Author: Team Avaantar

माधवी जोशी माहुलकर नवरात्रौत्सव म्हटलं की, मला आठवतो तो लहानपणी आमच्या घराजवळील रेणुका मातेच्या मंदिरात नित्यनेमाने येणारा पोतराज! हा शब्द तमिळ भाषेतील पोत्तुराजू या शब्दाचा अपभ्रंश होऊन पोतराज म्हणून रूढ झाला. दक्षिणेत ‘सात बहिणी’ म्हणून ग्रामदेवता पूजल्या जातात; त्यांचा पोतराज हा भाऊ आहे, अशी लोकमान्यता आहे. त्याच्या हातातील सोट्याला (चाबूक) ‘कडक’ असे म्हटले जात असल्यामुळे तो गावात आला की, ‘कडकलक्ष्मी आली’, असंही त्यांना संबोधले जायचे. स्वतःच्याच पाठीवर आसूड ओढणारा पोतराज पाहिला की, तेव्हा त्याची भीती वाटत असे… जसजसे मोठी होत गेले तशी ही भीती नाहीशी होऊन त्याची जागा कुतूहलाने घेतली. त्याच्या गळ्यात रंगबीरंगी मण्यांच्या माळा, कधी कवड्याची माळ ज्यामधे देवीचा…

Read More

आराधना जोशी पुरवठा संख्या – 4 व्यक्तींसाठी दूध मसाल्याचे साहित्य बदाम – अर्धी वाटी काजू – अर्धी वाटी पिस्ता – पाव वाटी हिरवी वेलची – 20 ते 25 (वेलची किती लहान किंवा मोठी आहे, त्यानुसार किती घ्यायची हे ठरवावे) केशर – 15 ते 20 काड्या किसलेले जायफळ – पाव टीस्पून हळद – 1 टेबलस्पून मिल्क पावडर – 2 टेबलस्पून (पूर्णपणे ऐच्छिक, वगळली तरी चालेल) तयारीस लागणारा वेळ : बदाम, काजू, पिस्ता भाजायला – 5 ते 7 मिनिटे भाजलेले बदाम, काजू, पिस्ता थंड व्हायला – 30 मिनिटे वेलची सोलायला – 5 मिनिटे मसाला करायला  – 2 मिनिटे एकूण कालावधी – अंदाजे…

Read More

प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष या आठवड्यात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. काम वाढल्यामुळे भोवतालचे मैत्रीचे वर्तुळ बदलेल आणि त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. आर्थिक प्रगती होईल. किचकट आणि छोट्या कामांतून सुटका होईल. महिलांना नवीन मैत्रिणी मिळू शकतात. त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला जायचा बेत आखाल. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बघावी आणि त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. मेहनत करा, यश तुमचेच आहे. ​वृषभ या आठवड्यात व्यावसायिकांना समाधान मिळू शकेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. अडकलेले पैसे मिळतील. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळू शकेल. नोकरदार कामात बदल करून सुधारणा करू शकतात. त्यामुळे कामे पटापट होतील…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा आजि श्रवणेंद्रिया पिकलें । जे येणें गीतानिधान देखिलें । आता स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें ॥1॥ आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी । आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥2॥ जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु । तैं भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥3॥ कैसी आगळिक दैवाची । जे गंगा वोळली अमृताची । हो कां जपतपें श्रोतयांची । फळा आली ॥4॥ आतां इंद्रियजात आघवें । तिहीं…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 ऑक्टोबर 2025; वार : रविवार भारतीय सौर : 13 आश्विन शके 1947; तिथि : त्रयोदशी 15:03; नक्षत्र : शततारका 08:00, पूर्वा भाद्रपदा 30:15 योग : गंड 16:33; करण : गरज 25:47 सूर्य : कन्या; चंद्र : कुंभ 24:45; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:25 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – …अन् एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा आनंद! दिनविशेष माजी कसोटीपटू माधव आपटे टीम अवांतर माजी कसोटीपटू माधव लक्ष्मणराव आपटे यांचा जन्म 5…

