Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा या सोपिया योगस्थिति । उकलु देखिला गा बहुतीं । संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ॥387 ॥ तें सुखाचेनि सांगातें । आलें परब्रह्मा आंतौतें । तेथ लवण जैसें जळातें । सांडूं नेणे ॥388॥ तैसें होय तिये मेळीं । मग साम्यरस्याचिया राउळीं । महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे ॥389॥ ऐसें आपुले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी । हें पार्था नागवे तरी । आन ऐकें ॥390॥ सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि । ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥29॥ यो मां पश्यति…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – विचारपूर्वक गुंतवणूक करा, पुढील काळात चांगला लाभ होऊ शकतो. आज मान्यवर संस्थेकडून सन्मान मिळू शकतो. जोडीदाराचा सल्ला कौटुंबिक व्यवसायात फायदेशीर ठरेल. जुन्या मित्रांचा पाठिंबा मिळेल, नवीन मित्र देखील बनवाल. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळू शकेल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. वृषभ – दिवसभर व्यग्र राहाल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. सासरच्यांशी संबंध सौहार्दपूर्ण असतील. महत्त्वाच्या वस्तूंची ऑनलाइन शॉपिंग कराल. चांगला परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक कराल. संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यक्रमाला उपस्थित रहाल. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन – दिवस खर्चिक असेल, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्यात विरोध होईल, त्यामुळे सावध रहा.…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. येत्या 19 डिसेंबर 2025 ला माझा सिनेमा रीलीज होतोय, ‘आशा’… आशा रुग्णसेविकांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. सिनेमा खूप छान झालाय. त्याचा प्रत्यय पण आलाय. हा चित्रपट महाराष्ट्र राज्य पुरस्काराचा मानकरी ठरलाय, तेही चार पुरस्कारांचा… उत्कृष्ट सिनेमा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि उत्कृष्ट अभिनेत्री! देश-विदेशातल्या चित्रपट महोत्सवांमध्ये या सिनेमाने धम्माल उडवली. थिएटरमध्ये जाऊन बघा बरं हा सिनेमा सगळ्यांनी! Enjoy करा… तर, तुम्ही ओळखलं असेलच की, आजचा लेख ‘आशा’ सिनेमाशी जोडलेला आहे. भर नवरात्रीमध्ये जळगाव-धुळ्यामध्ये आम्ही सिनेमाच शूटिंग करत होतो. रिंकू राजगुरू, खरंतर फार लहान वयात उगवलेली चांदणी (स्टार). बरेचदा अशी…
आराधना जोशी साहित्य पुरवठा संख्या : 2 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : 10 मिनिटे शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे एकूण वेळ : 20 मिनिटे हेही वाचा – Recipe : लो कार्ब वेजी टोस्ट कृती विशेष आहार माहिती : शाकाहारी, प्रोटिनयुक्त हेही वाचा – Recipe : खानदेशी पद्धतीची शेव भाजी टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
पराग गोडबोले आज पुण्याची फेरी होती, ऑफिसच्या कामासाठी… मागच्या वेळी घाटात बराच वेळ अडकलो होतो, त्यामुळे या वेळी विषाची परीक्षा नको परत, म्हणून आधीच ट्रेनचं तिकीट काढून ठेवलं! इंद्रायणी नेहेमीप्रमाणे दुथडी भरून वाहत होती, त्यामुळे त्या गाडीचा योग नव्हताच नशिबात… मग लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम, अशा लांबच्या गाडीचं मिळालं तिकीट. गाडी सकाळी साडेसात वाजता कल्याण, साडेदहाला पुण्यात! ऐसपैस बसून जाण्यासाठी मस्त AC 3T चं तिकीट काढलं. इंद्रायणी एक्स्प्रेसच्या कुर्सीयानात बसून, अवघडलेला प्रवास करण्यापेक्षा हे खूप छान… किमतीनं हे तिकीट जास्त पडतं, पण प्रवास आरामाचा आणि सुखाचा होतो! साडेसातची गाडी पकडायला, बायकोच्या धोशामुळे साडेसहालाच घरून निघालो. जेमतेम दहा मिनिटांचा प्रवास संपवून, स्टेशनवर…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया । आत्मसंस्थं मनः कृत्वा न किचिंदपि चिन्तयेत् ॥