Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
मंदार अनंत पाटील एकेदिवशी सोसायटीमध्ये खेळत असताना अचानक एक पोपट खाली बसलेला दिसला. पहिल्यांदा वाटले की, दाणे टिपायला खाली आला असावा; पण हळूच जवळ जाऊन बघितले तर तो जखमी असल्याचे लक्षात आले. त्याला अलगद उचलून घरी आणले. काही दिवस काळजी घेऊन तसेच ओषध-पाणी करून खडखडीत बरा केला. पहाडी जातीचा हिरवागार आणि लाल चोचीचा असा राजबिंडा नर पोपट होता. यथावकाश त्याचे नामकरण विठू असे झाले. एक दिवस आम्ही सर्व कामानिमित बाहेर गेलेलो असताना विठूने कधी उड्डाण केले ते कळलेच नाही… पाठी राहिला तो विठूचा रिकामा पिंजरा अन् अनेक आठवणी. असेच काही महिने लोटले आणि हळूहळू मी विठूच्या जाण्याचे दुःख विसरलो. एकदा…
जी. भालचंद्र ज्ञान आणि माहिती यांचा एकमेकांशी संबंध आहे. ज्ञान हे सर्वांसाठी खुले असते. ज्ञान आणि माहिती यातील संदर्भ वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि म्हणूनच काही पैलूंमध्ये त्यात समानता आहे. माहिती हा ज्ञानाचा एक प्रकार आहे. ज्ञान ही जरी माहिती नसली तरी, उपलब्ध माहितीच्या प्रमाणावर आधारित आहे. उपलब्ध माहितीमधून जे काही मिळवता येते, ते ज्ञान. तथ्ये, सिद्धांत आणि तत्वे ही शिक्षणाचा आधार असतात आणि त्यांची माहिती गोळा करण्याचे तसेच ती क्रमबद्ध करण्याचे कौशल्य आपल्याकडे आहे. माहिती ही अधिक तथ्यात्मक असली तरी ज्ञान हे विश्वास आणि बांधिलकी याच्याशी जास्त निगडीत आहे. ज्ञान हे कृतीबद्दल असते. ज्ञानाचा उपयोग शेवटपर्यंत होतो. माहिती, ज्ञान आणि डेटा…
मनोज गाण्यांचा विषय हा न संपणारा आहे. त्यातही हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ अन् त्यावेळचे रथीमहारथी गायक-गायिका… शब्दांची अतिशय उत्तम जाण असलेले गीतकार आणि प्रत्येक वाद्याचा यथायोग्य वापर करणारे संगीतकार यांची तर साथ होतीच. त्यामुळे ती गाणी श्रवणीय ठरली. भले व्हॉट्सअॅपवर त्यावेळचं अमुक गाणं, अमुक एका पाश्चात्य गाण्याची कॉपी आहे, असं जरी व्हायरल होत असलं, तरी ‘आवाज’ ही बाजू भक्कम आहे ना! लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, मोहम्मद रफी, हेमंत कुमार, मन्ना डे, गीता दत्त, सुरैया, तलत मेहमूद, शमशाद बेगम… शंकर जयकिशन, एस. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, नौशाद, सलील चौधरी, वसंत देसाई, सी. रामचंद्र, रोशन, आर. डी. बर्मन, कल्याणजी…
मानसी देशपांडे आज रविवार. म्हणजे आराम… आठवड्याची कामं करण्याचा दिवस. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी जशी वपुप्रेमी आहे ना, तशीच संगीतप्रेमी सुद्धा आहे बरं! काही जणं माझ्यासारखे असे देखील असतील की जे ठरवतात, आज सकाळी मस्तपैकी एखाद्या संगीतकाराची गाणी ऐकायची. मग जर ते संगीतकार ‘गुलजार साहेब’ असतील तर!! बहारच!! शायरींचा राजा म्हणजे गुलजार साहेब. ज्यांच्या गाण्यात प्रेम, विरह, आयुष्य या सर्वांवर एक नव्हे, अशा अनेक गाण्यांचा नजराणा आहे… जसं या वर व.पु. म्हणतात, “छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात…” तुम्हाला आयुष्यावर प्रेम करायचं असेल तर, गुलजार साहेबांची गाणी किंवा शायरी ऐकावी… व.पुं.नी एक हृदयस्पर्शी विचार मांडला आहे, “कापसाचे तळवे…
दिप्ती चौधरी मी (पिदू) आणि दनू मुंबईतल्या एका सोसायटीमध्ये राहत होतो. आमच्या बिल्डिंगमध्ये एक नवीन कुटुंब राहायला आले. त्यांच्या पाळलेल्या भुभू बरोबर त्यांनी माऊंनाही थोडे खायला द्यायला सुरुवत केली. तेव्हाच आमची दिदी पण तिच्या आजी आणि आजोबा म्हणजे बाबांकडे शाळेसाठी दोन वर्षं राहायला आली. दिदीबरोबर असलेल्या मैत्रीमुळे आजी आणि बाबाही आम्हाला खायला देत. बाबा आणि आजी आम्हाला खास मासे आणून द्यायचे. आतापर्यंत बेवारस असलेली सोसायटीतील मांजरांची जबाबदरी कोणीतरी घेतली… हे नजरेत आल्यावर अचानक इतकी वर्षं सोसायटीत सुखेनैव वास्तव्य करणाऱ्या मांजराचा त्रास सुरू झाला… सुरुवातीला हा विरोध इतका तीव्र नव्हता, थोडी धुसफूस, आडून आडून टोमणे वगैरे. तेव्हा सोसायटीत एकच भू भू…
