Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
सायली कान्हेरे सकाळच्या नाश्त्यासाठी कांदेपोहे, उपमा, साबुदाण्याची खिचडी असे पदार्थ बहुतांश ठिकाणी केले जातात. त्यातही, पोह्यांना विशेष पसंती असते. पोहे देखील अनेक पद्धतीने केले जातात. कोळाचे पोहे हा कोकणातला एक पारंपरिक पदार्थ आहे. कोकण म्हटल्यावर नारळ मुबलक प्रमाणात… त्यामुळे हे पोहे करताना नारळाच्या दुधाचा वापर केला जातो. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. अनेक घरांमध्ये सणासुदीला कांदा, लसूण खात नाहीत. त्यामुळे या काळात हा पदार्थ घरात नाश्त्यासाठी करता येऊ शकतो. हा पदार्थ जरा हटके आहे आणि खूप चविष्ट लागतो. आंबट, गोड, तिखट चवीचे कोळाचे पोहे नक्की करून बघा. साहित्य जाडे पोहे – 3 वाट्या नारळ – 1 हिरव्या मिरच्या – 2 सुक्या…
चंद्रकांत पाटील आज भाऊंचा सत्कार समारंभ होता. सकाळपासून भाऊंच्या बंगल्यावर माणसांची वर्दळ वाढली होती… पै-पाव्हणे, मित्रमंडळी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार सर्व जण जमले होते… भाऊंना आज 80 वर्षं पूर्ण होऊन 81वे वर्षे लागले होते. शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता… हारतुर्याचे ढीग लागले होते. भाऊ निवांत स्थितप्रज्ञासारखे आराम-खुर्चीत बसले होते, फार काही बोलत नव्हते, सर्वजण भाऊंना तब्येतीचे रहस्य काय? कोणता आहार घेता? काय व्यायाम करता? असले प्रश्न विचारत होते, तरीपण भाऊ शांतच होते. पण प्रश्न थांबत नव्हते. शेवटी लोक ऐकतच नाहीत म्हटल्यावर भाऊ म्हणाले, “मित्रहो, जरा धीर धरा… तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी माझ्या भाषणात देईन” भाऊंनी गावात बऱ्यापैकी समाजकार्य केलेले, गावासह आसपासच्या…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनि अवकळा करिती । न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ॥218॥ मग ते वेळी हियें फुटावें । आतां लाठेपणें कां न झुंजावें । हें जिंतलें तरी भोगावें । पृथ्वीतल ॥219॥ हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् । तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥37॥ ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित । तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥220॥ म्हणोनि ये गोठी । विचारु…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 02 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 11 भाद्रपद शके 1947; तिथि : दशमी 27:52; नक्षत्र : मूळ 21:50 योग : प्रीति 16:38; करण : तैतिल 15:22 सूर्य : सिंह; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:52 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 ज्येष्ठा गौरी विसर्जन (रात्री 09:50 वाजेपर्यंत) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस सामान्य असेल. आत्मविश्वासाचा अभाव राहील, त्यामुळे मन अस्वस्थ असू शकते. आर्थिक परिस्थिती बेताची असेल, त्यामुळे पैसे…
प्रदीप केळूसकर भाग – 2 स्मिताताईंचा फोन आला म्हणून अंजली त्यांच्या घरी चालली होती. आज रविवार, तसा तिच्या सुट्टीचा दिवस. तिचा नवरा मॅच बघायला स्टेडियममध्ये गेला होता… त्यामुळे रात्रीच उगवणार, हे तिला माहीत होतं. त्यांनी ‘उदयाचं ये’ असं फोनवर सांगितलं, म्हणून तिला काळजी वाटली. स्मिताताईंचा नवरा पाच वर्षांपूर्वी देवाघरी गेला आणि मुलगा अनिरुद्ध, त्याची पत्नी कॅनडात! अनिरुद्ध पाच दिवसांनी पोहोचला… तोपर्यंत स्मिताताईंना तिनेच सांभाळलं होत. त्यांच्या गावाकडील चुलत भावाला बोलावून पुढील विधी केले. अनिरुद्ध आणि रश्मी त्याचवेळी तिच्या ओळखीचे झाले. दोघेही स्वभावाने छान. त्यामुळे त्या तिघांची मैत्री झाली पटकन! स्मिताताईंच्या यजमानानंतरची कामे, बँकेचे व्यवहार वगैरे… करण्यासाठी तिने अनिरुद्धला मदत केलेली.…
