Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
मनोज जोशी कधी-कधी आयुष्यात अशी एखादी अनपेक्षित घटना घडते की, त्याची नंतर आठवण जरी आली तरी, मन दडपून जाते… आणि मग हसू देखील येते. अशीच 1993 सालची एक घटना येथे शेअर करतो. 1982मध्ये गिरगाव सोडून अंधेरीला रहायला आल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पार्ले कॉलेजमध्ये (आताचे साठ्ये कॉलेज) झाले. एफवायला एका मुलाने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तो माझ्याच वर्गात आला. तो आणि मी एकाच बेंचवर बसत होतो. आमची चांगली मैत्री जमली. नंतर-नंतर आमची जोडी कॉलेजमध्ये फेमस झाली. मी एकटा दिसल्यावर, त्या मित्राची चौकशी माझ्याकडं व्हायची अन् तो एकटा दिसला तर, माझी चौकशी त्याच्याकडं व्हायची. एफवाय झालं, एसवायच्या फायनल एक्झाममध्ये त्याला कॉपी करताना पकडलं…
दिप्ती चौधरी आमच्या पप्पांची बदली अमेरिकेला झाली आणि सगळं चंबूगबाळं उचलून त्या अनोळखी जगात स्थलांतराची तयारी सुरू झाली… कोरोना या जागतिक महामारीमुळे त्यावेळी जरी विमानसेवा सुरू असली तरी, खूप कमी प्रमाणात. Cargo विमानाने जसे सामान पाठवतात, तसे आम्हाला एकट्याला पाठवण्याचा पर्याय होता. सामानाची ने-आण करणाऱ्या विमानातही खास प्राण्यांना ठेवण्यासाठी वातावरण नियंत्रित कप्पा असतो. तिथून प्रवास करायचा… पण त्यासाठी देखील आगाऊ बुकिंग करावे लागते. कुठल्याही विमान प्रवासाआधी प्राण्यांची शारीरिक तपासणी करून ‘fit to fly’ असे प्रमाणपत्र प्राण्यांच्या डॉक्टरकडून घ्यावे लागते. मग विमानतळावरील कस्टमच्या कचेरीत जाऊन सर्व कागदपत्रे दाखवून, मायक्रोचीप तपासून त्यांच्या काही औपचारिकता पार पाडाव्या लागतात. हे सर्व विमान प्रवासाच्या बरोबर…
आराधना जोशी कपड्यांच्या एका ब्रॅण्डेड आऊटलेटमध्ये जाण्याचा नुकताच योग आला. हो हल्ली कपड्यांच्या दुकानांपेक्षा आऊटलेटमध्ये जाऊन खरेदी करण्याचं फॅड वाढलं आहे. आऊटलेटमध्ये तरुणवर्गाची गर्दी. बहुतेकजण मित्र-मैत्रिणींबरोबर खरेदीला आले होते. त्यांच्या आपापसात होणाऱ्या गप्पांमधून लक्षात आलं की, आता कॉलेजला सुट्टी असली तरी आऊटिंग करायला जाताना नवीन वॉर्डरोब असावा, यासाठी ही गर्दी होती. अनेकजणांना दर सहा महिन्यांनी आपला वॉर्डरोब बदलण्यात इंटरेस्ट असतो तर, काहींना विशिष्ट ब्रॅण्डचेच कपडे वापरायचे असतात. गंमत म्हणजे, कपडे खरेदी नेमकी कोणत्या ठिकाणाहून केली, हे जगाला दाखवण्यासाठी त्या-त्या आऊटलेटच्या कॅरी बॅगही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. काही वर्षांपूर्वी एका संस्थेकडून तरुण वर्गात ब्रॅण्डची क्रेझ किती आहे, याबाबत एक सर्वेक्षण करण्यात…
