Author: Team Avaantar

दीपक तांबोळी भाग – 2 नाना यात्रेला गेल्यावर तिन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांची आपसांत खलबतं होऊ लागली. सध्याच्या वादावर काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक होतं. एक दिवस त्यांना तशी संधी चालून आली. प्रसादच्या बायकोचा भाऊ आपल्या आर्किटेक्ट मित्रासोबत भेटीला आला. तो प्रशस्त बंगला आणि ती बाग बघून तो खूश झाला. गेल्या सहा-सात महिन्यांपासून त्याच्याकडे काही काम नव्हतं. बंगल्याकडे पाहून त्याला एक कल्पना सुचली… त्याने ती प्रसादला सांगितली. प्रसादला ती कल्पना जाम आवडली. त्याने ती आपल्या दोन्ही भावांना सांगितली. ती ऐकून अंकीतने आनंदाने उडीच मारली. विवेक मात्र फारसा समाधानी दिसला नाही. “कल्पना चांगली आहे. पण नानांचं काय? ते तयार होतील का? शेवटी…

Read More

हर्षा गुप्ते घरात झटपट, पण स्वादिष्ट काय करायचं? हा प्रश्न गृहिणींच्या मनात असतो. त्यातही असा पदार्थ हवा जो, मुलांना आवडणारा हवा! घरात उपलब्ध सामग्रीत हा पदार्थ बनवायचा असतो. मग अशावेळी ‘बन’ हा प्रकार कामाला येतो. साधारण 40 ते 45 मिनिटांत बन डोसा तयार करता येतो. तर, अर्ध्या तासात खमंग असा रव्याचा बन तयार करता येतो. पाहूयात रव्याचा बन करण्याची रेसिपी. बच्चे कंपनीला हा पदार्थ नक्की आवडेल. साहित्य हेही वाचा – Recipe : भाताचे स्वादिष्ट कटलेट आणि दही ब्रेड कृती हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट शेंगा डाळ अन् मिस्सी रोटी एकूण कालावधी – साधारण अर्धा तास पुरवठा संख्या – चार…

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर काय हे मन… मन… ‘मन म्हणजे फक्त डोक्यातील गुंतागुंतीचा गोंधळ आहे. खरं विज्ञान हे फक्त दिसणारं आणि मोजता येणारं असावं… आणि माणसात जे दिसतं-अनुभवता येतं ते म्हणजे वर्तन!’ तो येता-जाता नेहमी हे वाक्य बोलत असे… तो म्हणजे एकेकाळी अमेरिकेत एक प्रचंड हुशार, पण तितकाच हट्टी असलेला एक मानसशास्त्रज्ञ! याचं गुपित कदाचित त्याच्या बालपणात दडलं होतं; फक्त 13 वर्षांचा असताना त्याच्या बाबानं कुटुंब सोडून दिलं, यामुळं तो आयुष्यभर नात्यांबद्दल थोडासा कठोर आणि थंड राहिला… बहुदा म्हणूनच त्याच्या मानसशास्त्रात, मनोविश्लेषणात भावभावनांना फारसं स्थान नाही; महत्त्वाचं आहे ते फक्त वर्तन! त्याची आई अतिशय ‘धार्मिक’ होती आणि आपल्या मुलानं पाद्री बनून…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा हा आतां आघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा । योगपरिचयो आम्हां । जाहला आजी ॥429॥ अर्जुन उवाच – अयतिः श्रद्धयोपेतो योगात् चलितमानसः । अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥37॥ कच्चित् नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति । अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥38॥ एतत् मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः । त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥39॥ परि आणिक एक गोसांविया । मज संशयो असे साविया । तो तूंवांचूनि फेडावया । समर्थु नाहीं ॥430॥ म्हणोनि सांगें गोविंदा । कवण एकु…

Read More

दर्शन कुलकर्णी प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज जास्त काम असेल आणि ते पूर्ण करताना काही अडचणी येऊ शकतात. कठोर परिश्रमामुळे यश मिळू शकते. कौटुंबिक समारंभासाठी मोठा खर्च होऊ शकतो. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे कौटुंबिक समस्या समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – कामाच्या ठिकाणी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि पुढे जा. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कोणतेही प्रॉपर्टी डील करण्यापूर्वी, वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. आज एखादा नवीन उपक्रम सुरू करू शकता. कौटुंबिक वातावरण चांगले असेल, तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल. आरोग्यही…

