Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी । म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥172॥ तैशी कर्मीं जया अयोग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी खेळतां । आदिकरूनी ॥173॥ तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । नैष्कर्मींही दावावी । आचरोनि ॥174॥ तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजेलना ॥175॥ जैसी बहुरूपियाची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥176॥…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 27 सप्टेंबर 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 05 आश्विन शके 1947; तिथि : पंचमी 12.03; नक्षत्र : अनुराधा 25:07 योग : प्रीति 23:44; करण : कौलव 25:16 सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:30 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज शुभ संयोग घडून येतील. मध्यरात्रीनंतर होणारा चंद्राचा वृश्चिक राशीतला प्रवेश तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला बळकटी देईल, तसेच एखाद्या शुभ…
लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण make-up बद्दल आणि make-up उत्पादनांबद्दल माहिती घेतली. आता या भागात सुद्धा आपण Make-Up बद्दल माहिती घेऊ. Make-up ही अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याचे structure हे समान असते, पण shape वेगवेगळा असतो. त्यामुळेच Make-up करायचे technique सारखे असते म्हणजेच कुठले उत्पादन चेहऱ्याच्या कुठल्या भागात लावायचे, हे ठरलेले असते. उदा. Eyeliner पापण्यांच्या केसांना, blusher हे cheek bone वर, lipstick ओठांना इत्यादी. Make-up उत्पादने ही सर्व त्वचा प्रकारांसाठी उपलब्ध असतात. Make-up उत्पादने घेताना ती चांगल्या Brand ची घ्यावीत. एकतर ही उत्पादने व्यवस्थित test करूनच बाजारात उपलब्ध होतात. या उत्पादनांमध्ये जे colour pigment…
प्रणाली वैद्य भाग – 6 रॉकर्स चंदन नगरला ट्रेक करून काय गेले, काही दिवसांतच गावातल्या लोकांना वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जावं लागलं… कधी नव्हे ते काही दिवसांच्या अंतराने सौम्य भूकंपाचे धक्के जाणवायला लागले… पूर्वी कधी असं अनुभवलं नव्हतं, असच वडीलधाऱ्यांचं मत होतं. संपूर्ण गाव अस्वस्थ झालं होतं… असं होण्यामागे नक्की कारण काय? कोणालाच कळत नव्हतं… बऱ्याच तज्ज्ञ मंडळींनी तेथे येऊन तपास केला, मात्र हाती काही लागले नाही. सर्वात वयोवृद्ध आजोबांनी न राहून चावडीवर आपलं मत मांडलं… “आजवर गावात कधीच कुठला त्रास नव्हता, पण गेल्या काही दिवसांपासून मात्र गाव भीतीच्या सावटाखाली जगतोय. काही दिवसांपूर्वी आपल्या गावात मुंबईकडून काही मुलं येऊन गेली आणि…
आराधना जोशी पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : विड्याची पाने धुवून पूर्णपणे वाळायला – 45 मिनिटे प्रत्यक्ष कृतीसाठी – 10 मिनिटे एकूण वेळ : 55 मिनिटे साहित्य मध्यम आकाराची विड्याची पाने – साधारणपणे 35 (पाने आकाराने लहान असतील तर, 40 घेतली तरी चालतील) चुना – पाव टीस्पून काथ पावडर – पाव टीस्पून कच्ची बडीशेप – 4 टेबलस्पून कातरलेली सुपारी – 2 टेबलस्पून (इथे मसाला सुपारी वापरली तरी चालेल) खोबऱ्याचा किस – अर्धी वाटी लवंग – 5 ते 7 हिरवी वेलची – 5 ते 7 ओवा – अर्धा टेबलस्पून ज्येष्ठमध पावडर – 1 टेबलस्पून खडीसाखर – दीड टेबलस्पून…
