Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…

    April 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » निर्णय… योग्य की अयोग्य?
    ललित

    निर्णय… योग्य की अयोग्य?

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 17, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, जीवनक्रम, जीवनशैली, धकाधकीचे जीवन, स्वेच्छानिवृत्तीचा आनंद, आयुष्याचे गमक, आयुष्याचा निर्णय,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पराग गोडबोले

    साडेपाचचा गजर झाला आणि रोजच्या प्रमाणे तो दहा मिनिटं snooze करून मी पांघरूण ओढून घेतलं. पाच चाळीसला परत एकदा फोनची केकावली ऐकली आणि आळोखेपिळोखे देत उठले कशीबशी अंथरुणातून… नवरा गाढ झोपेत होता. मनात म्हटलं, ‘किती नशीबवान प्राणी आहे यार! छान सात वाजता उठेल आणि स्वतःचं आवरून, डबा घेऊन पळेल ऑफिसला. इकडची काडी तिकडे नको करायला.’ पूर्वी कौतुक वाटायचं त्याच्या या वागण्याचं, पण हल्ली संताप येतो आणि तिळपापड होतो माझा नुसता… चरफड होते, पण काय करणार? मीच सोकावून ठेवलंय सगळ्यांना…

    तोंडावर पाण्याचे हबके मारले आणि आणि केसाचा बुचडा बांधला पटकन… हात चटचट चालवायला हवे होते. वेळेत निघाले तरच महिला विशेष गाडी मिळते, थोडं टेकायला मिळतं बूड चौथ्या सीटवर तरी!

    प्रातर्विधी उरकले पटापट, भसाभसा दात घासले यंत्रवत… आधण ठेवलं चहासाठी आणि कणकेचा डबा उघडला. सकाळी उठून कणिक भिजवायची म्हणजे चिडचिड नुसती! एकीकडे, कालच घरी येताना आणलेली, निवडलेली, फरसबी धुवून घेतली.

    चहा घेऊन जरा बरं वाटलं. तात्पुरता दिलासा, थकलेल्या शरीराला आणि मनाला! उसासा टाकून उठले, घड्याळाचा काटा आज जरा जास्तच वेगात फिरतोय, असा भास झाला मला. भाजी फोडणीस टाकली आणि पीठ भिजवायला सुरुवात केली एकीकडे… मनात आजच्या ऑडिटची उजळणी सुरू होती. खडूस ऑडिटर येणार होता, त्याची सरबराई करायची होती. वेळेत पोहोचायलाच हवं होतं आज.

    तवा तापत टाकला आणि लेकाला हाका मारायला सुरुवात केली… रात्रीचा दिवस करणारा हा भिडू, सकाळी उठायला जीव काढत असे माझा. पन्नास हाका झाल्यावर जरा कुठे हालचाल दिसू लागायची त्याची. कधीतरी तर वाटायचं, लोटी भरून गार पाणी ओतावं डोसक्यावर त्याच्या, म्हणजे तरी लवकर उठेल बाब्या! तो वेळेत कॉलेजला पोहोचावा म्हणून माझाच कोण आटापिटा… दोन हात, दोन पाय आणि एक डोकं यांच्या बळावर किती लढाया लढायच्या?

    हेही वाचा – सुख म्हणजे नक्की काय असतं?

    पोळ्या झाल्या, भाजी झाली आणि आबा आले चहा मागायला तेवढ्यात. चहा गरम करून दिला त्यांना आणि आंघोळीला पळाले… गरम पाण्याच्या धारा अंगावरून ओघळल्यावर अगदी बरं वाटत गेलं. जास्त रेंगाळण्याइतका वेळ नव्हताच. ती चैन फक्त रविवारी… कपडे बदलून डबे भरले तिघांचे, माझा उचलून पर्समध्ये कोंबला आणि नवी लढाई लढण्यासाठी घराबाहेर पडले…

    आता बस नाहीतर रिक्षा, मग स्टेशन आणि तिथे गाडीत लोटून द्यायचं होतं स्वतःला! गेली पंचवीस वर्षे अव्याहत सुरू होती ही लढाई, पण गरजेची होती संसाराला हातभार लावायला… मुलाचं शिक्षण, सासुबाईंचं आजारपण, घराचे हप्ते सगळं या नोकरीच्या टेकूमुळे निभावलं. दोघांच्या नोकरीमुळे परिस्थिति बदलली आमची, पण मन आणि शरीर मात्र होरपळून गेलं.

    आता विसाव्याची… थोडं स्वतःकडे बघायची… स्वतःला वेळ द्यायची निकड वाटायला लागली होती. रोज विचार यायचे मनात आणि एकदा कामात बुडाले की, ते विचारही रसातळाला जायचे आपोआप! परत दुसऱ्या दिवशी उचंबळून येण्यासाठी.

    गेले काही महिने हे अव्याहत सुरू होतं चक्र… थांबायला हवं असं वाटत होतं आता, पण धीर होत नव्हता. नवऱ्याला काय, ना सोयर ना सुतक! तो त्याच्या जगात रममाण. निर्णय मलाच घ्यायला हवा होता. एक मैत्रीण आहे माझी शाळेपासूनची… ती समुपदेशन करते बरीच वर्षं. तिला फोन केला आणि मनाची व्यथा व्यक्त केली तिच्यासमोर! ये म्हणाली भेटायला जमेल तेव्हा, पण लवकरात लवकर!!