Read More

चंद्रकांत पाटील पांडू साधारण वय 60 आणि वजन 55 किलो… नुसता हाडाचा सापळाच, खरडून काढलं तर अंगावर चमचाभर सुद्धा मांस निघायचं नाही, अशी शरीर रचना. आत गेलेले गाल, पैलवान टाईप केसाचं कटिंग… तंबाखूच जबरदस्त व्यसन, जरा बसलं की, तंबाखू मळायची, ती तोंडात धरायची आणि पिचकार्‍या मारत बोलायची सवय. बोलताना गळ्यात तुळशीची माळ हालायची… पण, अस्सल शिव्यांशिवाय बोलायचा नाही. डोक्यावरचे केस ‘गोदरेज पावडर’नं डाय केलेली, गुळगुळीत दाढी आणि जाड मिशीचा कट. धुतलेला पांढरा नेहरूशर्ट, वरची दोन बटणं रिकामी आणि पांढरी विजार… कायम ‘बिझी’ एकतर मोबाइलवर असणार नाहीतर, तंबाखू मळत दिसणार! बुडाखाली जुनी होंडा स्पेलंडर… पांडू तात्या आमच्या जुन्या वाड्यातला मेंबर, आमचा…

Read More

कामिनी व्यवहारे भारतात सर्वत्र सुरणाची भाजी केली जाते. सुरणाच्या औषधी गुणांमुळे ‘सर्वेषा कन्दशाकाना सुरण: श्रेष्ठ: उच्चते।’असे भावप्रकाशात म्हटले आहे. याचा अर्थ सर्व कंदवर्गीय भाज्यांमध्ये सुरण श्रेष्ठ आहे. त्याची ‘कन्दनायक’ अशी सुद्धा ओळख आहे. सुरणात अ, ब तसेच क ही जीवनसत्त्वे आहेत. त्याच्या कंदाची आणि पानांची भाजी तसेच काप-कटलेटस सुद्धा करतात. सुरणाचे फूल, कंद, पाने आणि दांडा या सर्वांचा आहारात वापर करतात. त्याच्या कंदात कॅल्शियम ऑक्झॅलेट असल्याने खाज येते. हा खाजरेपणा घालविण्यासाठी त्याचे तुकडे चिंच किंवा आमसुलाच्या पाण्यात भिजत ठेवतात किंवा उकडतात. पुरवठा संख्या – 4 ते 5 व्यक्तींसाठी साहित्य तयारीसाठी लागणारा वेळ – 20 मिनिटे शिजण्यासाठी लागणारा वेळ – 20 मिनिटे एकूण…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः । वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥36॥ एऱ्हवीं विरक्ति जयांसि नाहीं । जे अभ्यासीं न रिघती कहीं । तयां नाकळे हें आम्हीही । न मनूं कायी ॥421॥ परि यमनियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे । केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देउनी ॥422॥ या जालिया मानसा कहीं । युक्तीची कांबी लागली नाहीं । तरी निश्चल होईल काईं । कैसेनि सांगें ॥423॥ म्हणोनि मनाचा निग्रह होये ।…

Read More

दर्शन कुलकर्णी धनुर्मासारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस संमिश्र परिणाम घेऊन येईल. नवीन प्रतिस्पर्धी निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी घाई केल्यास गोष्टी बिघडू शकतात. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. दूर राहणारा कुटुंबातील एखादा सदस्य आज अचानक येऊन तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो. पालकांची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करा. वृषभ – दिवस सकारात्मक असेल. एकामागून एक चांगल्या बातम्या मिळतील. कुटुंबातील एखाद्याकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. आज संततीच्या करिअरबद्दल वाटणारी चिंता कमी होईल. प्रगतीतील अडथळे दूर होतील. एखाद्या पिकनिकची योजना आखू शकता. कार्यालयात काम करताना, मनात काही दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. मिथुन -…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. माझ्या आयुष्यात एक बाई आली, ‘मोठा मम्मी’! थोडंस वेगळं नाव. एका मराठी सिनेमाचं शूट करत होते… नगर जिल्ह्यातील एका खेडे गावात. एकंदरीत सगळ प्रकरण ‘धन्यवाद’ होतं. नावाजलेले दिग्दर्शक असूनही खूप वाईट पद्धतीने काम चाललेलं. बरं, प्रोड्युसरची वांग्याची शेती होती. त्याने हॉटेलवर पोतभर वांगी आणून ठेवली होती. सकाळ, संध्याकाळी फक्त वांग्याची भाजी! चला, मला वांगी आवडतातच. पण तिथला आचारी म्हणजे वांग्याचं ‘होळकं’ बनवायचा. ते तिखट जेवण मी अजिबात खाऊ शकत नव्हते… दुसर तिथे काहीच मिळत नव्हतं! तिथे मुंबईहून एक थोड्या वयस्कर बाई आल्या होत्या… उंच, धिप्पाड, गोऱ्यापान, सुंदर आणि हसतमुख. अर्थात, मी…

Read More