… शब्दांकित करायचा हा एक प्रयत्न! भाग – 1 मनघरणी साधारण जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यात आईने प्रथमच आपणहून विचारणा केली गेली की, माझा व्हिसा कधी करशील? आणि आकाशाला गवसणी घातल्याचा भास झाला. कारण काही वर्षांपूर्वीच हा प्रश्न विचारणे मीच बंद केले होते. त्यामागे बरीच कारणे होती आणि मुख्य कारण मोठ्या वहिनींचे आजारपण आणि आईने तिची केलेली सुश्रुषा आणि देखभाल, हेच होते. दुर्दैव असे की, मोठया वहिनीला 2023च्या नोव्हेंबर महिन्यात देवाज्ञा झाली. यानंतर साधारण 2024च्या फेब्रुवारी महिन्यात भारत भेटीचा…
मानसी देशपांडे लेखनाचं जग हे किती सुंदर आहे हे मला व.पु. काळे यांचे विचार वाचल्यावर समजलं. तसं कवितेचं जग हे देखील तितकंच भावस्पर्शी आहे, हे शांता शेळके यांच्या कविता वाचून समजलं. जी व्यक्ती प्रेमात पडते त्यांचं विश्व हे किती रंगीबेरंगी असतं, तिथे क्षणिक रुसवे-फुगवे देखील असतात. कारण, प्रेमाच्या या जगात जितका सहवास महत्वाचा आहे, तितकंच एखादी व्यक्ती जेव्हा काही क्षणांसाठी जरी दूर होते, तेव्हा निर्माण होणारी हूरहूर सुद्धा लक्षात घेतली जाते. व.पु. या वर म्हणतात, “प्रतिक्षेचा क्षण नेहमीच मोठा असतो…” कसं असतं, प्रेमात वचनं असतात, जाणीवा असतात तसंच काही भेटी या नि:शब्द करणाऱ्या असतात. तुमची जवळची व्यक्ती तुमच्या समोर उभी…
शैलजा पुरोहित “आधी कळस मग पाया रे।” गाण्यातील ही उफराटी रीत पाहून मला खरंतर हसूच आलं. त्या कवीचं तरी काय चुकलं? सध्याच्या युगाची हीच रीत आहे, सर्वजण दिमाखात उभ्या असलेल्या, चमचमणाऱ्या कळसाला भुलतात. ज्या भक्कम पायावर तो कळस उभा असतो, तो मात्र त्यांच्या खिजगणतीतही नसतो. कळस डळमळू लागला की, प्रत्येकाला वाटतं याचा पाया पक्का असायला हवा होता. ज्याच्यावर एखादी गोष्ट स्थिरपणे उभी राहते तो पाया! आपल्या शरीराचा भार नि तोल सांभाळतात ते पाय! आम्हां दोघांमध्ये एका कानाचा फरक आहे. आमचं स्वरूपही वेगळं आहे, तरी आम्हा दोघांचे कार्य एकच आहे. आधारभूत होणं आणि स्थैर्य देणे! आपण ज्या घरात राहतो त्याचंच बघा…
मनोज पुष्पा, स्त्री, गोलमाल, सिंघम, मर्दानी, भूलभुलैया, ओह माय गॉड, जुडवा-2’ अशा अनेक सिक्वेल सिनेमांची बॉलिवूडमध्ये मोठी परंपरा आहे. नेटवर सर्च करताना ‘हंटरवाली’ (1935) आणि ‘हंटरवाली की बेटी’ (1943) हे दोन पहिले सिनेमे (सिक्वेल) असल्याची माहिती मिळाली. पण ‘जुडवा’ सिनेमांची परंपरा देखील बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत जुनीच आहे. ‘जुडवा’ म्हणजे संपूर्ण कथानकाचा किंवा स्टोरीलाइनचा जशाच्या तसा वापर. सर्वाधिक चर्चेत राहिलेला 1991 सालचा ‘दिल है के मानता नहीं’ या चित्रपटाचं कथानक पूर्णपणे उचललेलं आहे. हा सिनेमा राज कपूर आणि नर्गिस अभिनित ‘चोरी चोरी’ या पिक्चरची फ्रेम-टू-फ्रेम कॉपी आहे. यावर त्यावेळी खूप चर्चा झाली. इतकंच काय ‘दुसरे के बाप को अपना बाप…
नमस्कार मी हर्षा गुप्ते! अभिनेत्री आहे. माझा एक छान अनुभव शेअर करायचाय. हा विषय श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असा धरूच नका. एक मुलगा आहे… त्याचं असं म्हणणं आहे की, त्याला काही संकेत मिळतात. ते तो सगळ्यांना नाही सांगू शकत. पण मेसेज म्हणून तो मला फक्त काही शब्द पाठवतो आणि मी अंदाजाने वाक्य बनवते. खूप भयानक गोष्टी असतात त्या. उदाहरण द्यायचंच झालं तर… ऋषी कपूर गेले तेव्हा, त्यांचा आत्मा तो मृत्यू स्वीकारायला तयारच नव्हता. इरफान खान गेला तेव्हा, त्यांचा आत्मा थोडासा गोंधळलेला… की हे काय झालं! पण तेवढ्यात त्याला त्याच्या ओळखीचे काही आत्मे दिसले आणि त्याने त्याचा मृत्यू लगेच स्वीकारला. बरं, हा…
