Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी शिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सुखनिद्रा महत्त्वाची आणि आवश्यक दिनविशेष मराठी लघुकथाकार दिवाकर कृष्ण टीम अवांतर प्रसिद्ध मराठी कथाकार दिवाकर कृष्ण केळकर म्हणजेच दिवाकर कृष्ण यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1902 रोजी गुलबर्गा जिल्ह्यातील गुंटकल (गुनमटकल) येथे झाला. पुढे मुंबई, पुणे आणि सांगली येथे राहून एम्. ए., एल्एल्. बी. झाल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथे वकिलीचा व्यवसाय करायला सुरुवात केली. 1922मध्ये मासिक मनोरंजनाच्या एका अंकात ‘अंगणातला पोपट’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह ‘समाधी व इतर सहा गोष्टी’ या नावाने 1927 साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर 1941 साली रूपगर्विता आणि सहा गोष्टी तर 1955…
माधवी जोशी माहुलकर गूळ आणि कणीक यांचे शंकरपाळे म्हणजे अफलातून स्वाद! गुळाचे आणि गव्हाचे इतकं ‘गूळपीठ’ आहे ना की, एकमेकांमध्ये ते कधी अधीन होऊन एकजीव होतात, हे कळत नाही! कणकेमध्ये साखरेपेक्षा गुळाचा गोडवा चवीला जास्त छान लागतो नक्कीच! गूळ आणि कणकेचे शंकरपाळे करायला अगदी सोपे… फार काही जास्त तामझाम न करता सगळ्या पदार्थांमधे आपला गोडवा व वेगळेपण जपणारा पदार्थ आहे! साहित्य हेही वाचा – दिवाळी फराळ… प्रथा आणि परंपरेची जपणूक कृती हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… मिरचीची भाजी- भाकरी टीप एकूण कालावधी – एक ते दीड तास तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ…
हिमाली मुदखेडकर सकाळच्या वेळेस मुलखाची घाई… स्वयंपाकघरातील नित्यावळी आटोपता आटोपता जीव मेटाकुटीला आलेला… अशात दारावरची बेल वाजली की, सहाजिकच कपाळावर आठी पडते… ती लपवत दार उघडलं… तर आश्चर्याचा सुखद धक्काच बसला…! दारात सृष्टी उभी!! सृष्टी… माझी मैत्रिण… पूर्वीची शेजारीण… दोन-तीन वर्षांच्या शेजार सहवासात खूप छान कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झालेला आमच्या दोन्ही कुटुंबात… तीही माझ्यासारखीच, गृहिणी! दुपारी चहा घेता घेता आमच्या रोज गप्पा चालत तेव्हा… एकमेकींकडे पदार्थांच्या वाट्या पोहोचवणे, हा तर नित्यक्रम होता… पुढे मुलाला कॉलेज दूर पडते म्हणून आम्ही जागा बदलली. पण अधून मधून एकमेकींना भेटत बोलत होतोच… हेही वाचा – सुलू… हवी मायेची गुंतवणूक! “तुझं आवर तू… तोवर मी…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा येरां विरक्ति माळ न घालीचि । जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि । जें योगुयागु न करितीचि । जन्मले सांते ॥154॥ जयां ऐहिक धड नाहीं । तयांचें परत्र पुससी काई । म्हणोनि सांगों कां वांई । पंडुकुमरा ॥155॥ एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । कर्मजान् विद्धि तान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥32॥ ऐसे बहुतीं परीं अनेग । जे सांगितले तुज कां याग । ते विस्तारुनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ॥156॥ परि…
दर्शन कुलकर्णी धनत्रयोदशी शनिप्रदोष गुरुद्वादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस अनेक शक्यतांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळतील. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. वरिष्ठांकडून प्रशंसा होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून एखादी चांगली बातमी ऐकू येईल. आज आरोग्य थोडेसे बिघडू शकते. वृषभ – दिवसभरात गोंधळाची परिस्थिती असेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. काही लोक प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र, आत्मविश्वासाने आणि संयमाने या अडथळ्यांवर मात करू शकाल. आज आर्थिक बाबींबाबत खूप काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. कुटुंबात एखादा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. मिथुन – दिवस उत्साह आणि आनंदाने भरलेला असेल. करिअर आणि व्यवसायाच्या…