मनोज जोशी ‘वडा’! हा शब्द नुसता कानावर पडला तरी, तोंडाला पाणी सुटतं. एकेकाळी मी रोज वडा खाणारा. नंतर नंतर, ‘साखर कारखानदार’ झाल्यानंतर सर्वच जण दम देत होते, अगदी घरच्यांपासून मित्र-मैत्रिणींपर्यंत. पण मन काही ऐकत नव्हतं. तथापि, अलीकडे मी वडा खाणं पूर्णपणे बंद केलंय. लहानपण गिरगावात गेलं. त्यावेळी आमच्या गल्लीच्या नाक्यावर सिनकर हा वडापावची गाडी लावत असे. त्याच्याकडे मिळणारा वडा मस्तच होता. त्यानंतर कांदेवाडीत नानिवडेकरच्या दुकानासमोर बोरकर असायचा. तेथेही वड्यांसाठी खूप गर्दी असायची. आता हे दोघेही आहेत की नाहीत… माहीत नाही. लहानपणापासूनच अशी चटावलेली जीभ असल्यानं रस्त्यात जाता-येता कुठे गरम-गरम वडा पाहिल्यावर पावलं थोडीशी घुटमळायचीच. एकवेळ ‘मला वडा ‘फारसा’ आवडत नाही,’…
मंदार अनंत पाटील लंडनला एकदा मी आणि पल्लवी घरी कामावरून परत येत असताना आमची भेट टोनी नावाच्या जर्मन स्पिट्झ जातीच्या अतिशय बोलके डोळे, ठेंगणा बांधा, भरपूर केस आणि अंबाडा बांधावा अशी शेपटी… असे रुपडे असलेल्या श्वानाशी झाली. त्याची मालकीण जेनिटा पण भारतीयच आहे आणि कोरोना काळात एक सहचारी म्हणून हे श्वान आणले गेले. अतिशय हुशार आणि मस्तीखोर हा साधारण 22 महिन्यांचा नर श्वान… काही मिनिटांतच माझी आणि त्याची दोस्ती झाली. जेनिटाची रीतसर परवानगी घेऊन वेळ मिळेल तेव्हा टोनीला फिरवायची जबाबदारी घेतली आहे. आता तो माझा सध्याचा सखा आहे. लिओला जाऊन अवघे दोन-तीन महिने झाले आणि टिंकरबेल नावाची डच ससुली आमच्या…
यश:श्री प्रसिद्ध साहित्यिका दुर्गा भागवत यांनी, माणसाबद्दल एक छान मत मांडलं आहे. त्या म्हणतात – ‘माणूस मागे का पडतो? कारण तो मनात स्वतःला कमी समजत असतो म्हणून! परंतु प्रत्येकात काहीना काही तरी, विशेष असतो, तो विशेष जर जोपासला तर तो पुढे जातो. नाही तर, आपल्या देशात एवढे मोठे पुढारी झाले नसते. पण हा विशेष अतिशय कौशल्यानं जोपासला पाहिजे. हे कौशल्य जातीनिहाय होतं. म्हणून वेगवेगळ्या कारागिरांचे संच प्रत्येक देशात निर्माण झाले. आपला देश प्राचीन असल्यानं जातीभेदाला वेगळा आकार आला आणि त्याच्याविरुद्ध इथल्याच लोकांनी सुधारणा घडवून आणल्या. या सुधारणा घडविणारे सगळ्या जातीतले लोक होते.’ महाराष्ट्राचा इतिहास हा सुधारणावाद्यांचाच आहे. अगदी छत्रपती शिवाजी…
सुनीता मुकुंद शिवमहिम्नस्तोत्र हे गंधर्वराज पुष्पदंत याने रचले आहे. पुष्पदंत याचे दात कुंदकळी सारखे, शरीर सुंदर, गुणभक्ती ऐश्वर्य संपन्न अशी होती. त्यांची गणना परम शिवभक्त अशी होते. पुष्पदंत संवत पूर्व 1480 मध्ये होऊन गेला इतिहासकार त्याला घडवी समाजाचा मानतात. पण तसा आधार मिळत नाही. भगवान शिवशंकरांनी जेव्हा राक्षसांशी युद्ध केले तेव्हा त्यांच्या घामाचा एक थेंब पृथ्वीवर पडला. त्यातून “वास्तूपुरुष” निर्माण झाला. वास्तूपुरुषाची स्थापना घराच्या मध्यभागी कोठीघर जेथे असते तेथे करावी, असा संकेत आहे. वास्तूशास्त्र हे शिवाच्या ऐश्वर्य संपन्नतेतून निर्माण झालेले आहे. वास्तूपुरुषाच्या कोठ्यांमध्ये (कक्ष) सात देवांची स्थापना केली जाते. ते सात देव म्हणजे नंदी, सुग्रीव, पुष्पदंत, वरूण, असुर, शेष आणि…
