Author: Team Avaantar

मानसी देशपांडे “धन आत्मजा दुजाचे, ज्याचे तयास देणे…” प्रत्येक मुलीच्या वडिलांना ही ओळ ऐकताना डोळे पाणावत असतील. कन्यादानाचा क्षण म्हणजे वडिलांच्या डोळ्यासमोर मुलीचे बालपण आणणारा क्षण असतो. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी यावर एक विचार मांडला आहे, “पिता आणि पती, एक रेघ आणि वेलांटी इकडची तिकडे. तरीही वाटतं, पती होणाऱ्या पुरुषाला पिता होणे जमेल का? कन्यादान करताना प्रत्येक पिता हा मुका का होत असावा? कदाचित तो जावयाला सांगू शकत नसेल की बाबा रे, माझ्या मुलीचा तू पतीच आहेस पण तरीही संसारात तिचा पित्यासारखा सांभाळ करशील का?” किती हृदयस्पर्शी विचार आहे ना!! आपल्याकडे नवदाम्पत्याला लक्ष्मी-नारायणाचा जोडा म्हणतात, मुलगी ही तुमची…

Read More

दिप्ती चौधरी मांजरीविषयी अनेकांच्या मनात समज-गैरसमज, काही प्रश्न असतात. म्हणूनच त्यांच्याबाबत काहीतरी माहिती मिळावी यासाठी मी माझी कहाणी सांगतो. कारण बहुदा आम्ही दोघं सर्वात जास्त प्रवास केलेले माऊ असू. मुंबईहून बंगलोर आणि तिथून आता आम्ही अमेरिकेत आलो आहोत. केल्याने देशाटन…. या उक्तीप्रमाणे आम्ही आता हुशार वगैरे झालो आहोत आणि आमच्या आई, पप्पा आणि दिदी यांनाही हुशार करून सोडले आहे! तर मी आणि दनू मुंबईतल्या एका सोसायटीमध्ये राहत होतो. आमच्या पिढ्या न पिढ्या इथेच मिळेल ते शोधून जगत होत्या. कोणी कधी उरलंसुरलं फेकले तर, तोच आमचा उदरनिर्वाह होता. आमची आजी ही महा खट मांजर होती. तिने दुधाच्या पिशव्या फोडण्याचे कसब आत्मसात…

Read More

माधवी चिटणीस सकाळी लवकरच शुचिर्भूत होऊन देवदर्शनाला निघालो. जवळच एक ‘स्वयंभू’ दत्त मंदिर आहे, असं कळलं होतं. म्हणजे आमच्या रिसॉर्टच्या अगदी जवळच आहे, असं गूगलने कळवलं. मग आमच्या रिसॉर्टच्या अटेंडन्टने त्या मंदिराची महती सांगितली. त्यांनी जे वर्णन केले होते, त्यापेक्षा ती जमिनीखाली मिळालेली मूर्ती खूपच सुंदर होती. अतिशय रेखीव आणि सुबक! किती बारकावे टिपले होते मूर्तीकाराने!! या संदर्भातील ऐकीव कथा अगदी बाजूला ठेवल्या आणि पूर्णत: लॉजिकली विचार केला तरी अगदी अलिकडच्या काळात ही भरीव, छोटीशीच असूनही वजनाला जड असणारी अप्रतिम मूर्ती (सोन्याची की पितळेची, हे तो देवच जाणे) एका गावात जमिनीखाली केवळ 3.5 ते 4 फुटावर मिळावी, ही आश्चर्यजनक बाब…

Read More