Author: Team Avaantar

मंदार अनंत पाटील आई 18 जुले 2024 रोजी लंडनला आली होती. तिच्या या मुक्कातच गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली. एका शनिवारी जाऊन गणपतीची मूर्तीही ठरवून आली होती. मुंबईतील दादरप्रमाणेच गणरायाची मूर्ती आपल्या घरी येणार याचाच जास्त आनंद होता. त्यात आई देखील सोबत असणार म्हणजे दुधात साखरच!. पल्लवीची धावपळ सुरू झाली. डेकोरेशनसाठी. आईने देखील हौसेने कापडाचे तोरण बनवायला घेतले. या दोघींचा उत्साह बघून यावर्षीचा गणेशोत्सव दणक्यात होणार याची खात्रीच पटली मला! मी देखील लगबगीने तयारीला लागलो. आता वेध लागले ते श्रींच्या आगमनाचे. आई येथे आहे म्हणून दोन आठवड्यांची सुट्टीसुद्धा टाकली जेणेकरून सण व्यवस्थित साजरा करता येईल. आता जसजसा गणेशोत्सव जवळ येत होता,…

Read More

मनोज जोशी सर्वांच्या त्रासाला खूप कंटाळले… थेट रेल्वेस्टेशनवर धाव घेतली… गाडी येतच होती… मी रुळावर उडी घेणार इतक्यात तिनं मला धरलं आणि बाजूला घेऊन गेली… नंतर तिच्याबरोबरच मी मुंबईला आले… ईश्वरी सांगत होती. भाग – 2 ईश्वरी किन्नर (तृतीयपंथी) असून ती आंध्र प्रदेशातील आहे. तिथे राजमुंद्री जिल्ह्यात ती राहायची. तिच्या या ‘वेगळेपणा’मुळे गावातील टवाळ तिला चिडवायचे, त्रास द्यायचे. घरातही भावांकडून चांगली वागणूक दिली जात नव्हती. सुरूवातीला या सर्वांशी ती लढली, पण परिस्थिती बदलली नाही. म्हणूनच तिने स्वत:ला संपविण्याचा निर्णय घेतला. तिला रेल्वेस्टेशनवर वाचविणारी किन्नरच होती. तिने तिची समजूत घालत मुंबईला आणले. ईश्वरी आता विरारला राहते. ईश्वरीची झुंज सुरूच होती. वडिलांचे…

Read More

जी. भालचंद्र जवळपास सर्वांचाच बँकांशी संबंध येतो. कितीही ऑनलाइन व्यवहार झाले तरी, कुठे ना कुठेतरी बँक कर्मचाऱ्यांशी डोकं लावावंच लागतं. बँकांमधील काही अनागोंदी कारभाराशी संबंधित ‘बँक व्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या करामती’ या सदरातील माझा तिसरा अनुभव आता कथन करीत आहे. हा अनुभव अशा बँकेबद्दल आहे की, ज्या बँकेबरोबर माझा कोणत्याही प्रकारच्या बँकिंग व्यवहाराशी संबंध आलेला नाही. तरीपण बँकेच्या व्यवहारात (?) मी भरडून निघालो होतो. पंधरा वर्षांपूर्वी मी माझ्या घरी बीएसएनएलच्या टेलिफोनचं कनेक्शन घेतलं होतं. पण महिन्यातील 20 ते 22 दिवस टेलिफोन ‘आऊट ऑफ ऑर्डर’ रहात असल्यामुळे ऑगस्ट 2021मध्ये तो टेलिफोन मी बीएसएनएलला परत केला. नंतर घरात टेलिफोन कनेक्शन असावे म्हणून मी…

Read More

आराधना जोशी साधारण पाच वर्षांपूर्वी माझ्या मुलीच्या मैत्रिणीला मेडिकलसाठी प्रवेश मिळाला तो मुंबईबाहेर थेट अहमदनगरला. अर्थात, ही गोष्ट मला मुलीकडूनच समजली होती. ‘आई, निधीला अहमदनगरला अ‍ॅडमिशन मिळाली. पुढच्या महिन्यात ती तिथे जाणार आहे. इयत्ता पहिली ते दहावी शाळेत येताना-जाताना आम्ही एकत्रच होतो. खरंतर, ती माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठी आहे. तिची, माझी इयत्ता वेगवेगळी असायची. ती एक वर्ष पुढे होती. पण तरी मोकळ्या वेळेत कसला धुडगूस घालायचो आम्ही. आता ती एकदम वेगळ्या गावात जाणार…’ मुलीची टकळी सुरू होती. आपली मैत्रीण आता पुढच्या शिक्षणासाठी वेगळ्या गावात आणि हॉस्टेलवर राहणार, हे माझ्या लेकीने सहजपणे स्वीकारलं होतं. इतकंच नाही तर, पुढच्या वर्षी आपणही शिक्षणासाठी…

Read More

मंदार अनंत पाटील माझ्या आणि पल्लवीच्या मनात तसेच आयुष्यात कायमचा ठसा सोडून गेलेला आमचा लिओ. मी प्राणीप्रेमी असलो तरी मांजर पाळायचा योग कधीच आला नव्हता. पण पल्लवीच्या माहेरी मनू नावाची मांजर होती आणि तिच्या कितीतरी आठवणी पल्लवी नेहमी सांगायची. मी एकदा सहजच जेम्स बोवेन लिखित ‘A street cat named Bob’ नावाचे सुंदर पुस्तक वाचले आणि इतका भारावून गेलो की, सरळ जाऊन लिओला घेऊनच आलो. लिओला घरी आणले तो दिवस आषाढी एकादशीचा होता आणि आमचा विठोबा आमच्या घरी अवतरला. जिंजर म्हणजे तपकिरी रंगाचे अतिशय लोभसवाणे रुप लाभलेला आणि हाताच्या ओंजळीत मावेल इतका छोटा होता लिओ. घरी आल्यावर अगदी सगळं घर पालथं…

