Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    April 20, 2026

    आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    April 19, 2026

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    रश्मी परांजपेBy रश्मी परांजपेMarch 16, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, शालेय शिक्षण, विज्ञान विषय, विज्ञानाचा अभ्यास, बालगटातील शिक्षण, बालगटातील विज्ञान शिक्षण, बालगट विज्ञान विषय, सीनिअर केजी विज्ञान, विज्ञान अभ्यास,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील विज्ञान शिक्षण याविषयी माहिती घेऊयात.

    बालगटातील मुलांकडून सुरुवातीला शिशुगटातील विज्ञान अभ्यासाची उजळणी करून घ्यावी. बालगटातील विज्ञान शिक्षण पुढील मुद्द्यांच्या आधारे करण्यात येते :

    1. रूंद जीना
    2. मिश्र रंग
    3. खरखरीत – गुळगुळीत
    4. झाडाचा परिचय
    5. प्राण्याचा परिचय
    6. पंचेंद्रियांतून शिक्षण

    आता आपण वरील मुद्दे लक्षात घेऊन बालगटात विज्ञान शिक्षण कसे दिले जाते याबाबत जाणून घेऊ.

    रूंद जीना – खेळातून शिक्षण

    गुलाबी मनोरा आणि लांब जीना या शैक्षणिक साहित्याचा परिचय दृढ झाल्यावर रूंद जीना लावायला शिकवतात.

    समान लांबीचे पण 1 ते 10 सें.मी. रूंद असे 10 लाकडी ठोकळे घेतले जातात. नंतर 1, 2, 3  ते 10 सें.मी. अशा रुंदीचे ठोकळे जोडून लावायला शिकवतात. यातूनच रूंद जीना तयार होतो. मुलांकडून लांब आणि रूंद जीना लावून घेताना त्यांना लांबी आणि रुंदी या संकल्पना समजावून सांगितल्या जातात.

    मिश्र रंग परिचय

    लाल, निळा, पिवळा हे मूळ रंग शिकवल्यानंतर दोन रंगांच्या मिश्रणातून तयार होणारे पुढील मिश्र रंग शिकवले जातात.

    • लाल + निळा = जांभळा
    • लाल + पिवळा = केशरी
    • निळा + पिवळा = हिरवा

    यासाठी जिलेटीन पेपर, रंगीत पाणी याचा उपयोग करुन प्रात्यक्षिके घेण्यात येतात.

    स्पर्श परिचय

    मुलांना खरखरीत आणि गुळगुळीत असे स्पर्शज्ञान झाल्यावर गुळगुळीत, कमी खरखरीत, जास्त खरखरीत असा अनुभव विविध वस्तूंच्या स्पर्शातून दिला जातो.

    झाडाचा परिचय

    झाडाचे सर्व अवयव म्हणजे मूळ, खोड, फांदी, पान, कळी, फूल अथवा फळ यांचा परिचय चित्रांच्या माध्यमातून करून देण्यात येतो.

    पावसाळ्यात बिया अथवा छोटी रोपे लावून झाडाचे अवयव प्रत्यक्ष दाखवता येतात. जास्वंदीची कळी आणि नंतर कळीचे फूल दाखवता येते. तसेच परिसरातील अथवा बागेतील झाडांवरील फळे प्रत्यक्ष दाखवता येतात.

    प्राण्याचा परिचय

    प्राणी आणि पक्षी यांची मोठी चित्रे असलेले तक्ते घेऊन त्यांची नावे तसेच त्यांचे पंख, चोच यासारखे विशिष्ट अवयव मुलांना दाखवता येतात. तसेच मुलांची प्राणीसंग्रहालयाची सहल आयोजित करून प्रत्यक्ष प्राणी आणि पक्षी दाखवले जातात. मात्र अशा सहलीबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक असते.

    पंचेद्रियांतून शिक्षण

    • नाक – मुलांना नाकाने वास घेऊन वेगवेगळे वास घेण्याचा अनुभव देता येतो. उदाहरणार्थ डब्यातील भाजीचा वास, चहा / कॉफीचा वास, सुंठीचा वास इत्यादी.
    • डोळे – मुलांना परिसरातील गोष्टी बघायला लावून काय-काय बघितले, हे विचारून स्मरणशक्तीचा खेळ घेता येतो.
    • कान – मुलांना कानाने लहान-मोठा, जवळचा-लांबचा आवाज यातील फरक अनुभवण्यास सांगावे.
    • जीभ – मागील लेखात सांगितल्यानुसार मुलांना विविध पदार्थ आणि त्यांच्या चवी अनुभवायला द्यावे. तसेच बालगटातील विज्ञान शिक्षणात आवळ्याची तुरट चव याचा आवर्जून समावेश करावा. अशाने मुलांना आहारातील षडरसांचा परिचय होईल.
    • त्वचा – पिशवीत एकेका वस्तूच्या दोन अशा जोड्या ठेवून मुलांना पिशवीत हात घालून वस्तू सांगाव्यात आणि त्याप्रमाणे बोटांच्या स्पर्शाने वस्तू ओळखून जोड्या बाहेर काढण्यास शिकवावे. उदाहरणार्थ खडू, पेन्सिल, खोडरबर, लहान चेंडू, लहान ठोकळे, लहान पट्टया इत्यादी.

    अशा विविध पद्धतींतून मुलांचे पंचेद्रिय शिक्षण दृढ होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास, बालगटातील विज्ञान शिक्षण मुलांच्या प्राथमिक शाळेतील विज्ञान शिक्षणाचा पाया मजबूत करते.

    पुढील लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील जीवन व्यवहार शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत.

    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9881943593 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


    Avatar photo
    रश्मी परांजपे

    रश्मी परांजपे वय 66 वर्षे. पुणे. शिक्षण - बी. कॉम्. पूर्व प्राथमिक (Pre-Primary) शाळेत 32 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत राहून निवृत्त. रेणुका स्वरुप संचलित सरकारमान्य पूर्व-प्राथमिक प्रशिक्षण परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. टेल्को समाज विकास केंद्र आणि मोरया शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2016मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2005पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. निवृत्तीनंतर यजमानांच्या योग प्रचार आणि प्रसार कार्यात तसेच निरामय आरोग्य संकल्पना राबविण्यात सक्रिय सहभाग. मोबाइल - 9881943593

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    April 6, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 30, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    By रश्मी परांजपेApril 14, 2026

    मागील लेखात आपण बालगटातील जीवन व्यवहार शिक्षण याबाबत माहिती घेतली. या लेखात आपण बालशाळेतील खेळ…

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    April 6, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 30, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    April 20, 2026

    आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    April 19, 2026

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 272
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 391
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 197
    • मैत्रीण 18
    • ललित 563
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    April 20, 2026

    आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    April 19, 2026

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    April 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.