Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 सप्टेंबर 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 28 भाद्रपद शके 1947; तिथि : त्रयोदशी 23:36; नक्षत्र : आश्लेषा 07:05 योग : सिद्ध 20:40; करण : गरज 11:26 सूर्य : कन्या; चंद्र : कर्क 07:05; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:37 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 प्रदोष शिवरात्री त्रयोदशी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी अधिक सतर्क राहावे लागेल, छोट्या चुका टाळा. आर्थिक स्थिती स्थिर राहील, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे…
नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… असे म्हणतात की, यश मिळायला लागलं की त्याची नशा चढायला लागते… अधून-मधून मलाही झिंग येतेच. पण नशिबाने मीच स्वतःला समजावते की, ‘बाळ हर्षा, उडण्यासाठी मोठ आकाश जरी असलं तरी, चालण्यासाठी जमीनच लागते…’ आणि माझी मीच धरतीवर येते किंवा कोणीतरी मला माझी मस्ती उतरवणार भेटतच! काही वर्षांपूर्वी माझे क्राइम पेट्रोलचे काम जोरात चालू होत. कुठेही गेले तरी कौतुक व्हायला लागलेलं. देशाबाहेरील लोक सुद्धा आवर्जून कुठेही भेटले तरी, कौतुक करायचे. नाही म्हटलं तरी थोडी हवा जातेच ना डोक्यात! एके दिवशी गोरेगावमध्ये होते, रस्ताने चालताना एक राजस्थानी मुलगी समोर आली. 20-21 वर्षांची असेल… टिपिकल…
वेद बर्वे भारताच्या विविध प्रांतामध्ये साजरा केला जाणारा नवरात्रोत्सव म्हणजे भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम! नऊ दिवस भक्तगण देवीच्या नऊ रूपांची पूजा करून, तिच्या शक्तीचा सन्मान करतात. या काळात देशभरातील देवीच्या मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, आरती, गोंधळ, जागरण आणि मिरवणुकांच्या माध्यमातून भक्तिरस ओसंडून वाहात असतो. मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील परळाखेमुंडी गावात, देवीचे एक असे मंदिर आहे जे या सर्व परंपरांना छेद देते. सोबतच, या मंदिराशी जोडलेली अनेक रहस्ये आपल्याला अचंबित करतात. या मंदिराचे नाव आहे दांडूमारम्मा मंदिर आहे. स्थानिकांमध्ये ‘दांडू माई’ म्हणून इथली देवी प्रसिद्ध आहे. या मंदिराचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, हे मंदिर वर्षातून फक्त नवरात्रीच्या…
ॲड. कृष्णा पाटील असाच एक रविवार होता. सुट्टीच्या दिवशी कधी मिटींग असते. कधी गेट-टुगेदर असते. कधी व्याख्यान असते.. अशाच एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला गेलो होतो. कार्यक्रमाची वेळ दुपारी एकची होती. मी साडेबारा वाजता वेळेआधीच कार्यक्रम स्थळावर पोहोचलो. भक्क ऊन पडलं होतं. उन्हात कापडी रंगीत मंडप तळपत होता. स्टेजवर शुभ्र काचेचा पुरुषभर उंचीचा डायस ठेवला होता. स्टेजवरचा टेबल नक्षीदार कपड्याने सजवला होता. स्टेजच्या पुढे मंडपभर शुभ्र कापड लावलेल्या खुर्च्या सरळ रांगेत ठेवल्या होत्या. कार्यकर्त्यांची नियोजनासाठी धावपळ सुरू होती. स्टेजच्या पाठीमागे थोड्या अंतरावर ब्रिटिशकालीन भक्कम दगडी, पण रंगहीन झालेले रेस्ट हाऊस होते. बाहेर इतकी उष्णता पण रेस्ट हाऊस मात्र आतून थंडगार होते. कार्यक्रम…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान । जे चेष्टा ते गुणाधीन । आपैसी असे ॥53॥ देखें विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें । तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥54॥ सांगे श्रवणीं ऐकावें ठेलें । की नेत्रींचें तेज गेलें । हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे ॥55॥ ना तरी प्राणापानगति । कीं निर्विकल्प जाहली मति । की क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥56॥ हे स्वप्नावबोधु ठेले ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 सप्टेंबर 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 27 भाद्रपद शके 1947; तिथि : द्वादशी 23:24; नक्षत्र : पुष्य 06:31 योग : शिव 21:36; करण : कौलव 11:28 सूर्य : कन्या; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:38 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 द्वादशी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस शुभ राहील. कामातील अडथळे दूर होतील, नवीन योजना यशस्वीरित्या अंमलात आणल्या जातील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. बोलण्यावर आणि रागावर…
प्रदीप केळुस्कर भाग – 2 केशवरावांच्या मृत्यूपत्रावरून मोहन संतप्त झाल्यावर आईने पाच वर्षांपूर्वीची घटना सांगायला सुरुवात केली… केशवराव सतत विवंचनेत असत. आपल्या दोन नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्यामागे कसे होईल, याची त्यांना काळजी वाटे. या दोन मुलातील मोठा मोहन अभ्यासात हुशार. पहिल्यापासून एक-दोन नंबराने पास होत गेला. त्याचे कौतुक वाटे. आपल्या या परिस्थितीत पाचवीपासूनच त्याला कणकवलीतील एस.एम. हायस्कूलमध्ये घातले. त्याच्या वर्गात कणकवलीतील डॉक्टर्स, प्रोफेसर्सची मुले होती. सातवी स्कॉलरशीपमध्ये तो जिल्ह्यात पाचवा आला. त्याचे फोटो सर्व पेपरमध्ये छापून आले. त्याच्या शिक्षकांनी पण त्याच्या अभ्यासात लक्ष घातले. दहावीत तो जिल्ह्यात तिसरा आला. त्याची आवड म्हणून तो कॉमर्सकडे गेला. बारावीत पुन्हा चांगले मार्क्स…
सुनील शिरवाडकर ‘बम बम… बम बम…’ असं पुटपुटत ओम या कुशीवरून त्या कुशीवर झाला. त्याच्या आईनं त्यांचं पांघरूण सारखं केलं. झोपेतही ओमचं ‘बम बम भोले…’ सुरूच होतं. आईनं त्याला हलवून जागं केलं… “कसलं स्वप्न पडतंय तुला ओम?” ओम जागा झाला… थोडा वेळ त्याला काही समजलंच नाही. मग हळूहळू तो स्वप्न आठवू लागला… आपण कुठल्या तरी जत्रेत शंकराच्या वेषात फिरत आहोत… पण पुढचं काही आठवेना! असं वारंवार होऊ लागलं. यावर उपाय काय करावा, हे त्यांना समजेना. बरं ते काही वाईट स्वप्न नव्हतं. त्याच्यामुळे ओमला काही त्रासही होत नव्हता. पण हे स्वप्न काही सुचवत तर नसेल ना? …तेवढ्यात होळी जवळ आली. मग…
कामिनी व्यवहारे साहित्य बारीक रवा – 1 वाटी दूध – अर्धी वाटी दही – पाव वाटी साजूक तूप – पाव वाटी साखर – पाव वाटी मध – 2 टेबलस्पून बेकिंग पावडर – अर्धा टी-स्पून केशराच्या काड्या – 6-7 तयारीसाठी लागणारा वेळ : 20 मिनिटे मिश्रण करून ठेवण्यास लागणारा वेळ : 3 ते 4 तास एकूण केक तयार होण्यास लागणारी वेळ : 5 तास पुरवठा संख्या : 3 ते 4 माणसांसाठी हेही वाचा – Recipe : ग्रीन पीज चीज पॅटीस कृती दूध, दही, साजूक तूप, साखर आणि मध एकत्रित करून नीट ढवळून घ्या. छान रंग यावा म्हणून त्यात थोडं केशर घाला. हे…
अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखात आपण उभे राहून केलेले सूर्यनमस्कार बघितले होते… आता आपण बसून सूर्यनमस्कार कसे करायचे ते बघूया. सूर्यनमस्कार साधारणपणे उभे राहूनच केले जातात. पण काही लोकांना, जसे की वृद्ध व्यक्ती किंवा गुडघेदुखी, पाठदुखी अथवा तत्सम कुठल्या आजार असेल तर ते उभे राहून सूर्यनमस्कार शक्य होत नाही. म्हणून अशा व्यक्तींना खुर्चीत बसून सूर्यनमस्कार करता येते. प्रथम स्थिर खुर्ची घ्यावी. त्यावर बसल्यावर पाय सरळ रेषेत जमिनीवर टेकलेले असावेत आणि गुडघे 90 अंशाच्या कोनात असावे. दोन्ही हात छातीपुढे नमस्कार मुद्रेत ठेवावेत. डोळे मिटून श्वास आत घ्या आणि हळूहळू सोडा. श्वास घेत जोडलेले हात वर करा. खांदे कानापासून दूर ठेवा. थोडे…
