Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    April 22, 2026

    प्रतीक्षेचा उत्सव साजरा करणारं ‘सिमसिम’!

    April 22, 2026

    Recipe : टेस्टी तोंडलीभात अर्थात मसालेभात

    April 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Homeopathy : थायरॉईड, शरीराचं गतिमान इंजिन 
    आरोग्य

    Homeopathy : थायरॉईड, शरीराचं गतिमान इंजिन 

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 1, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, Homeopathy, होमिओपॅथी, थायरॉईड, थायरॉईड ग्रंथी, हार्मोन्स, मेटाबॉलिझम कंट्रोल सेंटर, हायपोथायरॉईड, हायपरथायरॉईड,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. सारिका जोगळेकर

    होमिओपॅथिक तज्ज्ञ

    आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला कार्यक्षम ठेवण्यासाठी थायरॉईड ग्रंथीची मुख्य भूमिका असते. थायरॉईड – आपल्या शरीराचा ‘मेटाबॉलिझम कंट्रोल सेंटर’ (metabolism control centre / metabolism- अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया) असते.

    आपल्या गळ्याच्या मधे असलेली एक छोटी ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी. आकाराने छोटी फुलपाखरासारखी असते; पण तिचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. ही ग्रंथी थायरॉक्सिन (T4) आणि ट्राय आयोडोथायरोनिन (T3) हे हार्मोन्स  तयार करते, जे आपल्या शरीरातील ऊर्जानिर्मिती, वाढ, वजन, तापमान आणि मानसिक स्थिती नियंत्रित ठेवतात.

    थायरॉईड ग्रंथी आपल्या मेंदूतल्या pituitary ग्रंथीच्या नियंत्रणाखाली काम करते. TSH (thyroid stimulating hormone) हे हार्मोन थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते. TSH जास्त असल्यास थायरॉईड कमी कार्य करते (hypothyroidism) आणि TSH कमी असल्यास थायरॉईड जास्त कार्य करते (hyperthyroidism).

    Hypothyroidism – यामध्ये थायरॉईड ग्रंथी कमी प्रमाणात हार्मोन्स निर्माण करते.

    मुख्य लक्षणे :  

    • सतत थकवा आणि झोप येणे
    • वजन वाढणे (जरी खाणे कमी असेल तरी).
    • त्वचा कोरडी होणे.
    • केस गळणे.
    • थंडी सहन न होणे. (temperature regulation मध्ये बिघाड होतो)
    • बद्धकोष्ठता
    • महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित किंवा पाळी संबंधित इतर तक्रारी
    • उदासीनता
    • लक्ष केंद्रित करण्यात अडचण

    हेही वाचा – Homeopathy : कोलेस्ट्रॉल वाढणे हा आजार नव्हे तर, एक चेतावणी 

    Hyperthyroidism – थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात हार्मोन्स निर्माण करते. 

    मुख्य लक्षणे : 

    • वजन कमी होणे. (जरी खाणे वाढले तरी).
    • हृदयाचे ठोके वाढणे (palpitation).
    • घाम जास्त येणे.
    • चिडचिड, अस्वस्थता, झोप न लागणे.
    • हाताला कंप सुटणे. (tremors)
    • डोळे सुजलेले दिसणे. (Graves Disease मध्ये)

    थायरॉईडचे आजार का होतात? 

    खालील काही कारणांमुळे थायरॉईड ग्रंथीवर परिणाम होऊन हायपोथायरॉईड किंवा हायपरथायरॉईड होऊ शकतो.

    • Autoimmune (शरीरातील प्रतिकारशक्ती स्वतःच थायरॉईड ग्रंथीवर हल्ला करते) 
    • आयोडिनची कमतरता 
    • अनुवांशिकता 
    • मानसिक ताणतणाव (stress)
    • हार्मोन्समध्ये होणारा बदल (महिलांमध्ये गर्भधारणा आणि प्रसूतीनंतर होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे थायरॉईड ग्रंथीवर परिणाम होतो. त्यामुळे थायरॉईडचे विकार स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतात.)
    • काही औषधांचा दुष्परिणाम 
    • बॅक्टेरिया किंवा व्हायरसचे इन्फेक्शन 

     लक्षणे आढळले की, रक्तातील T3, T4,TSH चाचणी द्वारे थायरॉईडचे निदान केले जाते. 

