Author: Team Avaantar

सुनील पानसरे भाग – 2 माझे पूर्वाश्रमीचे सहकारी सरदेसाई यांच्या विनंतीनुसार मी श्री. स्वामी (सरदेसाई यांचा वृद्ध मित्र) यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सरदेसाई यांनी सांगितल्याप्रमाणे स्वामी ज्या परिसरात राहात होते, त्या भागात मी आधी अनेक वेळा गेलो होतो, पण आज परिस्थिती थोडी वेगळी होती. मी जर एका वयोवृद्ध व्यक्तीबद्दल चौकशी करू लागलो तर, इथल्या लोकांना ते पचनी पडेल की नाही, याची मला कल्पना नव्हती. यात एक अशी भीती होती की, कोणाला तरी भलताच संशय यायचा! पण माझ्या या शोधाला यश आले. एका किराणा दुकानदारामुळे ते कुठे राहतात हे समजले. पण त्यांना मागील तीन-चार दिवसांत स्वामी दिसले नव्हते… काहीतरी वाईट घडलं…

Read More

मंदार अनंत पाटील 18 जुले 2024…. अखेर तो दिवस उजाडलाच… 18 वर्षांची प्रतीक्षा आज संपणार होती. हिथरो एअरपोर्टला पोहोचलो आणि विमान लँड झाले असे समजले. साधारणत: इमिग्रेशन आणि बाकी प्रोसेसला एक-दीड तास लागायची शक्यता होती, म्हणून तिथेच बाहेर बसकण मारली…आणि शांत पावलं टाकीत, अगदी विलेपार्ले मार्केटमध्ये फेरफटका मारून घरी परत येत असल्याच्या अविर्भावात आई आली! तिच्या चेहऱ्यावर तेच हसू… मी पाया पडल्यावर नेहेमीप्रमाणे हात जोडून आशीर्वाद दिला. पहिले काही क्षण तर आई खरंच आली आहे, यावर विश्वासच बसत नव्हता. पण हळूहळू ती पण रिलॅक्स झाली. आज लंडनमधली पहिली सकाळ झाली. आई. सवयीप्रमाणे लवकरच उठली. मी पण लवकरच जागा झालो. सकाळचा…

Read More

मनोज जोशी कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकीजा’ चित्रपट हा हिंदी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड म्हटले तर, ते गैर ठरणार नाही. हा चित्रपट कमाल अमरोही यांच्यासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता. त्यामुळे त्यांनी जे जे उत्तम (त्या काळी) होते, ते उभे केले होते. या चित्रपटाच्या सेटपासून संगीतापर्यंत सर्वच भव्यदिव्य होते. अनेक अडचणींवर मात करत हा चित्रपट बनला. ‘पाकीजा’ चित्रपट बनायला तब्बल 15 वर्षं  लागली. 17 जानेवारी 1957 रोजी या गाणी रेकॉर्ड करून कमाल अमरोही यांनी या चित्रपटाची सुरुवात केली होती. तर, प्रत्यक्षात हा चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शित व्हायला 4 फेब्रुवारी 1972 ही तारीख उजाडली.  तत्पूर्वी, 3 फेब्रुवारी 1972 रोजी प्रसिद्ध मराठा मंदिरमध्ये याचा भव्य प्रीमियर…

Read More

नमस्कार मी हर्षा गुप्ते. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेय. 3 मार्च 2000. रविवार होता. आज त्याला 25 वर्षं झाली. घरात कामाची लगबग सुरू होती. दुपारची वेळ आमची पाणी भरायची, जेवणाची. त्यात टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुरू होती. माझी मुलगी लक्ष्मी तीन वर्षांची आणि मुलगा अद्वैत 10 वर्षांचा. त्याच्या मित्राचा वाढदिवस होता. त्याला लवकर आवरून तिथे जायचं होतं… आणि लेकीला कार्टून बघायचं होतं. बाप-लेकीमध्ये भांडण सुरू होतं. बाबाला मॅच बघायची होती आणि हिला कार्टून. तेव्हा माझं म्हाडाचं घर होतं. छप्पर म्हणून सिमेंटचा पत्रा (asbestos) होता. एसीचे कूलिंग जाणवत नसल्याने आम्ही सिमेंटच्या पत्र्यावर लाल कौलं घातली होती. माझ्या शेजारी रीकन्स्ट्रक्टचं काम सुरू होतं.…

Read More

जयश्री महाबळ – ताम्हनकर 8 मार्च, जागतिक महिला दिन. महिलांसाठी विशेष दिवस. नुकताच तो सर्वत्र उत्साहात साजरा झाला. या विशेष दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित केले गेले. तसे हे दरवर्षीचेच आहे. महिलांचा सन्मान, प्रेरणा, नेतृत्व – असे सकारात्मक शब्द वर्तमानपत्रात प्रकर्षाने झळकत असतात. त्याचबरोबर हिंसाचार, अत्याचार आणि महिलांची सुरक्षा असेही शब्द तितक्याच ताकदीने पुढे सरसावत असतात. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचे कर्तृत्व आणि योगदानाला सलाम केला जातो, पण समाजातील काही विकृत आणि पाशवी वृत्तीमुळे महिलांची अवहेलना तसेच छळ आजही थांबलेला नाही. अशा परिस्थितीत दोन प्रश्न मनात नक्कीच डोकावतात. ते म्हणजे – महिलांचे सबलीकरण खरंच झाले आहे का? आणि महिला खरंच सुरक्षित आहेत…

