Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…

    May 2, 2026

    ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

    May 2, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना भरपूर खेळण्याची संधी मिळायलाच हवी…

    May 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : ही कोथिंबीर वडी करून पाहा…
    फूड काॅर्नर

    Recipe : ही कोथिंबीर वडी करून पाहा…

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 8, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, Recipe, delicious Kothimbir Vadi, Kothimbir Vadi, कोथिंबिर वडी, मराठमोठा पदार्थ
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    हर्षा गुप्ते

    कोथिंबीर वडी – प्रकार 1

    साहित्य

    • किसलेला कच्चा बटाटा – 1 वाटी
    • चिरलेली कोथिंबीर – 1 वाटी
    • तांदळाचे पीठ – 2 मोठे चमचे
    • बेसन – आवश्यकतेनुसार
    • लसूण – 7-8 पाकळ्या
    • आले – 1 इंच
    • हिरव्या मिरच्या – आवश्यकतेनुसार
    • धणे – 1 चमचा
    • जिरे  – 1 चमचा
    • बडीशेप – 1 चमचा
    • ओवा – अर्धा चमचा
    • तिळ – 1 चमचा
    • तेल – तळणासाठी
    • हिंग – स्वादानुसार

    पुरवठा संख्या – चार जणांसाठी

    एकूण कालावधी – अर्धा तास

    कृती

    1. एका मोठ्या वाडग्यात चिरलेली कोथिंबीर, किसलेला कच्चा बटाटा घ्यावा.
    2. आले, लसूण, मिरच्या, धणे, जिरे, बडीशेप, ओवा हे सगळं जाडसर खलबत्त्यात कुटून घ्यावे.
    3. कुटलेले हे मिश्रण कोथिंबीर आणि किसलेल्या बटाट्यात घालावे.
    4. नंतर त्यात चमचाभर तिळ आणि चिमूटभर हिंग मिक्स करावं.
    5. आता त्यात मावेल तसा बेसन घालत रहा.
    6. हे सर्व मिश्रण घट्टसर झाल की, उंडे बनवा किंवा डब्यात घालून वाफवून घ्या.
    7. त्यानंतर त्याच्या वड्या पाडून खरपूस तळून घ्याव्यात.

    टीप

    • पुदिन्याची किंवा कोथिंबीर-नारळाच्या चटणीबरोबर ही कोथिंबीर वडी खूप रुचकर लागते.
    • तयार मिश्रणात चिंचेचा कोळ आणि गुळाचा वापर करू शकता. त्याने वेगळी चव येते.

    हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट शेंगा डाळ अन् मिस्सी रोटी

    कोथिंबीर वडी – प्रकार 2

    साहित्य

    • चिरलेली कोथिंबीर – 1 वाटी
    • बेसन – आवश्यकतेनुसार
    • हळद – 1 लहान चमचा
    • चिंचेचा कोळ – 2-3 चमचे
    • गूळ पावडर – 4 टी-स्पून
    • मीठ – चवीनुसार
    • तिळ – 1 चमचा
    • आले – अर्धा इंच
    • हिंग – लहान अर्धा चमचा
    • लसूण – 5 पाकळ्या
    • हिरव्या मिरच्या – आवश्यकतेनुसार
    • चणाडाळ – 2  मोठे चमचे (भिजवून, पाणी न घालता वाटलेली)
    • तेल – तळणापुरते

    पुरवठा संख्या – चार जणांसाठी

    एकूण वेळ – अर्धा तास

    कृती

    1. चिरलेल्या कोथिंबिरीमध्ये मिरच्या, मीठ, हळद, हिंग घालून त्याचे वाटण करून घ्यावे.
    2. त्यात दोन-तीन चमचे चिंचेचा कोळ, चार चमचे गूळ पावडर, एक चमचा तिळ, चिमूटभर हिंग आणि वाटलेली डाळ घालून कालवून घेणे.
    3. त्यात मावेल तसे बेसन मिसळा.
    4. या कोथिंबीर वडीचे उंडे करून 20 मिनिटे वाफवून घ्या.
    5. गार झाल्यावर काप करून तळून घ्यावे.

    हेही वाचा – Recipe : वेगळ्या चवीचे आंबट-गोड पंचामृत

    टीप

    • वाटलेली डाळ घातल्यामुळे वड्या खुसखुशीत होतात.
    • पुदिन्याची किंवा कोथिंबीर-नारळाच्या चटणीबरोबर ही कोथिंबीर वडी खूप रुचकर लागते.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : गप्पांचा फड, चहाचा कप अन् सोबतीला चटपटीत भडंग!

    May 1, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : टोकेर दाल ते आम पोरा… कैरीच्या चवीचे अनोखे बंगाली पैलू!

    April 26, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : गप्पांचा फड, चहाचा कप अन् सोबतीला चटपटीत भडंग!

    By माधवी जोशी माहुलकरMay 1, 2026

    ‘खवय्येगिरी’ आणि ‘महाराष्ट्र’ हे समीकरण मांडताना पुरणपोळी, मिसळ किंवा वडापाव जितके महत्त्वाचे आहेत, तितकीच महत्त्वाचे…

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    Recipe : टोकेर दाल ते आम पोरा… कैरीच्या चवीचे अनोखे बंगाली पैलू!

    April 26, 2026

    Kitchen Tips : मसालेभात, शिळ्या भाताचा टेस्टी उपमा, पौष्टिक सांबार…

    April 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…

    May 2, 2026

    ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

    May 2, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना भरपूर खेळण्याची संधी मिळायलाच हवी…

    May 2, 2026

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    May 2, 2026

    Dnyaneshwari : जी सत्यलोकु तुजमाजीं आहे, देखिला चतुराननु हा नोहे

    May 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 मे 2026

    May 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 285
    • अवांतर 184
    • आरोग्य 107
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 403
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 202
    • मैत्रीण 18
    • ललित 599
    • शैक्षणिक 78
    • 98699 75883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…

    May 2, 2026

    ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

    May 2, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना भरपूर खेळण्याची संधी मिळायलाच हवी…

    May 2, 2026
    Most Popular

    आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…

    May 2, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.