माधवी जोशी माहुलकर भाग – 1 चंद्रपुरला असतांना 1995 साली आम्ही पहिल्यांदा ताडोबा या जंगलात गेलो होतो. तो माझा पहिला जंगल सफारीचा अनुभव असल्यामुळे त्याबद्दल खूप उत्सुकता होती. त्यावेळेस आजच्यासारखे जंगल सफारीचे खूप कडक नियम नव्हते. गेट पास काढला की, आपण आपल्या वाहनाने जंगल फिरू शकत होतो. जेव्हा मी पहिल्यांदा हे जंगल बघितले त्याच क्षणी ते माझ्या मनात ठसले. पुढे अनेकवेळा मग ताडोबाला जाण्याचा योग येत गेला. जितक्या वेळेस मी तिथे गेले, तितक्या वेळेस या जंगलाचे एकेक नवीन रूप दृष्टीस पडतं गेलं. पहिल्यांदा ताडोबाला जाण्याचा प्लॅन झाला तेव्हा, मनामधे खूप संमिश्र विचार होते. वाघ दिसेल, न दिसेल हा प्रश्न मनामध्ये…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन । नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥22॥ आतां आणिकाचिया गोठी । तुज सांगों काई किरीटी । देखें मीचि इये राहाटी । वर्तत असें ॥160॥ काय सांकडें कांहीं मातें । कीं कवणें एकें आर्तें । आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥161॥ तरी पुरतेपणालागीं । आणिकु दुसरा नाहीं जगीं । ऐसी सामुग्री माझां अंगीं । जाणसी तूं ॥162॥ मृत गुरूपुत्र आणिला । तो तुवां पवाडा…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 सप्टेंबर 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 04 आश्विन शके 1947; तिथि : चतुर्थी 09:32; नक्षत्र : विशाखा 22:08 योग : विष्कंभ 22:49; करण : बव 22:47 सूर्य : कन्या; चंद्र : तुळ 15:22; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:31 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 ललिता पंचमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस संमिश्र असेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या कायदेशीर वादात यश मिळेल. आज असा एखादा…
सतीश बर्वे बाबांची तब्येत अचानक बिघडल्याची बातमी मी सुचेताला कळवली होती. ते ऐकून तिकडे अमेरिकेत तिच्या घरी काय परिस्थिती झाली असेल याची मला इथे मुंबईत राहून जाणीव होती. मला जास्त काळजी आजोबावेड्या केदारची होती. तीन आठवड्यांपूर्वी बाबांना हस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं कळल्यावर सुचेता एकटीच अगदी दोन-तीन दिवसांसाठी येऊन बाबांना भेटून गेली होती. केदारची पदव्युत्तर परीक्षा अगदीच तोंडावर असल्याने तो इच्छा असूनही तिच्यासोबत येऊ शकला नव्हता. सुचेताशी काल रात्री फोनवर बोलताना केदारही माझ्याशी बोलला… बोलताना ढसाढसा रडत होता. “काका, आजोबांना माझा मेसेज वाचून दाखव प्लीज…” अशी विनवणीही त्यानं केली. त्याने लिहिले होते – “तुम्हाला माझ्यासाठी थांबायचं आहे आजोबा! मला खात्री आहे की,…
ॲड. कृष्णा पाटील माझा मित्र नंदूने नवीन बांधलेल्या घराचा ‘गृहप्रवेश’ कार्यक्रम होता. खूप वर्षांनी खपून त्याने दोन मजली घर बांधलं होतं. समोर अंगण ठेवून चहूबाजूंनी लाल चिऱ्याचे दगडी कंपाऊंड केलं होतं. कष्टाने मिळवलेली बरीच रक्कम या संपूर्ण कामासाठी खर्ची पडली होती. आयुष्यातली खूप वर्षे ती कमाई करण्यासाठी घालवली होती. कारण, सर्व सोयीसुविधा असलेलं घर बांधायचं… हे नंदूचं फार दिवसांपासूनचं स्वप्नं होतं. ते स्वप्न आज पूर्ण झालं होतं. म्हणूनच गृहप्रवेश करताना त्याला अतीव आनंद होणं, स्वाभाविक होतं. तर, त्या दिवशी नंदू खूप आनंदी होता. कार्यक्रम दुपारचा होता. खूप उत्साहाने आणि आग्रहाने गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नातेवाइक अन् मित्रांना बोलावलं होतं. त्यांच्या स्वागतासाठी हार,…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 248
- अवांतर 175
- आरोग्य 92
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 186
- मैत्रीण 17
- ललित 514
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