नमस्कार, मी हर्षा गुप्ते अभिनेत्री आहे. मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तीन भाषांमधून काम करत आलेय. 41 वर्षं झाली या क्षेत्रात. बरंच काही घडलं… घडलं नाही… त्यापैकी काही सगळ्यांसोबत शेअर करावंस वाटतंय… 1984पासून नाटकात काम करायला सुरुवात केली. मराठी नाटकं म्हणजे दौरे आले. 10-15 दिवस सहज घराबाहेर राहायला लागायचं. मी आणि इतर बाकीच्या स्त्री कलाकारांना आलेला एक अनुभव… प्रवासात किंवा आऊट-डोअर शूटच्या वेळी स्वच्छ वॉशरूमची सोय नसणे! त्यावर पाणी कमी पिणे किंवा न पिणे हाच उपाय असायचा; जेणेकरून वॉशरूमला जायची गरज लागू नये. वयाने तरुण होते, त्यामुळे या सगळ्यात त्यावेळी शरीराने साथ दिली. पण आता तो सगळा प्रकार अंगाशी येऊ…
मोहिनी घारपुरे देशमुख दररोजची तीच सकाळ, तोच तो दिनक्रम आणि जगाच्या रहाटगाडग्यात अडकलेले आपण सगळेच पोटार्थी… पण असे असले तरीही हीच सकाळ काही जणांसाठी गेली सहा वर्षं अतिशय आनंदाची ठरतेय. याचं कारण आहे, WhatsAppच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला एक आगळावेगळा उपक्रम. मी सुरू केलेला ‘मोहिनी अंताक्षरी’ हा WhatsApp ग्रुप गेली सहा वर्ष सक्रिय आहे. स्वतःची गाण्याची आवड अस्वस्थ करत होती. गायनाच्या क्षेत्रात काही निराळं करावं या हेतूने ही कल्पना सुचली. सुरुवातीला काही ओळखीच्या गानप्रेमींना समुहात सहभागी केले आणि माझ्या या ग्रुपची ‘मोहिनी अंताक्षरी’ नावाने सुरुवात केली. आजवर अनेक सदस्य ग्रुपमध्ये आनंदाने सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सदस्याच्या परिचयातूनही काही सदस्यांना वेळोवेळी…
आराधना जोशी साधारणपणे 35 वर्षांपूर्वी म्हणजे 1991 साली मी दहावीची परीक्षा दिली. शाळा विलेपार्ले येथे होती आणि मला सेंटर आलं होतं दादरला (कारण त्यावेळी रहायला तिथे होतो). पप्पा पोहोचवायला तर, आई घ्यायला येणार, अशी व्यवस्था करण्यात आली. पहिल्या पेपरला जाण्याची तयारी केली, सगळ्या गोष्टी नीट घेतल्या की नाही, याची पालकांकडून चौकशी झाली आणि अचानक पप्पांनी सांगितलं की, बरोबर एकही पुस्तक किंवा गाइड घ्यायचं नाही. मी आधीच टेन्शनमध्ये होते, त्यात हे असं फर्मान काढल्यावर तर, माझं अवसानच गळालं. पण पप्पा त्यांच्या मतावर ठाम होते. त्याचं कारण सांगताना ते म्हणाले, एक संपूर्ण वर्ष तुला याचा अभ्यास करायला मिळालं. तो अभ्यास तू नीट…
मंदार अनंत पाटील तसे बघायला गेले तर, आमच्या घरात कोणालाच पाळीव प्राणी फारसे आवडत नसत. माझ्या मोठ्या भावाला तर कुत्रा अजिबात आवडत नाही. मीच एक प्राणी, पक्षीप्रेमी आहे. अगदी शाळेपासूनच मुक्या जीवांबद्दल एक वेगळीच आपुलकी होती. माझ्या प्राणीप्रेमातूनच वन-रुम किचनच्या छोटेखानी घरात पहिले दाखल झाले ते मासे… हनुमान रोडवर मराठे नावाचे एक गृहस्थ घरातूनच गोड्या पाण्यातले मासे विकत असत. त्यांच्याशी विचारविनमय करून आणि व्यवस्थित माहिती घेऊन एक फुटाचा टँक घरी आणला. नवशिका असल्यामुळे सुरुवातीला रंगेबिरंगी गप्पी जातीचे मासे आणले. मराठे काका माशांबरोबरच पक्ष्यांचीही विक्री करत होते. म्हणून हळूहळू माझा कल पक्षी पाळण्याकडे जाऊ लागला. पण घरात फारशी जागा नसल्याने मनाला…
मंदार अनंत पाटील माझे प्राणीप्रेम कधी सुरू झाले ते कळलेच नाही. तसे बघायला गेले तर, आमच्या घरात कोणालाच पाळीव प्राणी फारसे आवडत नसत. आईचा जन्म चौल, रेवदंडा इथला आणि तिथे घराबाहेर कुत्री-मांजरं, बैल होते; पण ते कधी घरात नाही आले. बैलांची देखभाल करायला चांगू नावाचा गडी होता. वडिलांचा जन्म दादरचा. त्यांची आई त्यांच्या लहानपणीच वारली होती. बाबांचे बालपण दादरमध्ये चाळीतच गेले. तिथे प्राणी पाळणे शक्यच नव्हते. माझ्या मोठ्या भावाला तर कुत्रा अजिबात आवडत नाही. मीच एक प्राणी, पक्षीप्रेमी होतो. अगदी शाळेपासूनच मुक्या जीवांबद्दल एक वेगळीच आपुलकी होती. येता-जाता कुठेही कुत्र्याचे पिल्लू दिसले तर माझी पावले आपोआप वळत आणि मग त्यांना…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 241
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 182
- मैत्रीण 16
- ललित 501
- वास्तू आणि वेध 354
- शैक्षणिक 72
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
