Author: Team Avaantar

प्रमोद मनोहर जोशी पुराणकाळापासून ते आज तागायत स्त्रीला नटण्याचं आणि आरशात आपली प्रतिमा न्याहाळण्याचं वेड आहे .आज माझी याच विषयावरची कविता आहे. सजून धजून बघते मी गं आरशात प्रतिमा बिंब पाहूनी प्रतिबिंबित ते खुलला मुखचंद्रमा II धृ II श्रावणसरीच्या शतधारांनी सचैल मुक्त नाहले ऊन हळदीचे उटणे म्हणूनी सर्वांगी लाविले उजळून आले जसा घनतमी बहरून ये चंद्रमा बिंब पाहूनी प्रतिबिंबित ते खुलला मुखचंद्रमा II1II नितळ मुलायम मुखकमलावरी लेप चंदनी दिला सौभाग्याचे लेणे भाळी सिंदूर तो लाविला आणि कपाळी हळूच लाविली चंद्रकोर कुंकुमा बिंब पाहूनी प्रतिबिंबित ते खुलला मुखचंद्रमा। II2II तलम रेशमी कचपाशाची वेणी तिपेडी रुळे हळूच त्यावरी हसूनी बघती निशिगंधाची फुले…

Read More

धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष राशी जोडीदाराला, भागीदाराला अथवा प्रतिस्पर्धी असल्यास त्याला योग्य तो मान द्या. हाताखालच्या माणसांना सांभाळा. छान, सुंदर रुचकर पदार्थ खायचा योग आहे, खाऊन तृप्त व्हा. लहान मुलांनी पालकांच्या मार्गदर्शनाचा फायदा करून घ्यावा. वृषभ रास सट्टा बाजार, शेअर मार्केट यांच्याकडे मन आकर्षित होत असले तरी, संयम बाळगा. कर्मचारी असल्यास कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष द्या. स्त्रियांनी तब्येतीला प्राधान्य देणे योग्य ठरेल. जोडीदाराने याबाबतीत स्त्रीला पूर्ण सहयोग करणे अपेक्षित आहे. मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा थोडा थकवणारा असू शकतो, पण कष्टाला मागे राहू नका. विवाहित स्त्रियांची माहेर आणि मुले यात थोडी रस्सीखेच…

Read More

मनोज जोशी कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये, असे म्हटले जाते. पण मला दोनदा पायरी चढावी लागली. सर्व मामला चोरीचाच होता, पण हे दोन्ही अनुभव कायम लक्षात राहतील, असेच होते. एकदा वांद्रे कोर्ट तर, दुसऱ्यांदा वसई कोर्ट… एकदा घड्याळाची चोरी तर, दुसऱ्या वेळेस मोबाइल लंपास… लोकमतला असताना 2012-13 मध्ये माझा मोबाइल चोरीला गेला होता. त्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केल्यावर काही दिवसांत मला कोर्टाचे बोलावणे आले… केस उभी राहिली… एका दिवसांत निकाल लागला आणि फोन परत मिळाला. अर्थात, तो माझा नव्हता. पोलिसांकडे त्याच कंपनीचे मॉडेल उपलब्ध होते, तो मला दिला. भाग – 2 वसई कोर्टात माझ्या केसचा पुकारा होईपर्यंत कॉरिडॉरमध्ये फेऱ्या मारत…

Read More

सुनीता मुकुंद श्री देवीची शक्तीपीठे 108 किंवा 51 असल्याचे मानले जाते. या 51पैकी भारतात 42, श्रीलंकेत एक, तिबेटमध्ये एक, बांगलादेशात चार, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये एक, नेपाळ दोन आहेत. सतीचे निष्प्राण कलेवर (देह) घेऊन श्रीशंकर क्रोधायमान स्थितीत निघाले तेव्हा, त्यांचा राग शांत करण्यासाठी श्रीविष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे तुकडे केले. ते अवयव ज्याठिकाणी पडले ती शक्तीपीठे झाली. मागील भागात आपण 25 शक्तिपीठांची माहिती घेतली होती. आता उर्वरित 26 शक्तिपीठे…. हेही वाचा – भारतातील शक्तिपीठे 26. उज्जयनी शक्तिपीठ : उज्जैन, क्षिप्रानदी तट, मध्य प्रदेश; उजवी कुशी. शक्ती – हरसिद्धी / मंगला / चंडिका, भैरव – मांगल्य / कपिलाम्बर 27. मणिवेदिका शक्तिपीठ : पुष्कर, राजस्थान;…

Read More

यश:श्री भाग 1 कला, साहित्य अशा अनेक माध्यमांमध्ये मोराचे आकर्षण पाहायला मिळते. अगदी प्राचीन काळापासून विविध कलांमध्ये मोराचे महत्त्व अधोरेखित होते. शिल्पकलांमध्येही त्याची झलक दिसते. अनेक प्राचीन मंदिरांमधील कलाकुसरेत मोराचे दर्शन घडते. दगड, कास्य आणि मातीच्या मूर्तीमध्ये मोर तयार करणे हा कलाकरांचा आवडता विषय असल्याचे पाहायला मिळते. मनुष्याच्या जीवन आणि कलेमध्ये मोर हे अभिन्न अंग आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शिल्पकलांप्रमाणेच चित्रकलेतही मोर पाहायला मिळतो. डॉ. जगदीश गुप्त यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राचीन काळातील मोराच्या चित्रात विविधता आढळते आणि त्याचे स्थान अत्युच्च असे आहे. आदमगडच्या गुहेमध्ये (होशंगाबाद) मोराचे जे अत्यंत विशाल चित्र आहे, त्या चित्रावरून त्याला त्यावेळी असलेल्या विशेष महत्त्वाची…