    दुसऱ्याच दिवशी जरा लवकर निघून पोहोचले तिच्याकडे. आधीच फोन झाला होता, त्यामुळे वाट न बघायला लागता लगोलग पाचारण करण्यात आलं मला. जरा स्थिरस्थावर झाल्यावर, इकडची तिकडची चौकशी झाल्यावर तिने हळूहळू गाडी मुख्य विषयाकडे वळवली आणि मी भडाभडा बोलायला लागले… सगळंच सांगितलं तिला, आडपडदा न ठेवता… नवऱ्याशी असलेल्या आणि नसलेल्या शारीरिक संबंधांबद्दल पण व्यक्त झाले मी!

    खूप बरं वाटलं. मोकळं अगदी! योग्य तिथे प्रश्न विचारत, ती पार मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचली माझ्या. मला म्हणाली, “बऱ्याच नोकरी करणाऱ्या स्त्रियांना येतो हा अनुभव. आम्ही ‘Burnout Syndrome’ म्हणतो त्याला! बरेच पुरुष पण जातात, या आवर्तनामधून. आजच्या युगाची ही भेट आहे आपल्याला!”

    “तुला आर्थिक गरज नसेल, जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या असतील… काम आणि घर सांभाळताना कुतरओढ होत असेल, तर स्वेच्छानिवृत्ती घेऊन मनासारखी जगू शकतेस तू! त्यात अपराधी वाटण्याचं काही एक कारण नाही. पेन्शन मिळेलच की तुला, का एवढी काळजी करतेयस?”

    अगदी माझ्या मनातलं बोलली ती… शिक्कामोर्तब जणू माझ्या निर्णयावर!

    आर्थिक नुकसान किती होईल यापेक्षा, स्वतःला आणि कुटुंबाला वेळ देता येईल, मनासारखं जगता येईल, हिंडता फिरता येईल… ही फार मोठी जमेची बाजू वाटली मला. निर्णय पक्का झाला माझा आणि घरी जाऊन नवऱ्याकडे आणि आबांकडे सुतोवाच केलं. आबांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. नवरा पण, हो नाही करत एकदाचा तयार झाला. अर्थात, मी परवानगी नव्हती विचारली त्याला, पण सांगण्याचं कर्तव्य होतं माझं, ते पार पाडलं मी!

    जवळपास आठ वर्षं आधी मी निवृत्तीचा निर्णय घेतला होता. कसं असेल ते आयुष्य, याचा विचार करतच, बऱ्याच उशिरा मला झोप लागली.

    हेही वाचा – दूरदर्शन… कृष्ण-धवल आठवणींना उजाळा!

    आज निवृत्त होऊन सहा महीने झालेत, काय गमावलं आणि काय कमावलं याचा ताळेबंद मांडताना, कमाईचं पारडं अंमळ जास्तच झुकलेलं भासतंय मला! घर जरा जास्तच हसरं वाटू लागलंय, विकत घेऊन कपाटाचे धन झालेल्या पुस्तकांना न्याय मिळतोय, डोळ्याखालची काळी वर्तुळं जराशी फिकट झाल्यासारखी वाटतायत आणि हलकंहलकं वाटतंय खूप… थोडंसं लिहायला लागले आहे. अनुभवांच्या पोतडीतून बाहेर पडणारे शब्द, समाजमाध्यमावरील मित्र-मैत्रिणींना आपलेसे वाटायला लागले आहे. अडगळीत पडलेली पेटी आलीये दुरुस्त होऊन आणि स्वर उमटू लागलेत तिच्यातून… मुग्ध करणारे… जणूकाही नवी दृष्टी, नवी दिशा लाभलीये जगण्याला!

    घराजवळ असणाऱ्या एका वृद्धाश्रमाशी जोडून घेतलंय मी स्वतःला. तिथल्या आजी, आजोबांना पेपर, पुस्तकं वाचून दाखवणं, त्यांना हवं नको बघणं, त्यांच्याशी हितगुज करणं, यात वेळ सत्कारणी लागतोय माझा. सुरवंटाचं फुलपाखरूच झालंय जणू…

    परवाच ऑफिसमधल्या एका मैत्रिणाचा फोन आला होता, पश्चात्ताप झालाय का विचारत होती नोकरी सोडल्याचा अन् मी हसले खुदकन्, मला नकळत!

    तिला म्हणाले, “पंचवीस वर्षं जे नव्हतं जमलं, ते मनसोक्त उपभोगतेय मी.”

    तिचं म्हणणं पडलं, ‘उगाच सोडलीस नोकरी तू. या संघर्षात जी मजा आहे, काहीतरी मिळवण्याची जी ईर्षा आहे ती गमावलीस. आर्थिक स्वातंत्र्य गमावलंस आणि नको त्या निरर्थक गोष्टीत गुंतून पडलीस उगाचच.’

    विचारात पाडलं तिने मला पण, खरंच मला नाही वाटलं तसं कधी! तुम्हाला काय वाटतंय, चुकले मी, की योग्य केलं?

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026 ललित

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026 ललित

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पाऊस असा रुणझुणता…

    By स्नेहा सुतारApril 18, 2026

    भाग – 10 अचानक आकाशात वीज काडाडली आणि जुईली भानावर आली. घाबरलीच ती… थरथरली… पाऊस…

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…

    April 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 271
    • अवांतर 182
    • आरोग्य 102
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 388
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 561
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…

    April 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026
    Most Popular

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.