Read More

डॉ. प्रिया  गुमास्ते  आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर  कन्सलटन्ट वर्षा हा मोहक पावसाचा ऋतू श्रावण आणि भाद्रपद महिन्यांत भारतीय उपखंडात पसरतो. (Mid-June to Mid-September). वर्षा ऋतू हा जलतत्वाशी संबंधित आहे. हा पोषण, पुनरुज्जीवन आणि परिवर्तनाचा काळ आहे. या ऋतूमध्ये वातावरण आणि पर्यावरणाच्या गुणांमध्ये लक्षणीय बदल होतात, ज्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पाऊस हा एक नैसर्गिक शुद्धीकरण करणारा  आहे, म्हणून हा ऋतू शुद्धीकरण आणि विषमुक्तीचा काळ मानला जातो. तो वातावरण आणि पृथ्वीवरील विषारी पदार्थ आणि अशुद्धता धुऊन टाकतो. या ऋतूत  अनेक औषधी वनस्पतींची लागवड केली जाते. दोष आणि ऋतू वर्षा ऋतू हा काळ वात दोषाच्या प्रकोपाचा असून या…

Read More

रविंद्र परांजपे आत्तापर्यंतच्या सर्व लेखांमध्ये आपण निरामय आरोग्य या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती घेतली. आता आपण निरामय आरोग्याची वाटचाल आरंभ करणार आहोत… आणि या वाटचालीत आपण निरामय आरोग्याचे विविध पैलू जाणून घेणार आहोत. थोडक्यात, निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी आपण काय करावे, तसेच आपण काय करू नये, याबाबत सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन घेणार आहोत. मार्गदर्शनाचा श्रीगणेशा आपण दिनचर्येपासून करूयात. दिनचर्या म्हणजे काय? दिन म्हणजे दिवस आणि चर्या म्हणजे पथ्ये. सोप्या भाषेत दिनचर्या म्हणजे विहार. थोडक्यात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण करत असलेल्या सर्व कामांचा समावेश दिनचर्येत होतो. आता आपण ‘सकाळी लवकर उठावे’ या लेखाच्या मूळ विषयाकडे वळूयात. हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत. किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – गृहिणींना नॉनव्हेज किंवा रसभाजीसाठी कांद्याची पेस्ट लागते. त्यासाठी तीन-चार कांदे चिरून नंतर ते कढईत भाजून घ्यावे लागतात. भाजल्याने कांद्यातील रस आटतो आणि जीवनसत्त्वे नष्ट पावतात. तसेच चिरणे, भाजणे यात वेळ जातो आणि गॅसही वाया जातो. त्याऐवजी, आपण जेव्हा भातासाठी कूकर लावतो, तेव्हा भाताच्या ताटलीवर कांदे ठेवून द्यावेत. व्यवस्थित उकडले जातात. थंड झाल्यावर त्यांची मिक्सरमध्ये छान पेस्ट होते आणि जीवनसत्त्वेही टिकून राहतात. वेळेची, गॅसची बचत होते आणि रसभाजीला छान चवही येते. मीठ, ओला नारळ, हिरवी मिरची, कोथिंबीर,…

Read More

हिमाली मुदखेडकर “आई, माझ्या फिजिक्सच्या सरांनी तुला भेटायला बोलावले आहे…” चिरंजीव घरात येता येता सांगते झाले… “का रे बाबा? काय प्रताप करून ठेवलायस? कालच तर त्यांच्या नावे ॲप्लिकेशन नेलेस ना, माझ्या सहीने… मग आता काय?” “माहिती नाही यार… सगळ्यांनीच दिलं ॲप्लिकेशन…” मला वाटलं, याने केलं असणार काहीतरी किंवा मागच्या पालक सभेत आम्ही हजर नव्हतो म्हणून कदाचित असेल बोलावले! जाऊन तर पाहू, उद्या कळलेच काय प्रगती आहे ते… आधी फोन करून दुसर्‍या दिवशी सकाळी अकरा वाजताची वेळ ठरवून घेतली.. आणि ठरलेल्या वेळेत पोहोचले… दारावर टकटक करून ‘आत येऊ का,’ असे विचारले… समोरची व्यक्ती साधारण माझ्याच वयाची… रंग सावळा, शिडशिडीत बांधा, उंची…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते । एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥40॥ तैसे उपाय कीजती जे जे । ते यांसीचि होती विरजे । म्हणोनि हटियांतें जिणिजे । इहींचि जगीं ॥266॥ ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे आहे भला । तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥267॥ तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥41॥ यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें वियें । आधी निर्दळूनि घालीं तियें । सर्वथैव…

Read More