Read More

यश:श्री सध्या देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या महाराष्ट्रात सरकारी शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. मात्र, त्याला तामिळनाडूने कडाडून विरोध केला आहे. विशेषत:, तीन भाषांचे सूत्र त्यांना स्वीकारार्ह नाही. त्यांचा हा विरोध आताचा नाही. साधारणपणे 1930-40पासून तामिळनाडूची भूमिका ही हिंदी भाषेला विरोध आणि द्विभाषा सूत्राचा पुरस्कार अशीच राहिली आहे. याच सूत्रासाठी तिथे मोठी आंदोलनेही झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर ख्यातनाम साहित्यिक दुर्गा भागवत यांचा एक लेख वाचनात आला होता. त्यात त्यांनी आपल्या प्राचीन शिक्षण पद्धतीबद्दल महात्मा गांधी यांचे विचार मांडले आहेत. भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी सनातन परंपरेने पाठशाळांमधून जे शिक्षण दिले…

Read More

चंद्रशेखर माधव एक काळ होता आम्हा दोन-तीन मित्रांना, दर शुक्रवारी रात्री शनिशिंगणापूरला जायचं… पहाटे दर्शन घ्यायचं आणि शनिवारी दिवसा पुण्यात परत यायचं, अशी एक सवय लागली होती. आमच्यातला एक मित्र शनिशिंगणापूरचा भक्त होता. खरंतर, त्याला दर्शन घ्यायचं असायचं, पण आमच्यासाठी ती एक प्रकारे सहलच असायची. असंच एकदा शुक्रवारी शनिशिंगणापूरला निघालो शनिवारी पहाटे पोहोचलो. पार्किंगमध्ये असंख्य वेगवेगळे स्टॉल आहेत, जिथे सर्व पूजा साहित्य मिळतं. त्यापैकीच हॉटेल आणि स्टॉल एकच होतं, त्या ठिकाणी आम्ही सगळे गप्पा मारत बसलो. आमचा एक मित्र अगदी शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे ओल्या वस्त्राने दर्शनाला जात असे. आम्ही तितकेसे भक्त नव्हतो कदाचित, त्यामुळे आम्ही मात्र लांबूनच कोरड्या आणि पूर्ण…

Read More

दिप्ती चौधरी दनूला बाहेर जाण्यात अजिबात रस नव्हता म्हणून दिदीने मला पट्टा घालून घरात फिरवायचा सराव सुरू केला. एका संध्याकाळी खालची गडबड कमी झाल्यावर थोडे उशिरा मला पट्टा घालून लिफ्टने खाली नेले. दरवाजासमोरील पायऱ्यांच्या बाजूला सुशोभित बाग होती. त्यात उंच झुडपांचे दाट जंगल होते… लपायला एकदम भारी जागा! मी त्या किर्र झुडपांच्या जंगलात शिरलो… माझा पट्टा आई आणि दिदी ओढत होत्या. त्यामुळे अजून एक फायदा झाला… पट्ट्याला ओढ असल्याने मी आधी डोक्याचा आणि नंतर पोटाचाही वेढा मस्तपैकी काढून टाकला… आणि त्या झुडपात अंतर्धान पावलो! आईने डॉ. इरफान अहमद यांची मदत घेऊन माझा पुन्हा ताबा घेतला. मला फिरायला खाली नेण्याबद्दल चांगलीच अद्दल…

Read More

मनोज जोशी भाग -1 किन्नर अर्थात तृतीयपंथी. यांच्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते, वेगवेगळ्या भावना असतात. बहुतांश लोकांच्या मनात भीती असते. त्यांच्या शिव्याशाप वाईट असतात, असा काहींचा समज आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये ते समोर येताच, काहींची अस्वस्थपणे चुळबूळ सुरू होते; विशेषत:, बायकांची! किन्नरांना पाहताच काहीजण लगेच पाकिटातून पैसे काढून हातात ठेवतात आणि किन्नर जवळ येताच, त्यांना ते पैसे देऊन टाकतात; तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा भाव असतो. काहीजण त्या समोर येताच, इथं-तिथं पाहायला लागतात. तर, काहींच्या दृष्टीनं त्या केवळ टिंगल करण्याचा विषय असतात. मी सुद्धा त्यांच्याकडं बघायचं टाळत होतो. एखादा तृतीयपंथी समोर आला की, सरळ मान हलवून पुढे जा सांगत असे किंवा इथं-तिथं पाहात…

Read More

मंदार अनंत पाटील आई 18 जुले 2024 रोजी अखेर लंडनला आली. माझी 18 वर्षांची प्रतीक्षा संपली. ती येण्यापूर्वी लंडनदर्शनाचे नियोजनही केले होते. त्यानुसार स्वामी नारायण मंदिर, बकिंगहॅम पॅलेस, रॉयल म्युझियम, ग्रीन पार्क, लंडन आय, लंडन एक्वेरियम, लंडन ब्रीज अशा अनेक स्थळांना भेटी दिल्यावर सहजच मेडनहेड मत्स्यालयात जायचा योग आला. येथे घरातील मत्स्यालयासाठी लागणारे विविध सामान मिळते. तसेच येथे एक खूप मोठी पाण्याची टाकी आहे आणि कोय जातीचे मासे त्यात सोडले आहेत. आपण त्यांना खाणे टाकू शकतो. हे दुसरे मत्सालय होते. आता गणपती आणि श्रावण मासाचे वेध लागले होते. आई येताना जिवतीचा कागद घेऊन आली होती. सोबत सत्यनारायणाची पूजा-पोथीही आणली होती.…

Read More