    हेही वाचा – स्त्रीआरोग्य : मासिक पाळीपासून मानसिक शांततेपर्यंत होमिओपॅथी

    होमिओपॅथी आणि थायरॉईड – नैसर्गिक संतुलनाचा मार्ग

    थायरॉईड विकार म्हणजे शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनात आलेली बिघाड. आधुनिक औषधोपचार हे हार्मोन्स बाहेरून देऊन नियंत्रण ठेवतात, पण होमिओपॅथी शरीराच्या अंतर्गत संतुलनावर काम करते.

    होमिओपॅथीची कार्यपद्धती

    1. मूळ कारणावर उपचार : होमिओपॅथी फक्त लक्षणांवर नाही तर त्या मागे असलेल्या भावनिक, मानसिक, आणि शारीरिक कारणांवर लक्ष देते. उदाहरणार्थ, दीर्घकाळचा ताण, चिंता, आत्मविश्वासाचा अभाव किंवा दडपलेली भावना ही अनेकदा थायरॉईड बिघडाची कारणं असतात.
    2. शरीराच्या नैसर्गिक प्रतिसादशक्तीला चालना देते : योग्य औषध दिल्यावर शरीराची नैसर्गिक हार्मोन निर्मिती प्रणाली हळूहळू पुन्हा कार्यरत होते. म्हणजेच, औषध शरीराला “काय करावे” हे शिकवते, बाहेरून हार्मोन देत नाही.
    3. दीर्घकालीन परिणाम : थायरॉईडसारख्या क्रॉनिक विकारांमध्ये होमिओपॅथी दीर्घकाळाने, पण स्थिर आणि दुष्परिणामरहित परिणाम देते.
    4. मन आणि शरीराचा समतोल : थायरॉईडवर भावनिक स्थितीचा मोठा प्रभाव असतो. होमिओपॅथी मन:शांती आणि भावनिक स्थैर्य वाढवते, ज्यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात.

    औषधांसोबत जीवनशैलीतले बदल जोडले गेले की, थायरॉईड ग्रंथीवर वेगाने सुधारणा दिसून येते.

    आहारातील सुधारणा आणि पथ्ये 

    • आयोडिनयुक्त मीठ वापरा.
    • सेलेनियमयुक्त पदार्थ खा (कांदा, लसूण, सूर्यफुलाच्या बिया, ब्राझील नट) 
    • झिंक आणि लोहयुक्त पदार्थ (हिरव्या पालेभाज्या, डाळिंब)
    • गोयट्रोजनिक पदार्थ टाळा (कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली)
    • नियमित व्यायाम – दररोज 30 मिनिटे चालणे आणि सोबत प्राणायाम किंवा इतर योगासने. 
    • ताण नियंत्रणात ठेवणे  नियमित थायरॉईडची तपासणी करणे. 

    “होमिओपॅथी, योग्य आहार आणि सकारात्मक विचार – हेच थायरॉईड नियंत्रणाचे तीन आधारस्तंभ!”


    HOLISTIC HOMOEOCURE CLINIC

    ऋतू पार्क, ठाणे वेस्ट

    मोबाइल – 9890533941


    https://www.instagram.com/holistichomoeocure?utm_source=qr

    https://www.facebook.com/share/1YnodU891Z/?mibextid=wwXIfr

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026 आरोग्य

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    By रविंद्र परांजपेApril 18, 2026

    मागील लेखात आपण योगासने अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण…

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    April 22, 2026

    प्रतीक्षेचा उत्सव साजरा करणारं ‘सिमसिम’!

    April 22, 2026

    Recipe : टेस्टी तोंडलीभात अर्थात मसालेभात

    April 22, 2026

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026

    Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    April 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 एप्रिल 2026

    April 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 275
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 393
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 198
    • मैत्रीण 18
    • ललित 574
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    April 22, 2026

    प्रतीक्षेचा उत्सव साजरा करणारं ‘सिमसिम’!

    April 22, 2026

    Recipe : टेस्टी तोंडलीभात अर्थात मसालेभात

    April 22, 2026
    Most Popular

    आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    April 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.