Author: Team Avaantar

मनोज जोशी भाग -1 किन्नर अर्थात तृतीयपंथी. यांच्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते, वेगवेगळ्या भावना असतात. बहुतांश लोकांच्या मनात भीती असते. त्यांच्या शिव्याशाप वाईट असतात, असा काहींचा समज आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये ते समोर येताच, काहींची अस्वस्थपणे चुळबूळ सुरू होते; विशेषत:, बायकांची! किन्नरांना पाहताच काहीजण लगेच पाकिटातून पैसे काढून हातात ठेवतात आणि किन्नर जवळ येताच, त्यांना ते पैसे देऊन टाकतात; तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा भाव असतो. काहीजण त्या समोर येताच, इथं-तिथं पाहायला लागतात. तर, काहींच्या दृष्टीनं त्या केवळ टिंगल करण्याचा विषय असतात. मी सुद्धा त्यांच्याकडं बघायचं टाळत होतो. एखादा तृतीयपंथी समोर आला की, सरळ मान हलवून पुढे जा सांगत असे किंवा इथं-तिथं पाहात…

Read More

मंदार अनंत पाटील आई 18 जुले 2024 रोजी अखेर लंडनला आली. माझी 18 वर्षांची प्रतीक्षा संपली. ती येण्यापूर्वी लंडनदर्शनाचे नियोजनही केले होते. त्यानुसार स्वामी नारायण मंदिर, बकिंगहॅम पॅलेस, रॉयल म्युझियम, ग्रीन पार्क, लंडन आय, लंडन एक्वेरियम, लंडन ब्रीज अशा अनेक स्थळांना भेटी दिल्यावर सहजच मेडनहेड मत्स्यालयात जायचा योग आला. येथे घरातील मत्स्यालयासाठी लागणारे विविध सामान मिळते. तसेच येथे एक खूप मोठी पाण्याची टाकी आहे आणि कोय जातीचे मासे त्यात सोडले आहेत. आपण त्यांना खाणे टाकू शकतो. हे दुसरे मत्सालय होते. आता गणपती आणि श्रावण मासाचे वेध लागले होते. आई येताना जिवतीचा कागद घेऊन आली होती. सोबत सत्यनारायणाची पूजा-पोथीही आणली होती.…

Read More

संगीता भिडे (कमल महाबळ) चैतराचा गं वसंत येई हसत नाचत पाना फुलांना बहर, आनंदाला येई पूर॥ मधुप गुंजन, कोकिळ कूजन तनमनात नर्तन, धरती झाली गं संपन्न॥ चैतराचे सुख, दारी आला गं वैशाख उभा पेटला वणवा, त्याचा दाह गं साहिना॥ ज्येष्ठ आषाढाचा ग्रीष्म, भेगाळले अंग अंग दाह साहू मी किती, दुभंगले अंतरंग॥ डोळे लागले आषाढी, झाली मेघांची गं दाटी बरसला गं श्रावण, धरतीला ये नहाण॥ ल्याली वर्षा राणी, हिरवा शालू भरजरी सजली, नटली, जणु नवीन नवरी॥ हातीं पुष्पमाला शरदाला गं वरी पिऊनी चांदणे, रोमांचली रोमरोमी॥ सुगीचे दिस, धान येई शीगोशीग स्वागतास सिद्ध, बाळ आला गं हेमंत॥ पाहताच बाळलीला, हरखली गं धरणी…