रश्मी परांजपे भाग – 4 मागील तीन लेखांमध्ये आपण शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, याविषयी बरेच निवडक मुद्दे अभ्यासले. या लेखात आपण या विषयावरील उर्वरित मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत. शालेय वार्षिक सहल आणि स्नेहसंमेलन अशा दोन महत्त्वाच्या मुद्द्यांसंबंधी पालकांच्या जबाबदारीविषयी आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. शालेय वार्षिक सहल आणि मुलांचा सहभाग शाळा दरवर्षी मुलांसाठी सहल आयोजित करत असते. सहलीचे ठिकाण आपण पाहिलंय, तेव्हा मुलाने तिथं जायची गरज नाही, असा विचार पालकांनी कधीच करू नये. तसेच, मुलं लहान आहेत म्हणून अजिबात काळजी करू नये, कारण सर्वच मुलं समवयस्क असतात, शिवाय शाळेच्या ताई आणि मावशी सहलीमधे सर्व मुलांची व्यवस्थित काळजी घेत असतात.…
मनीषा गोगटे पातोळ्या हे कोकण आणि गोवा परिसरातील पक्वान्न आहे. हळदीच्या पानावर केल्या जाणाऱ्या पातोळ्या कोकणामध्ये प्रामुख्याने गणेशोत्सव काळात केल्या जातात. तसे पाहिले तर, नागपंचमी, गणेशोत्सव, दसरा अशा विविध सणांच्या औचित्याने हा गोड पदार्थ केला जातो. म्हणजेच, जेव्हा हळदीची पाने उपलब्ध असतात, तेव्हा हा पदार्थ हौसेने केला जातो. साहित्य हळदीची पाने – 5 ते 6 गावठी हिरव्या काकडीचा किस – दोन वाट्या गूळ – पाऊण पट तांदळाचे पीठ (सुगंधी) – काकडीच्या रसात मावेल तसे ओले खोबरे – पाव वाटी हळद – लहान चमचा मीठ – चवीनुसार हेही वाचा – Recipe : गौरीचा नैवेद्य… घावन घाटलं कृती हळदीची पाने धुऊन घ्यावीत. काकडीच्या…
पराग गोडबोले ती रोजच बाहेर पडायची, ठरलेल्या वेळी संध्याकाळी… बागेत गवतावर चालायची… हुंदडणारी, बागडणारी, झोपाळ्यांवर झुलणारी मुलं आणि झाडांवर डुलणारी फुलं बघत बसायची तल्लीन होऊन… बराच वेळ रमून जायची त्या वातावरणात… स्वतःला आणि स्वतःच्या आयुष्यातल्या वेदनांना विसरून… जवळच्याच एका सोसायटीत राहायची. राहायची म्हणजे, आजारी असलेल्या एका काकूंना सोबत करायची, त्यांची शुश्रूषा करायची, त्यांचं हवं नको बघायची. खाणंपिणं, पथ्यपाणी, औषधांच्या वेळा… सगळं सांभाळायची ती, अगदी लेकीच्या मायेने! चोवीस तासांची सेवा. गेले सहा महीने ती काकूंच्या सेवेत होती. वास्तविक ना नात्याची, ना गोत्याची, पण त्या पलीकडच्या निस्वार्थ नात्याचा गोफ विणला गेला होता दोघींच्यात, नकळतच. एकट्या राहणाऱ्या काकूंची ती लेक, नात सगळं काही…
माधवी जोशी माहुलकर भाद्रपदेचा महिना आला… आम्हा मुलींना आनंद झाला… पार्वती म्हणे शंकराला, चला हो माझ्या माहेरला, माहेरी गेल्यावर पाट बसायला, फुगड्या खेळू, गाणी गाऊ प्रसाद घेऊन घरी जाऊ… व्रत वैकल्याचा सोवळा श्रावण संपला की, भाद्रपद महिना लागतो. हा महिना सुरु झाला की, आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना वेध लागतात ते गौरी-गणपतीचे. हरतालिका झाली की, दुसऱ्या दिवशी येणाऱ्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होते. त्याला आवडणारे विविध प्रकारचे मोदक, लाडू, करंज्या अशा विविध प्रसादांची दहा दिवस रेलचेल असते. त्या प्रसन्न आणि उल्हासित अशा वातावरणात षोडशोपचारे पूजा करून मंत्रोच्चाराच्या खणखणीत स्वरात ‘मंगलमूर्ती’ची प्राणप्रतिष्ठा केली जाते. हा सर्वांचा लाडका ‘बाप्पा’ दीड दिवसांपासून दहा दिवसांच्या मुक्कामाने…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा जैसी भ्रतारेंहीन वनिता । उपहती पावे सर्वथा । तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥199॥ ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरीं गिधीं विदारिजे । तैसे स्वधर्महीन अभिभविजे । महादोषीं ॥200॥ अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् । संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥34॥ म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । आणि अपेश तें न वचेल । कल्पांतवरी ॥201॥ जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे । आणि सांग पां केवी…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 361
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 510
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