आराधना जोशी दिवाळी म्हणजे आनंदोत्सव… गणेशोत्सव आणि दिवाळी हे दोन सण असे आहेत की, या काळात मनातील उल्हास ओसंडून वाहात असतो. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव. चिंता-विवंचनांची जळमटं झाडून टाकून आनंदाचे आकाशदिवे झगमगत ठेवणारा सण. घरासमोर शांतपणे तेवणारी पणती… छानसा आकाशकंदिल… घरात फराळाचा घमघमाट… तर, भल्या पहाटे उटण्याचा अन् सुवासिक तेल, साबणाचा घमघमाट… असे मन प्रसन्न करणारे वातावरण म्हणजे दिवाळी. पूर्वी रेडिमेड कंदिल आणण्याऐवजी आकाशकंदिल घराघरांत बनवला जायचा. वडिलधाऱ्यांकडून मुलांना आकाशकंदिल तयार करण्याचे धडे दिले जायचे. रंगीत कागद, घरी केलेली खळ यांच्या मदतीने कंदिल तयार केले जात होते. याच्याबरोबरीनेच वाडीतला सार्वजनिक कंदीलही त्याच उत्साहाने तयार केला जायचा. बहुधा ती चांदणीच असायची. त्यासाठी…
भाग – 9 मुलं घरी परतली, पण आता कोणाच्याही डोक्यातून हा विषय निघून जाणारा नव्हता… दुसरीकडे मात्र डॉक्टर देवदत्त वेगळ्याच विचारात होते. त्यांनी शाल्मलीचे डिटेल्स समोर ठेऊन तिची कुंडली मांडली… ती पाहून ते आश्चर्यचकित झाले… हे योग आधी कुठे तरी पाहिल्याचे त्यांच्या लक्षात आले… नक्की याचीच कमाल आहे… म्हणून ती त्या शक्तीसमोर उभी ठाकली आणि तिच्याच मुळे ते दोघे वाचले! नुसते वाचले नाहीत तर, तेथून ती मोहोरही घेऊन आले… एका वेगळ्याच सत्याप्रत डॉक्टर देवदत्त येऊन ठेपले होते; पण त्याची त्यांनाच स्पष्टपणे उकल होत नव्हती… त्या विचारातच ते झोपी गेले… ‘देवदत्त… देवदत्त…’ कोणाची हाक ऐकू आली… डोळे किलकिले करून डॉक्टरांनी पाहिलं……
कामिनी व्यवहारे कुठे प्रवासाला जायचं असेल तर, रस्त्यात खाण्यासाठी म्हणून अनेकदा ब्रेड-बटर किंवा सँडविचचा बेत आखला जातो. पण या ब्रेडपासून आणखी एक स्वादिष्ट पदार्थ तयार केला जातो, तो म्हणजे सर्वांचे मनपसंत असे ब्रेड रोल्स. झटपट होणारा हा पदार्थ संध्याकाळच्या चटपटीत नाश्त्यासाठी किंवा शाळेतून आलेल्या मुलांच्या नाश्त्यासाठी बनवता येतो. तयारीसाठी कालावधी – 15 ते 20 मिनिटे तळणासाठी कालावधी – 15 ते 20 मिनिटे एकूण कालावधी – 30 ते 40 मिनिटे साहित्य हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का? कृती हेही वाचा – Recipe : राजेळी केळ्यांचे उंबर अन् कढी गोळे तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर,…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे । प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥29॥ मग अपाग्नीचां मुखीं । प्राणद्रव्यें देखीं । हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ॥145॥ एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहींतेंही निरुंधिती । ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ॥146॥ अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति । सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥30॥ एक वज्रयोगक्रमें । सर्वाहारसंयमें । प्राणीं प्राणु संभ्रमें । हवन करिती ॥147॥ ऐसे मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ । जिहीं यज्ञद्वारा मनोमळ…
दर्शन कुलकर्णी वसुबारस / गोवत्स द्वादशी रमा एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस यश आणि उत्तम कामगिरीने भरलेला असेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. काही प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल, मात्र त्यामुळे अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात. आज आत्मविश्वास उंचावलेला असेल. वृषभ – कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम बाळगावा लागेल; घाईघाईने निर्णय घेणे महागात पडू शकते. नोकरदार जातक आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. काही आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जास्त काळजी घ्या. आरोग्य देखील बिघडण्याची शक्यता आहे. मिथुन – कला आणि साहित्याकडे कल वाढेल. तुमच्या कल्पनांनी इतर…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 249
- अवांतर 175
- आरोग्य 92
- पंचांग आणि भविष्य 363
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 186
- मैत्रीण 17
- ललित 514
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