Read More

आराधना जोशी साल 2007. झी मराठीबरोबर 2003पासून ‘नमस्कार झी मराठी’ या फोन इन कार्यक्रमामुळे जुळलेले ऋणानुबंध कार्यक्रम बंद झाल्यामुळे संपुष्टात आले होते. झी 24 तास या वृत्तवाहिनीत येण्यासाठी संबंधितांनी सुचवले होते. मात्र शिफ्ट ड्यूटी आणि लहान मुलगी यामुळे नकार दिला होता. त्यामुळे फेब्रुवारीपासून नव्या नोकरीच्या शोधात होते. एके दिवशी पत्रकारितेतील माझे गुरु प्रकाश अकोलकर सरांचा फोन आला. “सध्या काय करतेयस? माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्रपोजल आहे. लेखिका कविता महाजन यांना त्यांच्या प्रोजेक्टसाठी मदतनीस हवी आहे. तुझं नाव मी सुचवलं आहे. तू त्यांना जाऊन भेट. मी नंबर पाठवतो. तू त्यांच्याशी बोलून घे,” असा निरोप सरांनी दिला. लगेच कविता मॅडमचा नंबरही पाठवला. मी…

Read More

यश:श्री थोर विदुषी दुर्गा भागवत यांचे वडील, नारायण भागवत तसेच त्यांचे सहकारी कपिलराम वकील यांच्या ‘डालडा’वरील संशोधनाबद्दलची एक कथा अतिशय रोचक आहे. नारायण भागवत 1920च्या सुमारास टाटांच्या ऑइल कंपनीत मॅनेजर होते. तर, कपिलराम वकील हे डायरेक्टर होते. (कपिलराम वकिलांनी पुढे ‘ओखा सॉल्ट वर्क’ सुरू केले आणि नंतर टाटांनी ते विकत घेतले. त्याला आता मिठापूर असे नाव पडले आहे.) या ऑइल कंपनीचे मालक सर दोराबजी टाटा होते. त्यावेळेला या दोघांनी मिळून एक नवा प्रयोग चालविला होता; जगात तोपर्यंत तो सिद्ध झालेला नव्हता. तो प्रयोग म्हणजे म्हणजे ‘डालडा’ तुपाचा. नारायण भागवत आणि कपिलराम शर्मा यांच्या खालोखाल जपानला यात थोडंफार यश मिळालं होतं.…

Read More

मनोज जोशी कोंबडी आधी की अंड आधी? या प्रश्नाप्रमाणेच टीव्ही चित्रपट या माध्यमांचा जनमानसावर परिणाम होतो, की समाजात घडणा-या घटना लहान-मोठ्या पडद्यावर दाखविल्या जातात? हा देखील ठोस उत्तर नसलेला प्रश्न आहे. अलीकडे काही गुन्हे टीव्हीवरील गुन्हेगारीवर आधारित मालिका पाहून घडल्याचेही समोर आले आहे. तर दुसरीकडे, प्रेमापोटी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरवर चित्रपट तयार होत आहे. पबजी गेम खेळतान सचिन मीणाशी तिचे सूत जुळले आणि ती आपल्या चार मुलांना घेऊन ती नेपाळमार्गे भारतात आल्याचे सांगण्यात येते. काही वर्षांपूर्वी अभिनेते विजू खोटे यांच्याशी गप्पा मारताना, सहज हा विषय छेडलला होता. पण त्यांनी याबाबत चांगलं मत मांडलं आहे. ते म्हणाले, चित्रपटाचा जनमानसावर निश्चितच…

Read More

चंद्रशेखर माधव आमच्या लहानपणी, म्हणजे साधारण 1982-85च्या दरम्यान, दर दिवाळीत आम्ही कापड आणून ते शिवून घेत असू. शर्ट आणि पॅंटचे एकाच प्रकारचे कापड घ्यायचे आणि वडील, मुलांनी त्या कापडाचे कपडे शिवायचे अशी एक फॅशन त्या काळात प्रचलित होती. तयार कपडे घेण्याची फारशी पद्धत नव्हती. सुमारे 1988-90नंतर तयार कपडे घेण्याचे प्रमाण वाढले. माझ्या घरची परिस्थिती अगदी गरिबीची निश्चितच नव्हती, पण खिशात खूप पैसा खेळत होता, असंही नाही. त्यामुळे वडील जे घेऊन देतील ते समाधानाने स्वीकारायचं, असा शिरस्ता अंगवळणी पडला होता. दर दिवाळीला, कापड घेण्याच्या वेळी, आमचे वडील मला आणि माझ्या मोठ्या भावाला बरोबर घेऊन जात. कापड घ्यायचे म्हटले की, आमची नेहमीची…

