Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा

    March 21, 2026

    Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ…

    March 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 मार्च 2026

    March 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, March 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अचानक माझं वागणंच बदललं…
    ललित

    अचानक माझं वागणंच बदललं…

    Team AvaantarBy Team AvaantarMay 18, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, मांजर, बोका, डंपर, डिगर, दनू, पिदू
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिप्ती चौधरी

    …तर मंडळी आम्ही अमेरिकेत मस्त रुळलो आहोत, असे वाटत असतानाच मोठ्ठा प्रश्न आम्ही आमच्या घरच्यांपुढे उभा केला!

    एक दिवस माझे आणि दनूचे जोरदार भांडण झाले, त्यात त्याला मी पुरता आडवा केला. तो जाऊन फायर प्लेसच्या वर चिमणीत जाऊन लपला. पण काही तासांनी बाहेर आला आणि सारे ठीक झाले. तेव्हा आमचे पप्पा ऑफिसच्या कामानिमित्त एक आठवडा बाहेर होते आणि दिदी तिच्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये. कदाचित, यामुळे पिदूचे डोके सटकले असेल, असे वाटून आईने सोडून दिले.

    पण पुढच्याच रविवारी आमच्या नवीन शेजाऱ्यांच्या मुली अंगणात खेळत होत्या. गावभवानी डेजी नेहमीप्रमाणे गाव उंडारून परतताना त्यांच्याबरोबर खेळायची. नवीन असल्याने ही नक्की कोणाची, हा शोध लावायला या आगाऊ कार्ट्या डेजीला बरोबर घेऊन गल्लीतल्या प्रत्येक घरात दार ठोठावत निघाल्या. त्यांनी आमचे दार वाजवले आणि पप्पांनी दार उघडून ही आमची नाही, समोरच्या॑ची आहे, इतकेच थोडक्यात सांगितले; पण ती काही मिनिटं दरवाजात समोर डेजी आणि पप्पांच्या मागे मी असे आमने सामने आलो…

    दार बंद झाल्यावर मी तसा ठीक होतो, पण थोड्या वेळाने दनू समोर आला आणि मी त्याच्यावर जीव खाऊन हल्ला केला… आणि दनू जो चिमणीमध्ये जाऊन लपला तो दोन दिवस तिथेच. मला दुसऱ्या खोलीत जेमतेम डांबल्यानंतरच तो बाहेर येऊ शकत होता.

    हेही वाचा – आता तर दिदीने फतवा काढला…

    या घरात आल्यानंतर दनूने काही दिवसांतच फायर प्लेसच्या वर चिमणीच्या तळाशी असलेली जाळी हेरली. तिथे तो अक्षरशः अंतर्धान पावत असे… त्याने डोकावून बघितले तरच तो दिसायचा, नाहीतर त्याच्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नसे. तो सुरुवातीला एक दिवस काळाकुट्ट होऊन अवतरला, तेव्हा हा शोध आई आणि पप्पांना लागल, त्याचे गुप्त ठिकाण कळले! तिथे अडकेल, वरती गेला तर पळेल किंवा त्या काजळीचा त्रास होईल म्हणून पप्पानी खूप प्रकारे फायर प्लेस बंद करायचे प्रयत्न केले; पण हा कुठून तरी मार्ग काढून तिथे जायचा, आई गमतीने दनू विरुद्ध पप्पा असा फायर प्लेस सामना म्हणायची… आणि बऱ्याच प्रयत्नानंतरही पप्पांचा स्कोअर शून्यच होता; तेव्हा तो नाद त्यांनी सोडला… आणि दनूही नेहमी नाही, पण कधी घाबरला तरच थोडावेळ लपायचा.

    पण आता त्याला तिथे दिवसच्या दिवस ठेवणे योग्य नव्हते. त्याला बाहेर काढून कुठल्याही खोलीत जिथे खाणे-पाणी आणि लिटर ठेवता येईल, अशी सोय करणे भाग होते.

    शेवटी टीव्हीचा मोठ्ठा बॉक्स गॅरेजमधून आणून ठेवला आणि मला खालच्या बेडरूममध्ये बंद केल्यावर जेव्हा दनू बाहेर आला तेव्हा पटकन फायर प्लेस बंद केले. पण त्यामुळं तो अजूनच घाबरला आणि वरच्या मजल्यावर असलेल्या सोफ्याखाली लपला… थोड्या वेळाने तिथून निघून त्याने दिदीच्या खोलीत पलंगाखाली कोपऱ्यात लपायची जागा केली. लगेच दरवाजा बंद करून त्याचे खाणे, पाणी आणि लिटर बॉक्स अशी सोय त्या खोलीत करण्यात आली.

    पण आम्हा दोघांच्या संबंधात काही सुधारणा होत नाही, हे बघून आईने प्रथम आमच्या डॉक्टरांना फोन लावला… तिनेही पहिला मार्ग म्हणजे डोकं शांत करणारे औषध लिहून दिले… आणि दोन भांडणारी मांजरे किंवा नवीन मांजरे यांना कशा प्रकारे एकमेकांची सवय करावी, याची शास्त्रशुद्ध पद्धत सांगितली…

    हेही वाचा – अखेर आम्ही अमेरिकेला पोहोचलो!

