Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026

    March 19, 2026

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    March 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, March 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील गणित शिक्षण
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील गणित शिक्षण

    रश्मी परांजपेBy रश्मी परांजपेFebruary 23, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, शालेय शिक्षण, गणित विषय, गणिताचा अभ्यास, बालगटातील शिक्षण, बालगटातील गणित शिक्षण, बालगट गणित विषय, सीनिअर केजी गणित, गणित अभ्यास,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण शिशुगटातील गणित शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. आता आपण या लेखात बालगटातील गणित शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बालगटातील मुलांकडून चित्रे वस्तू मोजून 1 ते 10 अंक लिहिण्याचा सराव करून घेण्यात येतो.

    बालगटातील गणित शिक्षण अभ्यासक्रम

    बालगटात संपूर्ण वर्षभरात 1 ते 100 अंक ओळीने म्हणणे – लिहिणे, गाळलेले अंक ओळखून लिहिणे तसेच वस्तू मोजून लिहिणे हा अभ्यासक्रम असतो.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील गणित शिक्षण

    अभ्यासक्रमातील विविध मुद्दे आणि पद्धती

    अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने पुढील मुद्दे आणि पद्धतींचा अवलंब करण्यात येतो.

    1. मुलांकडून 1 ते 100 अंक म्हणून तसेच लिहून घेणे म्हणजेच तोंडी आणि लेखी हे दोनही अभ्यास बरोबरीने घेतले जातात.
    2. पहिल्या सत्रात 1 ते 50 अंक आणि दुसर्‍या सत्रात 1 ते 100 अंक असा अभ्यास घेतात.
    3. मुलांना अंक तोंडी म्हणणे आणि तेव्हाच लिहिणे अशी सवय लावली जाते. यामुळे अंक म्हणणे, लिहिणे आणि वाचणे या तीन क्रिया अंकांचे मुलांच्या मेंदूत व्यवस्थित दृढिकरण करतात.
    4. तोंडी अंक म्हणण्यासाठी मुलांचे तीन-चार गट करतात. एकामागोमाग एक गटाकडून 1 ते 10, 11 ते 20 असे 100पर्यंत अंक म्हणण्याचा सराव केला जातो.
    5. शिक्षिकेने अंक ओळीने म्हणताना मधला अंक मुद्दामून गाळावा आणि मुलं ओळखतात का, याची नोंद ठेवावी.
    6. लेखी गणित शिकवताना, शिक्षिकेने फळ्यावर अंक लिहिताना अधले-मधले अंक गाळावेत आणि मुलांकडून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात. असा खेळ सुरुवातीला 1 ते 20 अंकांचा आणि नंतर टप्प्याटप्प्याने 100पर्यंत घ्यावा.
    7. अंकाएवढी चित्रे काढून, ती मोजून मुलांना अंक लिहिण्यास सांगणे, याचा देखील अंक दृढिकरणासाठी छान उपयोग होतो.
    8. मुलांना अंक सांगून बरोबर तेवढ्या वस्तू बाजूला काढण्यास शिकवले जाते.
    9. मुलांना एकत्र उभे करून एखादा अंक उदाहरणार्थ 4 / 7 / 10 असं सांगून त्यानुसार गट करण्यास सांगण्यात येते. अशा खेळांतून देखील अंक शिक्षण दृढिकरणास सहाय्य होते.
    10. अंक गणित शिक्षणासह बालगटातील मुलांना त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ अशा आकृती ओळखण्यास शिकवले जाते आणि यातूनच भूमिती शिक्षण आरंभ होते.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील गणित शिक्षण

    थोडक्यात सांगायचे झाल्यास, बालगटातील अंक शिक्षण मुलांच्या प्राथमिक शाळेतील गणित शिक्षणाचा पाया दृढ करते.

    पुढील लेखात आपण बालशाळेतील विज्ञान शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत.


    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9881943593 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.

    Avatar photo
    रश्मी परांजपे

    रश्मी परांजपे वय 66 वर्षे. पुणे. शिक्षण - बी. कॉम्. पूर्व प्राथमिक (Pre-Primary) शाळेत 32 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत राहून निवृत्त. रेणुका स्वरुप संचलित सरकारमान्य पूर्व-प्राथमिक प्रशिक्षण परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. टेल्को समाज विकास केंद्र आणि मोरया शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2016मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2005पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. निवृत्तीनंतर यजमानांच्या योग प्रचार आणि प्रसार कार्यात तसेच निरामय आरोग्य संकल्पना राबविण्यात सक्रिय सहभाग. मोबाइल - 9881943593

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 16, 2026

    मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील…

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026

    March 19, 2026

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    March 19, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 241
    • अवांतर 171
    • आरोग्य 89
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 182
    • मैत्रीण 16
    • ललित 501
    • वास्तू आणि वेध 355
    • शैक्षणिक 72

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn