Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक… 

    April 24, 2026

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : स्वादिष्ट हंडी मसूर पुलाव
    फूड काॅर्नर

    Recipe : स्वादिष्ट हंडी मसूर पुलाव

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 11, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, Recipe, रेसिपी, स्वादिष्ट पुलाव, हंडी मसूर पुलाव, मसूर पुलाव, पुलाव, हंडी पुलाव
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    आज खूप दिवसांनी हंडीतला मसूर पुलाव केला. कधी कधी घरी एकटं असलं की, माझ्या आवडी निवडीनुसार स्वयंपाक करत असते. रोजच्या रामरगाड्यातून वेळ काढावाच लागतो कधी कधी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी, नाही का? मसूर पुलाव मला विशेष आवडतो. करायला सोपा आणि वन पॅाट मिल म्हणून बेस्ट आहे.

    साहित्य

    • बासमती तांदूळ – एक वाटी
    • अख्खा मसूर – अर्धी वाटी
    • काजू – आठ ते दहा
    • हिरवी मिरची – 3 ते 4
    • आले – 1 इंच (बारीक चिरून घ्यावे)
    • लसूण पेस्ट – 1 चमचा
    • मसाला वेलची – 2
    • दालचिनी – 1 इंच
    • तमालपत्र – 2
    • काळीमिरी – 2 ते 4
    • लवंग – 3 ते 4
    • दगडफूल – 1
    • जिरे – 2 चमचे
    • धणे पावडर – 2 चमचे
    • लाल मिरची पावडर – 1 चमचा
    • हळद – 1 चमचा
    • गोडा मसाला – 1 चमचा
    • एव्हरेस्ट पुलाव मसाला – 2 चमचे
    • मीठ – चवीनुसार
    • मोठा कांदा – 1 (उभा चिरलेला)
    • कोथिंबीर – मूठभर

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात

    कृती

    • अख्खे मसूर एक तास भिजवून ठेवावेत आणि नंतर पाणी काढून टाकावे.
    • मातीच्या हंडीमध्ये एक पळीभर तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा जिरे टाकावे.
    • जिरे तडतडल्यावर एक चमचा हिंग त्यात टाकावा, नंतर त्यात एक तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, मसाला वेलची, काळीमिरी, लवंग, दगडफूल टाकावे.
    • त्या नंतर उभा चिरलेला कांदा अर्धा टाकून तो गुलाबी झाल्यावर हिरवी मिरची, आले लसणाची पेस्ट टाकावी.
    • आले लसणाची पेस्ट थोडी परतल्यावर प्रत्येकी एक चमचा हळद, लाल तिखट, गोडा मसाला टाकून सर्व मसाले थोडे परतून घ्यावेत.
    • आता यामध्ये थोडे पाणी टाकून मसाल्यांचा फ्लेवर येऊ द्यावा.
    • त्यात भिजवलेले मसूर आणि दोन ते तीन वाट्या पाणी टाकावे.
    • मसूर अर्धवट शिजेपर्यंत बासमती तांदूळ धुवून बाजूला ठेवावे.
    • कांद्याचे काप आणि काजू तळून ठेवावेत.
    • पाचेक मिनिटे मसूर अर्धवट शिजल्यावर त्यात बासमती तांदूळ टाकावेत आणि सर्व मिश्रण एकत्र करून त्यामध्ये पुन्हा दीड वाटी पाणी घालावे. (शक्यतो गरजेनुसार पाणी टाकावे) मसूर पुलाव मंद आचेवर शिजवून घ्यावा.

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… मिरचीची भाजी- भाकरी

    टीप्स

    • साधारण दहा-बारा मिनिटांत हा पुलाव तयार झाला की, वरून दोन चमचे साजूक तूप सोडावे. नंतर अर्धे लिंबू पिळून लगेच झाकण ठेवावे. यामुळे साजूक तूप आणि लिंबाचा फ्लेवर भातामधे मस्तपैकी मिक्स होतो.
    • हा मसूर पुलाव सर्व्ह करताना वरून तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून पुदिना चटणी, दहीबुंदी रायते किंवा मठ्ठा यासोबत सर्व्ह करावा.
    • पुदिन्याची मूठभर पाने, थोडी कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरे, चवीनुसार साखर आणि मीठ तसेच दही घालून चटणी तयार करून घ्यावी.
    • पुलाव मातीच्या हंडीत केल्याने या मसूर पुलावाला एक वेगळाच सुगंध प्राप्त होतो.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : टेस्टी तोंडलीभात अर्थात मसालेभात

    April 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026 फूड काॅर्नर

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : टेस्टी तोंडलीभात अर्थात मसालेभात

    By माधवी जोशी माहुलकरApril 22, 2026

    पूर्वीच्या काळात म्हणजे साधारणपणे 1960 ते 1990च्या काळात लग्नसमारंभांमध्ये पंगतीला वरण भात, मसालेभात,  पातळ भाजी,…

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक… 

    April 24, 2026

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 एप्रिल 2026

    April 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 276
    • अवांतर 184
    • आरोग्य 104
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 394
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 198
    • मैत्रीण 18
    • ललित 575
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक… 

    April 24, 2026

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026
    Most Popular

    जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक… 

    April 24, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.