Read More

मंदार अनंत पाटील साधारण 2006च्या सुमारास उच्च शिक्षणाकरीता लंडनला जायचा योग आला आणि साधारण 2007पर्यंत शिक्षण, नोकरी आणि यूकेमधील जीवन यामुळे फारसा वेळ मिळाला नाही, परत प्राणी सांभाळायला. पण 2008च्या सुमारास लंडनमध्ये बॅटरसी डॉग होम नावाची सेवाभावी संस्थेबाबत माहिती समजली. ही संस्था अनाथ आणी दुर्लक्षित प्राणी-पक्षी यांना सहारा देते आणि पुनर्वसन करते. तिथली उत्तम व्यवस्था, प्रत्येक प्राणी-पक्षीकरिता नेमलेले स्वयंसेवक, अतिशय कमालीची स्वच्छता आणि कामाचे नियोजन पाहता, आपणही काही हातभार लावावा, असे वाटले. मासिक डोनेशन भरून सुरुवात केली. मनाला एका मुक्या जिवाला मदत केल्याचे समाधान मिळत होते. नंतर यथावकाश 2019मध्ये प्रथमच पक्षी आणले गेले आणि हे माझे परदेशातले पहिले सखेसोबती झाले.…

Read More

आराधना जोशी माझी लेक आता मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला आहे. परीक्षा आटोपल्या आहेत आणि कॉलेजच्या मैत्रिणींसोबत ती उत्तर भारतात ट्रिपला गेली आहे. वर्षं कशी सरसर गेली हे कळलंच नाही. आता घरात गप्पा मारताना तिचे काही किस्से आठवले… प्रसंग पहिला टीव्हीवर डान्स रिअ‍ॅलिटी शो बघणं सुरू होतं. ब्रेकमध्ये कामं आटोपायच्या मागे मी होते. तेवढ्यात आमच्या कन्यका धुसफुसत स्वयंपाकघरात आल्या. मिनीटभरापूर्वी व्यवस्थित असणाऱ्या तिला अचानक काय झालं, ते मलाच कळेना. आधी वाटलं मोबाइलवर कोणत्या तरी मैत्रिणीशी चॅटिंग करताना काहीतरी वाद झाला असेल. पण तरी चौकशी केली की, नक्की झालं काय? कन्यका फणकारून म्हणाली, “या जाहिरातवाल्यांना आणि त्यातल्या कलाकारांना काही कॉमन सेन्सच नाहीये. काहीही…

Read More

दिप्ती चौधरी बंगलोरला जाण्यासाठी आमची गाडी निघाली. प्रवास मोठा होता त्यामुळे त्या छोट्या पिंजऱ्यात आम्हाला ठेवणे शक्य नव्हते.  त्यांच्याकडील मोठ्या पिंजऱ्यात आम्हाला ठेवणे भाग होते. वाटेत अदलाबदल करू असे ठरवून गाडी निघाली आणि आमच्या जन्मभूमीला… मुंबईला…. त्या सोसायटीला… आणि दुरून आम्हाला बघणाऱ्या डिगरला आम्ही अखेरचा दंडवत केला… एक आयुष्य मुळापासून बदलून टाकणारे वळण घेऊन आमचा प्रवास सुरू झाला..! जवळ-जवळ चोवीस तास प्रवास करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बंगलोरला पोहोचलो. प्रवासात आई सतत फोनवरून संपर्कात होतीच. आम्ही इमारतीत पोहोचताच आई आणि दिदी धावतच खाली आल्या. आमचा पिंजरा गाडीतून काढतच होते… आमचं पहिलं दर्शन आईला झालं तेव्हा मी पाय मुडपून बसलो होतो…

Read More

नितीन अ. गोखले पुण्यातील एका रुग्णालयात माझ्या वडिलांच्या बेडजवळ बसलो होतो. त्यांना स्ट्रोक आल्यावर त्यातून बाहेर येण्यासाठी ते संघर्ष करत होते. माझ्या नजरेसमोरच ते होते. पण त्यावेळी भावनांचा कल्लोळ मनात सुरू होता… एकीकडे असहाय्यतेची भावना आणि दुसरीकडे जुन्या आठवणी. वैद्यकीय उपचारांशिवाय काहीही करू शकत नसल्यामुळे मी हतबल होतो. अशा परीस्थितीत मनात जुन्या आठवणींचे हिंदोळे सुरूच होते. कारण, 81 वर्षीय दादा (कितीही आधुनिकपणा असला तरी त्यांना ‘डॅड’ म्हणू शकत नाही) आणि माझे आजोबा यांच्यात खूप साम्य भासत होते. हेच आठवणींचे हिंदोळे माझे दोन्ही आजोबा, म्हणजे वडिलांचे वडील आणि आईचे वडील, यांच्यापर्यंत पोहोचले आणि मी भूतकाळातच गेलो. सुरुवातीला मला प्रश्न पडला की…

Read More

सुनील पानसरे भाग – 1 माझ्या एक्स्टेंशनची रिंग वाजली. पण ती रिंग नेहेमीची नव्हती. कदाचित बाहेरचा कॉल असावा, असं म्हणत मी तो उचलला. सरदेसाई सर? लँडलाईनवरून? मी विचार करत होतो की, त्यांना का बरं मला लँडलाईनवर कॉल करावा लागला असेल! सर, माझे पूर्वाश्रमीचे सहकारी आहेत. फोनवर बोलताना ते गंभीर वाटत होते, त्यामुळे मी त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली. त्यांच्या एका वृद्ध मित्राचा, श्री. स्वामी यांचा, मागील चार दिवसांपासून काहीच मागमूस नव्हता. त्यांचा फोन पण वाजून वाजून बंद झाला होता बहुतेक त्याच दुपारी. सरदेसाई सरांना वाटलं की, कदाचित स्वामी यांचं घर माझ्या जुन्या घराजवळच असावं (मला नंतर समजलं की, त्यांचं…

Read More