Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 एप्रिल 2026

    April 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : कुरकुरीत ब्रेड रोल्स…
    फूड काॅर्नर

    Recipe : कुरकुरीत ब्रेड रोल्स…

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 17, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, ब्रेड रोल, स्वादिष्ट ब्रेड रोल, मनपसंत ब्रेड रोल, स्लाइस रोल, बटाटा रोल,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    कामिनी व्यवहारे

    कुठे प्रवासाला जायचं असेल तर, रस्त्यात खाण्यासाठी म्हणून अनेकदा ब्रेड-बटर किंवा सँडविचचा बेत आखला जातो. पण या ब्रेडपासून आणखी एक स्वादिष्ट पदार्थ तयार केला जातो, तो म्हणजे सर्वांचे मनपसंत असे ब्रेड रोल्स. झटपट होणारा हा पदार्थ संध्याकाळच्या चटपटीत नाश्त्यासाठी किंवा शाळेतून आलेल्या मुलांच्या नाश्त्यासाठी बनवता येतो.

    तयारीसाठी कालावधी – 15 ते 20 मिनिटे

    तळणासाठी कालावधी – 15 ते 20 मिनिटे

    एकूण कालावधी – 30 ते 40 मिनिटे

    साहित्य

    • उकडलेले बटाटे – 6
    • कांदा – 1 मोठा (बारीक चिरून)
    • धणे पावडर – अर्धा चमचा
    • जिरे पावडर – अर्धा चमचा
    • लाल तिखट – पाव चमचा
    • हळद – पाव चमचा
    • हिरव्या मिरच्या – 5 ते 6
    • आले – 1 इंच
    • लसूण – 6 ते 7 पाकळ्या
    • कोथिंबीर – अर्धी वाटी (बारीक चिरलेली)
    • लिंबाचा रस – 1 चमचा
    • मीठ – चवीनुसार
    • साखर – चवीनुसार
    • ब्रेड स्लाइस – 15 ते 16
    • तेल – तळण्यासाठी

    हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का?

    कृती

    1. प्रथम आले, मिरच्या आणि लसूण जाडसर वाटून घ्यावे.
    2. उकडलेले बटाटे कुस्करून त्यामध्ये हे वाटण घालावे.
    3. नंतर हळद, मीठ, साखर, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट घालून नीट मिक्स करून छोटे छोटे लांबट गोळे करून ठेवावेत.
    4. ब्रेडच्या कडा कापून घ्याव्यात आणि नंतर एक एक स्लाइस पाण्यात बुडवाव्यात आणि दाबून त्यातील पाणी काढून टाकावे.
    5. मग या भिजवलेल्या स्लाइसमध्ये आपण केलेल्या बटाट्याचा एक गोळा ठेवून ब्रेडची दोन टोके जोडून, हाताने दाबून रोल तयार करावा.
    6. सगळे रोल केल्यावर कढईमध्ये तेल गरम करायल ठेवावे.
    7. नंतर हे रोल गरम तेलात सोडून सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.
    8. सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावेत.

    हेही वाचा – Recipe : राजेळी केळ्यांचे उंबर अन् कढी गोळे


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : टेस्टी तोंडलीभात अर्थात मसालेभात

    April 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026 फूड काॅर्नर

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : टेस्टी तोंडलीभात अर्थात मसालेभात

    By माधवी जोशी माहुलकरApril 22, 2026

    पूर्वीच्या काळात म्हणजे साधारणपणे 1960 ते 1990च्या काळात लग्नसमारंभांमध्ये पंगतीला वरण भात, मसालेभात,  पातळ भाजी,…

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 एप्रिल 2026

    April 23, 2026

    आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    April 22, 2026

    प्रतीक्षेचा उत्सव साजरा करणारं ‘सिमसिम’!

    April 22, 2026

    Recipe : टेस्टी तोंडलीभात अर्थात मसालेभात

    April 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 276
    • अवांतर 182
    • आरोग्य 104
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 394
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 198
    • मैत्रीण 18
    • ललित 574
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 एप्रिल 2026

    April 23, 2026
    Most Popular

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.