Read More

चंद्रशेखर माधव साधारणपणे मार्च महिन्यात आंब्यांचा सीझन सुरू होतो. आमच्या लहानपणी, सुमारे 1985 ते 1990 या काळात, कॉलनीत एक मध्यमवयीन महिला डोक्यावर जुन्या पद्धतीची वेलींपासून विणून बनवलेली मोठी टोपली घेऊन आंबे विकायला येत असे. नऊवारी साडी, कपाळावर मोठ्ठं गोल कुंकू. कमरेला चंची अडकवलेली असा पारंपरिक वेश केलेल्या मावशींचा आवाज अगदी भारदस्त होता. एक हाक दिली की, शेजार शेजारच्या दोन इमारतींच्या अगदी सर्वात वरच्या मजल्यापर्यंत आवाज पोहोचलाच म्हणून समजा. भर दुपारी उन्हाच्या वेळी “आंबे….. हॅप्पुस” अशी हाक आली की आमची आई “आल्या वाटतं…. शेखर, जा बरं, काय भाव आहे विचार,” असं हमखास सांगे. तिने हे वाक्य म्हणताच, मी लगेच बाहेर पळत…

Read More

सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) माझ्या दोन फेसबुक लेकी घरी भेटायला आल्या होत्या. गप्पा मारताना त्यांनी नेहमीच्या तारुण्यसुलभ लहरीप्रमाणे, मला “काका, चला ना सेल्फी काढुया!” असा फतवा काढला. नेहमीप्रमाणे सेल्फी घेताना दोघींनी पाऊटस करून फटाफट सेल्फी घेतले. मलाही पाऊट करण्याचा आग्रह झाला. आपण सगळे नेहमीच बघतो की, मोबाईलमध्ये फ्रंट कॅमेरा आल्यापासून हा सेल्फीचा ट्रेंड आला आणि तो अद्यापही तेवढाच जोरात आहे. त्यातही सेल्फी घेताना मुलं ‘हाय-फाइव्ह’ देतील किंवा ‘यो!!!’ म्हणून बोटांची विवक्षित घडी करतात… मात्र मुली हमखास ओठांचा पाऊट म्हणजेच चंबू करतात. तेवढ्यावर न थांबता त्या सोबतच्या म्हाताऱ्या मंडळींनाही पाऊट करण्याचा हट्ट धरतात. तो हट्ट एवढा…

Read More

आराधना जोशी प्रमोद महाजन यांच्या निधनाला यंदा 3 मे रोजी 19 वर्षे झाली. त्यांचा अकाली झालेला मृत्यू हा सगळ्यांनाच चटका लावून गेला. महाराष्ट्रातील अलीकडच्या काळातील जे हजरजबाबी नेते होते, त्यात विलासराव देशमुख आणि प्रमोद महाजन यांचं नाव अग्रस्थानी आहे. (दुर्दैवानं आता दोघेही हयात नाहीत.) प्रमोद महाजन यांचं एप्रिल 1997मधील लोकसभेतील भाषण मध्यंतरी व्हायरल झालं होतं. सर्वपक्षीय चीन दौऱ्यातील एक किस्सा त्यांनी सभागृहात सांगितला होता. “तिथे भारतातील लोकशाहीबद्दल उत्सुकता दिसली. तेव्हा मी‌ लोकशाही काय असते ते समजावलं. मी त्यांना म्हणालो, मी प्रमोद महाजन आणि लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाचा खासदार आहे; आम्ही विरोधी बाकांवर आहोत. हे ऐकून चीनचे नागरिक हैराण झाले. त्यानंतर…

Read More

दिप्ती चौधरी दरवाजा उघडल्याबरोबर मला समोरच धुवून वाळत घातलेले आमचे मोठे पिंजरे दिसले! मग काय माझी पाचावर धारण बसली… मला वाटले दिदी पुन्हा आम्हाला पिंजऱ्यात घालते की काय? जीवाच्या आकांताने मी प्रतिकार केला आणि दिदीच्या डोक्यावरून उडी मारून पसार झालो! बरं, मी जी धाव घेतली ती सरळ मागच्या अंगणाच्या एका बाजूला जिथून जाळी होती, तिच्या खालून सटकून मी घराला वळसा घालून पुढच्या अंगणात आलो. तिथे काही कुंपण वगैरे नाही… त्यामुळे सरळ समोरच्या मुख्य रस्त्यावर आलो! आता इकडून पळ काढला तर सरळ महामार्गावर पोहोचलो असतो, पण नशिबाने रस्त्यावर पळण्याऐवजी मी घराबाजूच्या झुडपात लपायचे ठरवले. झुडपाच्या मागे भिंतीच्या बाजूला मी आणि समोर…

Read More

धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष राशी येता आठवडा हा संमिश्र राहील. संभाषणात अथवा बोलताना आपल्यामुळे कोणी दुखावणार नाही, याची काळजी घ्या. घरातल्या गोष्टींमध्ये मन उत्तम रमेल. परदेशगमनाचे योग येऊ शकतात. स्त्रियांनी आलेला पैसा राखून ठेवण्याकडे कल ठेवावा. मेष राशीच्या सर्वांनीच उष्णतेचे विकार होणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. वृषभ राशी या आठवड्यात छोट्या प्रवासाचे अनेक योग येऊ शकतात. आपले विचार शब्दांतून प्रभावीपणे व्यक्त करण्याचा उत्तम काळ. मित्र, भाऊ, बहीण यांच्या सुखदायी भेटी होण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. लहान मुलांसाठी अभ्यास आणि शिक्षणाचे आराखडे तयार करण्यासाठी उत्तम काळ ठरू शकतो. मिथुन राशी बोलणे आणि आहार याबाबतीत संयम…

Read More