Author: Team Avaantar

अर्चना कुलकर्णी डिसेंबर महिना म्हणजे शाळा, कॉलेजांमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा यांची धमाल असते. त्या दिवशी आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. नृत्य स्पर्धा खूपच रंगतदार झाली. दुपारी बारा वाजता स्पर्धा संपली तेव्हा प्रेक्षक, विद्यार्थीवर्ग खुशीत बाहेर पडत होता तर, कलाकार विद्यार्थीवर्ग अल्पोपहारचा स्वाद घेत नृत्य सादरीकरण आणि स्पर्धेचा निकाल यावर चर्चा करून समाधानाने हॉलच्या बाहेर पडले. त्यादिवशी दुपारच्या वेळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक यापैकी कोणीही संस्थेत हजर नसल्यामुळे खूप शांतता होती. माझे लक्ष यामुळे मी कार्यालयीन कामात केंद्रित केले होते. दुपारी चारच्या सुमारास एक वयस्कर गृहस्थ तावातावाने थेट माझ्या केबिनमध्ये आले. कार्यालयाच्या मदतीनीसांनी त्यांना अडवण्याचा…

Read More

धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी शिस्त अथवा वक्तशीरपणा यावरून थोडी चिंता उद्भवू शकते. जसजसा आठवडा पुढे सरकेल, तसतसा तणाव कमी होऊन उत्तम अनुभव येतील. मुलांनी येत्या आठवड्यात आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. रागातून बोलले गेलेले शब्द हानिकारक ठरतात. वृषभ कौटुंबिक समस्या अथवा व्यावसायिक समस्यांनी भरलेला आठवडा जाऊ शकतो. उष्णतेमुळे होणारे पोटाचे विकार या आठवड्यात आपल्याला सतावू शकतात. महिलांनी या आठवड्यात घरातील शिस्त कशी टिकेल, याकडे विशेष लक्ष द्यावे. आठवड्याच्या उत्तरार्धात ताण-तणाव कमी होतील आणि काही आनंदवार्ता ऐकायला येतील. मिथुन अहंकार अथवा अहंभाव हा या…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 25 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 15 जून 2025 वार : रविवार तिथि : चतुर्थी 15:51 नक्षत्र : श्रवण 24:59 योग : एन्द 12:18 करण : कौलव 27:44 सूर्य : वृषभ चंद्र : मकर सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:17 पक्ष : कृष्ण मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष गलवान खोऱ्यातील संघर्षाची पाच वर्षे एकीकडे संपूर्ण जग कोविड -19च्या महामारीला तोंड देत असताना भारत आणि चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष…

Read More

आनंद जोशी शाळेचा पहिला दिवस माझ्या कायम स्मरणात राहिला आहे! प्रत्येक वर्षी शाळेचा पहिला दिवस येत असे आणि शाळेत जाण्याची उत्सुकता मात्र कमी होत नसे! माझी शाळा मुंबईत मालाड पूर्वेला उत्कर्ष मंदिर होती. काळ साधारण 1980 ते 1985 मधला. 13 जून रोजी शाळा उघडत असे. पाऊस सुद्धा साधारण 13 जूनला येत असे. जीवनात सर्व बाबतीत ‘पर्याय’ कमी असल्यामुळे असेल, पण जीवन खूप सोपे आणि सुखाचे होते! मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही काका, मामांकडे किंवा गावाला आठ-दहा दिवस जाऊन राहत असू. तेव्हा फक्त ‘रिसॉर्ट’मध्ये जाऊन राहणे, हा एकमेव पर्याय नव्हता… मे महिन्याच्या सुट्टीत भरपूर आराम करून झाल्यावर मग शाळेचे वेध लागत असत!…