    खरे तर दनू वयाने माझ्यापेक्षा मोठा आणि मला त्यानेच वाढवले, पण स्वभाव अगदी मवाळ! या उलट मी, त्यामुळे नेहमी माझी दादागिरी असायची, पण आता मात्र जरा जास्तच झाले होते.

    अचानक वागण्यात बदल झाला तर, प्रथम काही शारीरिक त्रास नाही ना, हे तपासून पाहावे. काहीच दिवस आधी vaccinationसाठी डॉक्टरांकडे भेट आणि तपासणी झाली होती, त्यामुळे आधी डॉक्टरांना फोन केला.

    आमची डॉक्टर अमेरिकेतील असली तरी, मूळची भारतातील, त्यातून मुंबईची! त्यामुळे तिला आमचा विशेष लळा… गाववाले पडलो ना आम्ही! शारीरिक काही व्याधी नाही आणि अचानक आक्रमक झाला असेल तर, त्याचे कारण बहुदा डेजी असावी, असे तिचे मत पडले. जरी दोघांचेही ऑपरेशन झाले असले तरी वासामुळे डोके सटकू शकते, असे सांगून तिने काय करायचे, याची क्रमवार माहिती दिली. यामध्ये काही मांजरांच्या स्वभावानुसार, त्यांच्या प्रतिक्रियानुसार आपण अंदाज घेत पुढचे पाऊल टाकावे.

    1. सर्वप्रथम भांडणाऱ्या माऊ पूर्णपणे वेगळ्या कराव्या. दोन खोल्यांमध्ये दोघे. दोघांचा अजिबात संपर्क नसावा
    2. हळूहळू एकमेकांच्या वापरलेल्या वस्तू – जसे चादरी, खेळ… ज्याला त्या माऊचा वास येतो, असे एकमेकांना द्यावे. म्हणजे वास स्वीकारायची तयारी होते.
    3. नंतर मधे अडसर ठेवून एकमेकांना सामोरे आणायचे. एकमेकांपर्यंत पोहोचणार नाहीत, याची काळजी घ्यावी. सुरुवात बंद दरवाजापासूनच करावी.
    4. दरवाजा बंद असला तरी दाराखालून खेळ, ट्रीट सरकवून, त्यात गुंतवून त्यावेळी भांडण करणार नाही, असे बघावे. म्हणजे, जवळ अस्तित्व जाणावे, पण खेळ किंवा ट्रीटमुळे दुसऱ्या माऊसोबत आनंदी आठवणी जोडल्या जाव्या.
    5. दरवाजा उघडून आता जाळीचा अडसर ठेवायचा; म्हणजे आता एकमेकांना दिसू शकतात पण पोहचू शकत नाही! बहुदा खाण्याच्या वेळीच समोर आणावे. दोघांचे खाणे जाळीच्या दोन बाजूला दूर ठेवत जावे.
    6. हळूहळू अंतर कमी करत जावे आणि शेवटी जाळी काढूनही दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून आपापले खाणे संपवले आणि आपल्या मार्गाने चालते झाले की, तुम्ही जिंकला!

    त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही झाले तर, मात्र cat behavior specialist यांनाच बोलवा, असे तिने सुचवले.

    कित्ती सोप्प आहे ना!

    आमच्या आईला पण वाटलं… यात काय भांडण एका आठवड्यात संपेल… पण कसलं काय…

    हेही वाचा – अश्रू भरल्या डोळ्यांनी आईने केले टाटा…


    क्रमश:

    (पिदू या बोक्याची आत्मकथा)

    diptichaudhari12@gmail.com

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा

    March 21, 2026 ललित

    आराध्याला सापडलेल्या बॉक्समध्ये काय गूढ होतं?

    March 20, 2026 ललित

    पंखात बळ आणणारी पाठवणी!

    March 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा

    By डॉ. विवेक वैद्यMarch 21, 2026

    माझ्या वडिलांच्या दवाखान्यापासून मुसलमान वस्ती काही अंतरावर होती. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक मुस्लीम रुग्ण यायचे. अनेक…

    आराध्याला सापडलेल्या बॉक्समध्ये काय गूढ होतं?

    March 20, 2026

    पंखात बळ आणणारी पाठवणी!

    March 20, 2026

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    March 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा

    March 21, 2026

    Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ…

    March 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 मार्च 2026

    March 21, 2026

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    March 21, 2026

    आराध्याला सापडलेल्या बॉक्समध्ये काय गूढ होतं?

    March 20, 2026

    पंखात बळ आणणारी पाठवणी!

    March 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 243
    • अवांतर 172
    • आरोग्य 90
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 182
    • मैत्रीण 16
    • ललित 504
    • वास्तू आणि वेध 356
    • शैक्षणिक 72

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn