Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
परिणिता रिसबूड आजकाल मी आयुष्य आजकाल मी आयुष्य वाईंडप करायला घेतलंय खूप झाले जमा खर्च, खूप झाल्या रीतीभाती नको त्या गोष्टींनी जीवन वेढलंय आजकाल मी आयुष्य वाईंडप करायला घेतलंय एकदा मनसोक्त झोप काढायची आहे सकाळची न्याहारी दुपारी करायची आहे काहीही न करता दिवस घालवायचा आहे रुटीनच्या नावा खाली जीवन बांधलंय आजकाल मी… एकदा नुसते विनाकारण हिंडायचे आहे मैत्रिणीच्या घोळक्यात रमायचे आहे हातावरचे घड्याळ बाजूला ठेवायचे आहे काळवेळेचे चक्र जीवन पोखरत बसलंय आजकाल मी… पाहायचा राहिलाय निसर्गाचा सोहळा पानाची पानगळ आणि फुलांचा बहर आत दडलेले फुलपाखरु मोकळे सोडायचे आहे शोभेल का हे असे वागणे या विचारताच जीवन अडकलंय आजकाल मी… काय…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला देवा हें विविध कानीं ऐकिजे । परि अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारी पां ॥262॥ अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक । ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना ॥263॥ जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां काय थेकुलें । घडले आम्हा ॥264॥ यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः । धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन् मे क्षेमतरं भवेत् ॥46॥ आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 ऑगस्ट 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 25 श्रावण शके 1947; तिथि : अष्टमी 21:34; नक्षत्र : कृत्तिका 28:38 योग : वृद्धी 07:20, ध्रुव 28:27; करण : बालव 10:41 सूर्य : सिंह; चंद्र : मेष 11:43; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:05 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 अश्वत्थमारुती पूजन गोपाळकाला कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. आरोग्य सुधारण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. कामाचा…
लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण काही घरगुती उपाय पाहिले, आता या लेखात सुद्धा आपण अजून काही घरगुती उपाय पाहू. बदाम, खसखस, चंदन या साहित्यापासून बनवलेले mask हे पूर्वापार वापरले जातात. या mask चा उपयोग Whitening आणि Nourishing साठी जास्त होतो. बदाम हा तेल, दूध, पावडर, उगाळून या कुठल्याही प्रकारे Mask मध्ये वापरता येतो. बदाम, खसखस यांच्या वाटलेल्या मिश्रणात भरपूर तेल आणि प्रथिने असतात. तर, चंदनाचा लेप हा थंडाव्यासाठी वापरला जातो. या तिघांची पावडर समप्रमाणात घेऊन त्यात दूध / साय / मध / तूप हे घालून चेहऱ्याला लावावे. कोरडे झाले की, चेहरा धुवून टाकावा. चेहऱ्याची त्वचा तजेलदार होऊन मुलायम व्हायला मदत…
आराधना जोशी शिक्षक म्हणून ज्यावेळी आम्ही विद्यार्थ्यांमध्ये वावरत असतो, त्यावेळी कळत-नकळतपणे संवादाचे अनेक तुकडे आमच्या कानावर येतात. मित्र किंवा मैत्रिणीला साधी हाक मारतानाही सुरुवातीला ‘साल्या’ किंवा ‘साली’ आणि नंतर नाव उच्चारलं जातं. ‘ही शिवी नाहीच आहे मॅम,’ अशीही माझी समजून घालण्यात आली. ‘अशी हाक मारली तर अत्यंत जिव्हाळा दिसून येतो!’ या एकमतानं दिलेल्या उत्तरावरून विद्यार्थ्यांची मानसिकता कशी बदलत चालली आहे, याचा प्रत्यय येतो. त्याचप्रमाणे ‘च्या आयला’ ही शिवी नसून भावना व्यक्त करण्याचं माध्यम असल्याचंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही जितक्या सहजपणानं ‘आई गं’ किंवा ‘अरे बापरे’ म्हणता तेवढ्याच सहजपणे आम्ही ‘च्या आयला’ म्हणतो, असा युक्तीवाद विद्यार्थ्यांनी केला. याच पठडीतील एक घटना…
शैलेश विजया सोमनाथ महाजन बरेच दिवस असली आणि नकलीबद्दल एक विचार मनात येत होता, पण लेख स्वरूपात लिहिण्याचा योग आज श्री गणेशाच्या कृपेने आला. जेमतेम 10 ते 12 दिवसांनी गणेशोत्सव येईल आणि त्या दिवशी आपण घराघरात श्री गणेशाची मूर्ती आणून त्याची स्थापना करू. तर मुद्दा असा की, ही श्री गणेशाची मूर्ती कशी बनवतात? तुम्ही म्हणाल काय हा प्रश्न आहे! प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडू माती साच्यात घालून आणि नंतर रंगवून मूर्ती बनवतात. आम्ही जाता-येताना रस्त्यारस्तांवर असलेले श्री गणेश मूर्तीचे कारखाने बघतो की! होय, हे खरं आहे. पण कोणतीही मूर्ती बनवताना आधी शाडू किंवा चिकण मातीची मूर्ती हातांनी बनवतात आणि नंतर तिचा…
सायली कान्हेरे रात्री जेवायला काय करू? हा प्रश्न जागतिक आहे, असं मला वाटते. पटकन होणारा आणि टेस्टी लागणार पदार्थ पाहिजे असतो, पण गाडी खिचडीवर अडते. म्हणून आज टेस्टी आणि कमीत कमी साहित्यात झटपट होणारा चविष्ट पदार्थ सांगणार आहे… तो आहे कॉर्न पुलाव (Corn Pulao)! हा भाताचाच प्रकार आहे आणि घरच्यांना नक्कीच आवडेल… साहित्य बासमती तांदूळ – 1 वाटी कॉर्न – 1 वाटी कांदा – 1 मध्यम आकाराचा टोमॅटो – 1 मध्यम आकाराचा लसूण – 3 पाकळ्या आले – 1 इंच हिरव्या मिरच्या – 2 गरम मसाला – 2 टेबल स्पून हळद – 1/4 चमचा मीठ – चवीनुसार बटर – 2…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः । स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ॥41॥ एथ सारासार विचारावें । कवणें काय आचरावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ॥246॥ असता दीपु दवडिजे । मग अंधकारीं राहाटिजे । जे उजूचि का आडळिजे । जयापरी ॥247॥ तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळीं तो आद्य धर्मु जाय । मग आन कांही आहे । पापावांचुनि ॥248॥ जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रियें सैरा विचरती । म्हणवूनि व्यभिचार घडती…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 ऑगस्ट 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 24 श्रावण शके 1947; तिथि : सप्तमी 23:49; नक्षत्र : अश्विनी 07:35, भरणी 30:05; योग : गंड 10:16; करण : विष्टी 12:58 सूर्य : कर्क; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:06 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 जिवंतिका पूजन श्रीकृष्ण जयंती स्वातंत्र्य दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – एखादे काम करून घेण्यासाठी गोड बोलावे लागेल. सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल.आज एखादे मोठे काम साध्य करू…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! माझ्या एका मित्राने मला एक सामाजिक जागृतीचा इव्हेन्ट आहे, तिथे गेस्ट म्हणून येशील का? असं विचारलं. मी ‘हो’ म्हटलं. बोरिवलीला नॅशनल पार्कमध्ये मॅरेथॉन स्पर्धा होती… कशासाठी? आत्महत्यामुक्त समाजासाठी (Suicide Free society)! मागच्य लेखात मी एका मुलीच्या आत्महत्येबद्दल सांगितलं होतं. आता पुन्हा एक काय अनेक आत्महत्या माझ्यासमोर येऊन उभ्या ठाकल्या होत्या. एका मुलाने नैराश्यातून आत्महत्या केली… आठवड्याभरात त्याच्या गर्लफ्रेंडने पण आत्महत्या केली. जीव देणं म्हणजे काय गम्मत वाटते का? कधीही उठाव अन मरून जावं. 15-20 हे वय काय मरायचं असतं का? अपघाती मृत्यू, आजारी पडून आलेला मृत्यू चटकाच लावून जातो, मग हा…