Read More

मनोज जोशी आयुष्यात आपण अनेकदा आत्मविश्वास दाखवत, त्याच आत्मविश्वासाने बोलत असतो.. व. पु. काळे यांचे एक वाक्य आहे – ‘दोन रुपये देऊन चपलेचा अंगठा शिवल्यावर साधारणपणे चर्मकाराकडे ‘पुन्हा तुटणार तर नाही ना?’ असे विचारून खातरजमा केली जाते. म्हणजेच, माणसाला प्रत्येकवेळी गॅरंटी हवी असते. पण अशी गॅरंटी मागणारा, किती काळ जगणार आहे, याची काहीच गॅरंटी नसते.’ वपुंचे हे कथन वास्तव असले तरी, हा विषय फक्त गॅरंटीपुरताच नाही. प्रत्येकजण दिवसातून अशा अनेक गोष्टी आत्मविश्वासाने करत असतो; जणूकाही गॅरंटीच असावी. आता हे सांगायचे काय कारण? असे वाटू शकते. पण त्याचाही संदर्भ आहे. अलीकडेच तसा विचार माझ्या मनात येऊन गेला. विषय अगदी साधा होता.…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 24 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 14 जून 2025 वार : शनिवार तिथि : तृतीया 15:46 नक्षत्र : उत्तराषाढा 24:21 योग : ब्रह्मा 13:12 करण : बव 27:51 सूर्य : वृषभ चंद्र : मकर सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:16 पक्ष : कृष्ण मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय 10:02 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मेष राशीच्या जातकांना कामामध्ये मोठे यश मिळेल. मात्र त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. एखाद्या…

Read More

संजय श्रीराम जोग ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे 13 जून या इंग्रजांना त्याज्य अशा 13 तारखेला आमच्या वेळेस शाळा नेमेचि सुरू व्हायची. उन्हाळ्याने त्रासलेले मुंबईकर ज्या ओढीने आभाळाकडे डोळे लावतात, त्याच चातकाच्या ओढीने सुट्टीचे अजीर्ण झालेले विद्यार्थी 13 जूनची वाट पहायचे. 1 तारखेपासूनच याची आद्य तयारी सुरू व्हायची. नवा युनिफॉर्म, नवी पुस्तके वह्या, दप्तर आणि रेनकोट असा जामानिमा असायचा. जूनच्या 7 तारखेला मृग नक्षत्र लागूनही बरेचदा पाऊस लांबायचा आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागताला हजर व्हायचा. कमालीचा दुर्मिळ योगायोग पहा की, मातीत पडणार्‍या पहिल्या थेंबाने दरवळणारा सुगंध आणि कोर्‍या वह्या-पुस्तकांचा सुगंध एकाच दिवशी घ्यायला मिळायचा. आमच्या पार्ले टिळक विद्यालयात, रोज शाळा…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 23 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 13 जून 2025 वार : शुक्रवार तिथि : द्वितीया 15:18 नक्षत्र : पूर्वाषाढा 23:20 योग : शुक्ल 13:47 करण : वणीज 27:35 सूर्य : वृषभ चंद्र : धनु 29:37 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:16 पक्ष : कृष्ण मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. सहजपणे भांडवल उभे करू शकाल, राहिलेली देणी परत येतील किंवा…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा तुमच्या भेटीला आलेय. गोष्ट आहे, सदाफुली झाडाची! बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा… बालपणीचा काळ सुखाचा… हे सगळं ऐकायला किती छान वाटतं… पण मोठेपणीच! लहान असताना नाही. लहान मुलांना नाही म्हटलं तरी, सतत काही ना काही प्रश्न पडत असतात. मलाही पडायचे. पण त्याची उत्तरे काही मिळायची नाहीत. ‘गप्प बस, काय सारखं डोकं खाते…,’ असेच म्हणायचे सगळे मला. पण तेच सर्व, माझी मुले मोठी होत असताना मला मात्र, सांगायचे की, ‘मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देत जा, टाळू नको!!’ हल्लीच्या मुलांना प्रश्न पडला तर, त्यांना उत्तर द्यायलाय गूगल बाबा किंवा गूगळीण मावशी आहेच! गिरगावातलं आमचं घर तसं…

Read More

आराधना जोशी पुल स्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर, आनंदयात्रा मिळाली, निराशेतून माणसे मुक्त झाली, जगू लागली, हास्यगंगेत न्हाली असं वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी ज्यांच्याबद्दल केलं आहे, त्या पु. लं.ना जाऊन आज 25 वर्षे झाली. 8 नोव्हेंबर 1919 साली जन्मलेल्या पु. लं.मध्ये थक्क करणारं गुणांचं वैविध्य तर होतंच, पण त्या प्रत्येक गुणात गाठलेला अभिनंदनीय दर्जा, विस्मित करणारी लोकप्रियता आणि या सर्वांपलिकडे जाऊन झगमगणारं नैतिक तेज तसेच माणुसकी कायमच दिसून आली. अशा या पुलंना दोन मिनिटांसाठी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता तो रत्नागिरीच्या समुद्रकिनारी. कोळंब्याहून रत्नागिरीला होडीने प्रवास करून आम्ही किनाऱ्याला लागत होतो आणि समोर साक्षात सुनीताबाई आणि पुलं. त्यांनीही…

Read More