Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Skin care : उत्पादने वापरण्यापूर्वी आपल्या त्वचेचा pH जाणून घ्या
    आरोग्य

    Skin care : उत्पादने वापरण्यापूर्वी आपल्या त्वचेचा pH जाणून घ्या

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 18, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, त्वचेचीनिका, तेलकटत्वचा, कोरडीत्वचा, skin, pH, SkinProducts
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    लीना जोशी परुळेकर

    लेखाच्या या भागात आपण कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी कोणती उत्पादने वापरावीत, हे पाहणार आहोत. त्याआधी आपण आपल्या त्वचेचा pH म्हणजे काय ते पाहू. pH ची माहिती अशासाठी गरजेची आहे की, कोणत्या प्रकारची उत्पादने कोणत्या प्रकारच्या त्वचेवर वापरल्यानंतर त्वचेच्या pH चा समतोल राखला जातो, हे कळावे म्हणून.

    pH Scale ही 0 ते 14 या rangeमध्ये असते. त्यात 7 ही neutral (समतोल) range असते. 7 पेक्षा कमी range असेल तर ते acid मानले जाते आणि 7 पेक्षा जास्त range असेल तर ते alkali किंवा non-acid मानले जाते.

    आपल्या त्वचेच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ती नैसर्गिकरित्या acidic असते, तिची pH range ही 4.5 ते 5.5 च्या मधे असते. त्यामुळे त्वचेवर एक नैसर्गिक आवरण तयार होऊन ते आपल्या त्वचेचे हानीकारक bacteria, अतिनील किरण तसेच प्रदूषणापासून संरक्षण करते. आपल्या त्वचेचा pH हा आपल्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असतो.

    सामान्य त्वचेचा pH 4.7 ते 5.75 च्या दरम्यान असतो. तेलकट त्वचेचा pH हा 4 ते 5.2 च्या दरम्यान असतो. कोरड्या त्वचेचा pH हा 5.5 च्या पुढे असतो. संवेदनशील त्वचा आणि मिश्र त्वचा यांची pH level ही चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांत थोड्याफार फरकाने वेगवेगळी असते.

    आपण pH strips च्या मदतीने घरच्या घरी आपल्या त्वचेची pH level तपासू शकतो, पण त्याचे परिणाम बरोबर असतीलच असे नाही. आपण आपल्या त्वचेचा pH हा accurately dermatologistकडे जाऊन तपासू शकतो.

    सामान्य त्वचा ही सगळ्यात आरोग्यपूर्ण त्वचा असते. या प्रकारच्या त्वचेचा pH हा balance असतो. या त्वचेवर कोणतेही उत्पादन वापरायचे झाले तर, ते एकदम mild असले पाहिजे.

    तेलकट त्वचा ही आपल्या नैसर्गिक range पेक्षा कमी range मध्ये असते. म्हणजेच जास्त acidic असते. तेलकट त्वचेमध्ये मुळातच sebum Secretion जास्त असल्यामुळे तेलाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याला बाहेरून मिळणाऱ्या तेलाची आवश्यकता नसते. म्हणूनच तेलकट त्वचेवर water base उत्पादने म्हणजेच lotion आणि gel base उत्पादने वापरावीत.

    हेही वाचा – Skin Care : त्वचा आणि तिचे प्रकार

    तेलकट त्वचेवर रोज CTMS हा Plan वापरला गेलाच पाहिजे. तेलकट त्वचेवर खालीलप्रमाणे उत्पादनांचा वापर करावा.

    • Cleanser हे lotion किंवा gel स्वरूपात असावे.
    • Toner हे Alcohol Base Astringent वापरावे. यामुळे त्वचेवरील रंध्रे आकुंचन पावून त्वचा घट्ट होते आणि त्वचेवरील excess तेल साफ होऊन त्वचा कोरडी राहण्यास मदत मिळते. तेलकट त्वचेवर काहीवेळा मुरमांचे प्रमाण असते, astringent मुळे infection spread होण्याचे प्रमाण कमी होते.
    • Moisturizing, cleanser प्रमाणे हे सुद्धा lotion आणि gel स्वरुपात मिळते.
    • Sunscreen हे सामान्यत: lotion आणि gel स्वरुपात उपलब्ध असते.
    • बाजारात अनेक प्रकारची lotion आणि gel base उत्पादने उपलब्ध असतात. उत्पादनांवर तसा उल्लेख केलेला असतो. उदा. Cleansing lotion / cleansing gel किंवा moisturizing lotion / moisturizing gel किंवा Sunscreen lotion / Sunscreen gel.
    • ही उत्पादने हलकी असल्यामुळे त्वचेत ती सहजपणे मुरतात. या उत्पादनांचा चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा अंश रहात नाही.

    याशिवाय तेलकट त्वचेवर वाफ घेतली गेली पाहिजे. त्वचा जास्त तेलकट असेल, तिच्यावर मुरमे असतील तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा वाफ घेणे गरजेचे आहे. त्वचा कमी तेलकट असेल, तिच्यावर मुरुमे कमी असतील किंवा नसतील तर दोनवेळा तरी वाफ घ्यावी. वाफेमुळे चेहऱ्यातील रंध्रे मोकळी होतात. अतिरीक्त तेलकटपणा कमी होऊन त्वचा कोरडी होते.

    तसेच आठवड्यातून दोनवेळा तरी scrub चा वापर करावा. तेलकट त्वचेसाठी granulated (रवाळ) scrub वापरावा. Scrub मुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेचा थर निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे राठ त्वचा smooth होण्यास मदत होते. जेव्हा जेव्हा Scrub चा वापर केला जाईल, तेव्हा तेव्हा mask (लेप)चा वापर होणे गरजेचे आहे. चेहऱ्यावर मुरुमे असतील तर, तेवढ्याच भागाला मुरुमे कोरडे करणारा mask आणि इतर चेहऱ्याला oil control mask वापरावा.

    आपल्या रोजच्या CTMS plan मध्ये वाफ, Scrub, Mask या गोष्टी कशा बसवायच्या? तर जेव्हा आपण वाफ, Scrub, Mask वापरू, तेव्हा सर्वप्रथम cleansing करावे. त्यानंतर वाफ घ्यावी. नंतर Scrub वापरावा. त्यावर एकदम थोडे Gel base cream वापरावे. त्यावर mask वापरावा. 15 ते 20 मिनिटांनी Mask काढून टाकावा. त्यावर Toning करावे. Moisturizer लावून नंतर sunscreen लावावे.

    हेही वाचा – त्वचेची काळजी कशी घ्यावी?

    जेव्हा नुसती वाफ घ्यायची असेल आणि Scrub, mask लावायचा नसेल तेव्हा cleansing नंतर वाफ घ्यावी. चेहरा हलक्या हाताने पुसून त्यावर toning करावे, नंतर moisturizer आणि Sunscreen लावावे.

    पुढच्या लेखात आपण इतर त्वचा प्रकारांची काळजी कुठल्या प्रकारच्या उत्पादनांनी घ्यावी ते पाहू.

    lee.parulekar@gmail.com

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026 आरोग्य

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    By रविंद्र परांजपेApril 18, 2026

    मागील लेखात आपण योगासने अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण…

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026

    काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

    April 21, 2026

    Dnyaneshwari : अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें

    April 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 एप्रिल 2026

    April 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 274
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 392
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 197
    • मैत्रीण 18
    • ललित 571
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026
    Most Popular

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.