Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दिलीप कजगांवकर मागच्याच आठवड्यात आबासाहेब आणि आईंच्या लग्नाचा 51वा वाढदिवस राज आणि नेहाने मोठ्या उत्साहात साजरा केला. दुसऱ्या दिवशी नेहा आणि तिची दोन्ही मुले, नेहाच्या माहेरी गेली. राजने आई-बाबांना मॉलमध्ये नेले, त्यांच्यासाठी कपडे, बुट, चपला, चष्मा एवढेच काय अगदी टुथब्रश आणि कंगवे देखील खरेदी केले. छानशा हॉटेलमध्ये जेवण… मराठी सिनेमा, संध्याकाळी बागेतील फेरफटका, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम आणि त्यानंतर ते घरी परतले. एकंदरीत दिवस खूपच छान गेला. “राज किती खर्च करतोस आमच्यावर?” न राहवून आई-बाबांनी विचारले. “दोन दिवस आपल्याला पाचगणी-महाबळेश्वरला जायचेय आणि त्यानंतर साताऱ्याला…” राजने त्याचा प्लॅन आई-बाबांना सांगितला. पुढील दोन दिवस राज आणि आई-बाबा पाचगणी-महाबळेश्वरला मनसोक्त भटकले. रात्री न आईने…
माधवी जोशी माहुलकर वजन मेन्टेन करण्याकरिता व्यायामासोबतच डाएटही महत्त्वाचे आहे. वेट लॅास करण्यासाठी तेल, तूप बटर न वापरता मोड आलेल्या मुगाचे सूप (कढण) खूपच फायदेशीर ठरते. हे सूप चवीला अतिशय सुरेख आणि पौष्टिक आहे. हे कढण वाटलं तर मऊ भातासोबत खाऊ शकता किंवा वाटीने नुसते पिऊ पण शकता. चॅाईस तुमचा! साहित्य हेही वाचा – Recipe : अंबाडीची फुले आणि पुदिन्याची चटणी कृती हेही वाचा – Recipe : पोळीचे चटकदार खस्ते! टिप्स एकूण कालावधी – साधारणपणे अर्धा तास तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या…
पराग गोडबोले “आई, या फॉर्मवर इथे सह्या कर,” असं सागर म्हणाला आणि मी यंत्रवत ओढली गेले त्याच्याकडे. खरंच, गेल्या काही दिवसांत किती पोक्त आणि समंजस झाला होता माझा बंब्या! पेन दिलं त्याने मला आणि तो म्हणेल तिथे, अगदी मुकाट्याने सह्या केल्या मी… माझं झाल्यावर नीलेशची पाळी. त्याच्या पण सह्या घेतल्या त्याने आणि आम्हाला थांबायला सांगून निघून गेला, आत कुठेतरी… दहाच मिनिटांत आला परत आणि म्हणाला, “चला माझ्या सोबत.” आम्ही दोघे त्याच्या मागोमाग पोहोचलो एका साहेबांच्या समोर…, आणखी काही सह्या केल्या, एकमेकांना हार घातले आणि काम फत्ते! साहेबांनी आमचं अभिनंदन केलं. सागरने स्वतः आम्हा दोघांना पेढे भरवले आणि हसत हसत म्हणाला,…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा अर्जुन उवाच – योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन । एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम् ॥33॥ चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् । तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिवि सुदुष्करम् ॥34॥ अर्जुन म्हणे देवा । तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा । परी न पुरों जी स्वभावा । मनाचिया ॥411॥ हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें । एऱ्हवी राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ॥412॥ म्हणोनि ऐसें कैसें घडेल । जे मर्कट समाधी…
दर्शन कुलकर्णी सफला एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे उत्साह आणखी वाढेल. परंतु, प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तब्येत बिघडू शकते. आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. मनावर नियंत्रण ठेवा, अन्यथा महत्त्वाचे निर्णय घेताना अडचण येणार नाही. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखला जाण्याची शक्यता आहे. वृषभ – सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आपल्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यत त्या कोणालाही सांगू नका. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे, परंतु, या सोबतच दान-पुण्य करावे. कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण असेल. मिथुन – मौज, मस्ती, मजा…
शोभा भडके भाग – 5 आज आरूचं (आराधना) कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचंय होतं, त्यामुळे ती राम आणि भावनासोबत ‘प्रमोदिनी फॅशन डिझायनर कॉलेज’मध्ये आली होती. रामने सगळ्या फॉरमॅलिटी पूर्ण केल्या… तोवर भावना आणि ती कॉलेज पाहात होत्या. “चला, झालं काम निघूया आपण आता…” राम त्यांच्याजवळ येत म्हणाला. “दादा, झालं एडमिशन माझं! कधीपासून यायचं कॉलेजला?” आरुने उत्सुकतेने विचारलं… तिचा आनंद ओसंडून वाहात होता. त्यासाठी कितीतरी गोड गोड बोलावं लागलं होतं… सकाळी लवकर उठून कामात मदत करायला लागली होती… चुलीवर भाकरी केल्या होत्या… एवढंच काय तर, शेतात भाऊ आणि दादाला पण मदत केली होती! उद्देश काय तर, एकच, आई आणि भाऊची मर्जी मिळवायची होती……
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे बनविण्याच्या टिप्स पाहुयात. हेही वाचा – Kitchen Tips : केळ्याचे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ… हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसे, स्वादिष्ट चकली आणि दहिवडे, स्पाँजी ढोकळा (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः । सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥31॥ जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेचि किरीटी । देखिला जैसा पटीं । तंतु एकु ॥398॥ कां स्वरूपें तरी बहुतें आहाती । परी तैसीं सोनीं बहुवें न होती । ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणें ॥399॥ ना तरी वृक्षाचीं पानें जेतुलीं । तेतुलीं रोपे नाहीं लाविलीं । ऐसी अद्वैतदिवसें पाहली । रात्री जया ॥400॥ तो पंचात्मकीं सांपडे । तरी मग सांग पा कैसेनि…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष समांतर चित्रपट चळवळीला नवी दिशा देणारे श्याम बेनेगल टीम अवांतर ख्यातनाम भारतीय दिग्दर्शक आणि पटकथाकार श्याम बेनेगल यांचा जन्म 14 डिसेंबर 1934 रोजी हैदराबाद मध्ये त्रिमुलागिरी येथे झाला. श्याम बेनेगल यांचे पूर्ण नाव श्यामसुंदर श्रीधर बेनेगल असे होते. लहानपणापासूनच श्याम बेनेगल यांना चित्रपट पाहण्याची खूप आवड होती आणि त्यांच्या या छंदाला कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिले. बालवयातच त्यांनी चित्रपट क्षेत्राचा ध्यास घेतला. उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातून पदवी मिळवल्यानंतर ते मुंबईमध्ये लिंटास या मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये कॉपीरायटर म्हणून काम करू लागले. त्यावेळी अनेक जाहिराती आणि लघुपट बनवताना चित्रपटाच्या तांत्रिक अंगांचा त्यांना भरपूर अनुभव मिळाला. 1962मध्ये त्यांनी…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा या सोपिया योगस्थिति । उकलु देखिला गा बहुतीं । संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ॥387 ॥ तें सुखाचेनि सांगातें । आलें परब्रह्मा आंतौतें । तेथ लवण जैसें जळातें । सांडूं नेणे ॥388॥ तैसें होय तिये मेळीं । मग साम्यरस्याचिया राउळीं । महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे ॥389॥ ऐसें आपुले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी । हें पार्था नागवे तरी । आन ऐकें ॥390॥ सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि । ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥29॥ यो मां पश्यति…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 361
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 512
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