Read More

मंदार अनंत पाटील ब्रुस हा लॅब्रेडॉर जातीचा अतिशय लाघवी, खट्याळ आणि माझ्यावर विलक्षण प्रेम करणारा कुत्रा होता. माझा लहानपणापासूनचा मित्र अमेय महाजनचा तो श्वान. 2017 साली पाच वर्षांनी मी भारतात आलो असताना एके दिवशी सहजच सकाळी सोसायटीबाहेरच पहिली भेट झाली. ब्रुस त्यावेळी जेमतेम चार महिन्यांचा असेल. पण अतिशय मस्तीखोर आणि खट्याळ होता. बघता क्षणीच आम्ही एकमेकांचे घट्ट दोस्त झालो. नंतर नंतर माझे वारंवार भारतात जाणे झाले. भारतातून लंडनला परत आल्यावर आणखी एक दणकट पण तितकाच लाघवी असा टायसन (रोटवीलर जातीचा) श्वान मला भेटला. तो माझ्या लंडनमधील सोसायटीतील टिबोर नावाच्या मुलाने दत्तक घेतलेला साडेतीन वर्षांचा पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेला श्वान. पहिल्या…

Read More

जी. भालचंद्र जवळपास सर्वांचाच बँकेशी संबंध येतो. कितीही ऑनलाइन व्यवहार झाले तरी, कुठे ना कुठे तरी बँक कर्मचाऱ्यांशी डोकं लावावंच लागतो. बँकांधील काही अनागोंदी कारभाराशी संबंधित ‘बँक व्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या करामती’ या सदरातील माझा दुसरा अनुभव आता कथन करीत आहे. हा अनुभव महाराष्ट्रीयन कुटुंबांना एकेकाळी जवळची वाटणाऱ्या एका राष्ट्रीयीकृत बँकेबाबतचा आहे. काही वर्षांपूर्वी माझी पत्नी आणि मी, आम्ही दोघांनी या बँकेच्या आमच्या घराजवळील शाखेत लॉकर उघडण्याचा निर्णय घेतला. लॉकर उघडण्यासाठी करावयाचे सर्व सोपास्कार आम्ही बँकेत पूर्ण केले. त्याचवेळी आम्ही बँकेला असे निर्देश दिले होते की, आमच्या लॉकरचे वर्षाचे भाडे आमच्या जॉइंट अकाऊंटमधून वळते करण्यात यावे. पहिली चार-पाच वर्षं लॉकर भाडे…

Read More

दिप्ती चौधरी दनूला बाहेर जाण्यात अजिबात रस नव्हता म्हणून दिदीने मला पट्टा घालून घरात फिरवायचा सराव सुरू केला. थोडे दिवस मी शिस्तीत फिरतो, हे बघून एका संध्याकाळी खालची गडबड कमी झाल्यावर थोडे उशिरा मला पट्टा घालून लिफ्ट समोर उभे केले. लिफ्ट आल्यावर मी दबकत आत शिरलो. काय होते काही कळेना, धक्का बसला आणि ती छोटीशी खोली अचानक खाली जायला लागली. चारी बाजूने बंद त्यामुळे मी खूप घाबरलो. इतक्यात पुन्हा धक्का बसून ते प्रकरण एकदाचे थांबले आणि समोर दरवाजा उघडून बघतो तो काय… जमीन! दरवाजासमोरील पायऱ्यांच्या बाजूला सुशोभित बाग होती. त्यात उंच झुडपांचे दाट जंगल होते… लपायला एकदम भारी जागा! मी…

Read More