चंद्रशेखर माधव मी मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंटच्या (MCM) शेवटच्या वर्षाला होतो त्यावेळची घटना. आमचं कॉलेज पुणे युनिव्हर्सिटी रोडवर होतं. कॉलेजमध्ये सुरेश नावाचा माझा, फारसा जवळचा नसला तरी, एक मित्र होता. माझा मित्र दीपक आणि मी, आम्ही दोघांनी प्रोजेक्टकरिता अनुक्रमे सेल्स आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असे विषय निवडले होते. एमसीएमच्या कोर्सला जाण्याआधी ग्रॅज्युएशनला असताना मी कॉम्प्युटरचा डिप्लोमा केलेला असल्यामुळे मला प्रोग्रॅमिंगची चांगल्यापैकी सवय होती. शिवाय, माझ्या घरी कॉम्प्युटर होता, त्यामुळे माझी प्रॅक्टिसही भरपूर होत असे. सुरेश आमचा मित्र असल्यामुळे वेळोवेळी प्रोजेक्टच्या संदर्भात विचारांची तसेच कागदपत्रांची देवघेव होत असे. दुसऱ्या वर्षाच्या शेवटी शेवटी जसं प्रोजेक्ट सबमिशनचा दिवस जवळ येऊ लागला, तसं आम्हा सर्वांचीच…
दिप्ती चौधरी बंगलोरला आमची दोन वर्षं अगदी मजेत गेली. हे आमचे घर… हा ओळखीचा परिसर… ओळखीची माणसे… असे सगळे आमचे वाटत असतानाच कहानी में ट्विस्ट आला.. आम्हा सर्वांनाच एका नवीन वळणावर आणून उभे केले… आमच्या पप्पांची बदली अमेरिकेला झाली आणि सगळं चंबूगबाळं उचलून त्या अनोळखी जगात स्थलांतराची तयारी सुरू झाली… अमेरिकेला जायचा निर्णय पक्का करण्या आधी आम्ही पण तिथे जाऊ शकतो ना, हे नक्की करणं जरुरी होते. चौकशी करताना कळलं की, अमेरिका किंवा कॅनडा येथे प्राणी घेऊन जाण्याची प्रक्रिया सगळ्यात सोपी आहे. कारण, तिथेही रॅबिज हा रोग आहे त्यामुळे फक्त लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र पुरेसे आहे. युरोपमध्ये प्रक्रिया थोडी क्लिष्ट आहे,…
नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा तुमच्या भेटीला… साय… साय म्हटलं की, आठवतं दुधावरच्या पातेल्यातलं दूधावरचं घट्टसर आच्छादन… मऊ लुसलुशीत आणि वेगळीच दुधाळ चव असलेली ती साय… खरंतर, आजी-आजोबा त्यांच्या नातवंडांसाठी म्हटला जाणारा हा प्रेमळ लाघवी शब्द! नातवंड म्हणजे दुधावरची साय. म्हणून असेल कदाचित, दुधापेक्षा सायीचं अप्रूप किंवा कौतुक जास्त असते. माझ्या लहानपणी एक प्रघात होता. बहुतेक सगळ्या घरांमध्ये असायचा तो प्रघात किंवा ती पद्धत. सकाळी दूध आलं की, ते मंद आचेवर तापवायचं. म्हणजे त्याला जास्त दाट साय येते. दिवसभर सगळ्यांना प्यायला किंवा चहात वापरून उरलेलं दूध रात्री छोट्या पातेल्यात ते ओतून मोठं पातेलं घासायला घ्यायचं. पण ते घासण्याआधी त्या…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 241
- अवांतर 171
- आरोग्य 89
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 182
- मैत्रीण 16
- ललित 501
- वास्तू आणि वेध 354
- शैक्षणिक 72
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