25॥ यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् । ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥26॥ बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा । हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं ॥378॥ याही एके परी । प्राप्ती आहे विचारीं । हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें ॥379॥ आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला । जैसा कृतनिश्चयाचिया बोला – । बाहेरा नोहे ॥380॥ जरी…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन स्पष्ट आणि चोख असू द्या. कामातील अडथळ्यांवर मात करता येईल. योग्य सोयी आणि समन्वय यामुळे कामात प्रगती होईल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कामे पूर्ण करण्यास मदत होईल. काही कामांसाठी प्रवास करणे आवश्यक ठरेल. प्रवासामुळे दीर्घकालीन फायदे मिळतील. वृषभ – व्यवहारात संदिग्धता चांगली नाही. दुपारपूर्वीचा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. व्यवसायात प्रगती होत राहील. व्यवहारातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न कराल. तुमची इच्छित कामे यशस्वी होतील. इतरांच्या बाबींमध्ये अडकण्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मिथुन – अनेक दिवसांची स्वप्ने सत्यात उतरतील. परस्परसंवादातून कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे…
दिलीप कजगांवकर “डार्लिंग, बाबांचा फोन होता. दोन आठवड्यांनी आई-बाबा येणार आहेत आपल्याकडे… चांगला दहा दिवसांचा मुक्काम असणार आहे त्यांचा. आपण त्यांना पाचगणी-महाबळेश्वरला नेऊ या.” “राज, अरे दोन आठवड्यांनी आपल्याला नासिकला जायचे आहे ना? सांग ना त्यांना येऊ नका म्हणून.” “नेहा, कॅन्सल करूया नासिकला जायचे!” “तू कर तुझे कॅन्सल, पण मी मात्र जाईन.” “नेहा, अगं किती दिवसांनी येताहेत ते. नासिकला नंतर जाऊ या.” “सहा महिन्यांपूर्वी तर आले होते, चांगले चार-पाच दिवस राहिलेत… सोयीस्कररित्या विसरलास का राज?” “नेहा, चुकतेस तू?” “राज, मी चुकते अन् तू बरोबर का? तुझं नेहमीचच, मीच चुकते.” “नेहा, माझ्या आठवणीप्रमाणे गेल्या संपूर्ण वर्षभरात ते आलेच नाहीत आपल्याकडे…” “राज,…
शोभा भडके भाग – 4 “हां आई… अगं कुठे आहेस तू? मी केव्हाची घरी आलेय, दाराला कुलूप आहे…” भावना दारातच फेऱ्या मारत फोनवर बोलत होती. तोच मागून येत आरूने (आराधना) तिचे डोळे झाकले… त्यामुळे भावना थोडी दचकली; पण लगेच नॉर्मल झाली आणि गालात हसली… तिच्या डोळ्यांवरच्या हातांना चाचपडत म्हणाली… “आरूSS” “काय गं ताई… नेहमीच कशी गं ओळखतेस तू?” आरू बाजूला होत लटक्या रागात म्हणाली. “अरे देवा, माझ्या आरूला राग आला का? पण मी तरी काय करणार? तुझ्याशिवाय दुसरं कोणी माझे असे डोळेच झाकत नाही तर मला कसं नाही कळणार!” भावनाने तिला मागून मिठी मारत, तिच्या गालावर किस करत म्हणाली. मग…
माधवी जोशी माहुलकर अंबाडीची भाजी ही लोहयुक्त आहे, अंबाडीमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाणात वाढ होते. दृष्टीक्षमता वाढते. शिवाय, त्वचेवरील रोगांचे संक्रमण कमी होतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवते. एवढेच नव्हे तर, अंबाडीच्या सेवनाने पचन सुधारते, भूक वाढते. हाडे मजबूत होण्यास मदत होते. अंबाडीचा रसाचे सेवन मधुमेहीसाठी योग्य असल्याचे मानले जाते. अंबाडीचा सेवनाने रक्तवाहिन्यांचे कार्य व्यवस्थित होते. परिणामी हृदयरोग, उच्च रक्तदाब नियंत्रणास मदत होते. अंबाडीच्या फुलांपासून जॅम, चहा, सरबत, चटणी आणि जेली, पानांपासून सूप, लोणचे, बियांपासून बेसन आदी नावीन्यपूर्ण प्रक्रिया पदार्थ तयार करणे शक्य आहे. अंबाडीच्या पानांची आंबटगोड भाजी ज्वारीच्या किंवा तांदळाच्या कण्या घालून खूप छान होते आणि यासोबत भाकरी म्हणजे काय सुख असतं, हे खाणाऱ्यालाच…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