आराधना जोशी काही व्यक्तींचं या पृथ्वीतलावर असणंही मनाला समाधान देणारं, धीर देणारं असतं. डॉ. स्नेहलता देशमुख मॅडम यांचं असणं माझ्यासाठी त्याच भावनेचं होतं. 29 जुलै 2024 रोडी मॅडमचं प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याची बातमी समजली आणि एक आधार हरपल्याची जाणीव झाली. डॉ. स्नेहलता देशमुख मॅमशी माझी पहिली भेट झाली ती 1996 साली मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात. त्यावर्षी मराठी वाङ्मय विषयात विद्यापीठात पहिली आल्यामुळे देशमुख मॅडमच्या हस्ते दोन सुवर्णपदके स्वीकारण्याचे भाग्य मला लाभले. त्यावेळी त्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या. पदवीदान समारंभात त्यांच्या मंद हास्यावर, चेहऱ्यावर दिसून येणाऱ्या बुद्धीच्या तेजावर आणि तरीही अतिशय मृदू स्वरात समोरच्याशी संवाद साधण्याच्या त्यांच्या लकबीवर मी फिदा झाले…
दिप्ती चौधरी डंपर मुळचाच अतिशय सज्जन आणि प्रेमळ. कोणी बाजूला आले तर, आपले खाणेही तो देऊन टाकणार. कधी कोणी आजारी असेल दुखापत झाली असेल तर, जाऊन चाटणार, सहनुभूतीने बघणार. पण जेव्हा डंपरही वयात आला, तेव्हा प्रश्न अधिकच गंभीर झाला. प्राणीराज्याच्या नियमानुसार आतापर्यंत मित्र असणारा डिगर ही डंपरच्या जीवावर उठला! डंपर मुळातच सौम्य स्वभावाचा आणि अतिशय चपळ. त्यामुळे त्याने त्याच्या पुरता प्रश्न सोडवला. त्याने जमिनीवर राहणे सोडून दिले! इमारतीच्या खिडक्यांना लावलेल्या ग्रिल्सवरून तो दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावर चढून जायचा. खिडक्यांवरच्या आडव्या छतावर पडून खालचा अंदाज घेत बसायचा. मधेच एका रिकाम्या घराची खिडकी उघडून तिकडे मुक्काम हलवला. रोज सकाळी त्याचा आणि डिंपल आंटीचा कलगीतुरा…
अर्चना कुलकर्णी आमचं जळगाव…! खानदेशातील एक टुमदार शहर..! आमच्या लहानपणापासून, नव्हे त्याही पूर्वीपासून जळगावचे शैक्षणिक वातावरण खूपच समृद्ध होते. अनेक खासगी शाळा, नगरपालिकेच्या शाळा मोठ्या स्वच्छ व सुंदरही होत्या. सर्व शाळांचे स्वतःचे विस्तीर्ण क्रीडांगण होते. माझी शाळा, भगीरथ इंग्लिश स्कूल. आर्थिक दृष्टीने विचार केला तर माझी शाळा खूपच गरीब होती. भाड्याच्या टुमदार इमारतीत तळमजल्यावर मुख्याध्यापकांचे कार्यालय, शिक्षकखोली, सहा वर्गखोल्या तर पहिल्या मजल्यावर दहा-बारा वर्गखोल्या होत्या. पहिल्या मजल्यावरच्या इमारतीच्या दर्शनी भागात असलेल्या बाल्कनीला ठिकठिकाणी लाकडाच्या ओंडक्यांचे टेकू लावले होते, जे शाळेचे (खानदेश एज्युकेशन सोसायटीची) आर्थिक परिस्थिती पोटतिडिकीने कथन करीत होते. आमच्या शाळेची आर्थिक परिस्थिती जरी नाजूक होती तरी, खूप चांगले मुख्याध्यापक,…
मंदार अनंत पाटील एकेदिवशी रात्री बाबांनी कामावरून येताना अचानक माझ्याकरिता एक पांढरे आणि तपकिरी ठीपके असलेले अतिशय सुंदर आणि गुटगुटीत गावठी पिल्लू आणले. माझा आनंद गगनात मावेना… माझ्यासाठी फार अनपेक्षितच होते. एक-दोन महिन्यांचे गोंडस असे ते पिल्लू होते. मी लगेचच माझ्याकडे जमविलेले सामान वापरून त्या पिल्लाकरिता गादी आणि इतर गोष्टी नीट मांडून ठेवल्या. ते पिल्लू आई आणि भावंडापासून वेगळे झाल्यामुळे तसेच, नवीन वातावरण असल्याने भांबावून गेले होते. पण मायेने जवळ केल्यावर ते थोड्याच वेळात छान रुळले. खाऊ-पिऊ झाल्यानंतर मात्र त्याला आई आणि भावंडाची आठवण येऊ लागली… ते जे रडायला लागले ते निस्तरताना आमच्या नाकीनऊ आले. कशीबशी एक रात्र काढली आणि…
