Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : भाताचे स्वादिष्ट कटलेट आणि दही ब्रेड
    फूड काॅर्नर

    Recipe : भाताचे स्वादिष्ट कटलेट आणि दही ब्रेड

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 14, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Rice cutlets, curd bread, भाताचे कटलेट, तांदळाचे कटलेट, दही ब्रेड, नाश्ता, Dahi bread, Bhatache cutlets
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    हर्षा गुप्ते

    भाताचे कटलेट

    पुरवठा संख्या – 4 माणसांसाठी

    एकूण कालावधी – अर्धा तास

    साहित्य

    • शिजवलेला भात – दीड वाटी
    • रवा – अर्धी वाटी
    • दही – अर्धी वाटी
    • हिरव्या मिरच्या – चवीनुसार
    • लसूण – 5-6 पाकळ्या
    • आले – अर्धा इंच
    • कोथिंबीर – अर्धी वाटी (चिरलेली)
    • चिरलेला कांदा – 1 वाटी
    • गाजर – 2 मध्यम
    • सिमला मिरची – 1 मध्यम
    • स्वीट कॉर्न – 1 लहान वाटी
    • कढीपत्ता – 4-5 पाने
    • हिंग – चिमुटभर
    • मोहरी – 1 लहान चमचा
    • तेल – फोडणीपुरते
    • मीठ – चवीनुसार
    • साखर – चवीनुसार
    • इनो – एक चमचा

    कृती

    1. भात, रवा, दही, मीठ, साखर एकत्र कालवून घ्यावे.
    2. गाजर, सिमला मिरची, कांदा, मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर चिरून घेईपर्यंत रवा नीट उमलून येईल.
    3. सगळ्या भाज्या आणि कालवलेला भात एकत्र करून त्यात एक चमचा इनो टाकावे.
    4. गरज लागल्यास थोड पाणी घालून हे मिश्रण मळून घ्यावे.
    5. नंतर त्याचे छोटे गोळे करून वाफवून घ्यावेत.
    6. कढईमध्ये तेल घेऊन त्यात तेल गरम करावे.
    7. नंतर हिंग, मोहरी, कढीपत्ता, चिरलेली हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी.
    8. त्यात हे कटलेट ठेवावेत आणि थोड्या वेळानंतर उलटून सोनेरी रंगाचे झाल्यावर बाहेर काढावेत.

    हेही  वाचा – Recipe : स्वादिष्ट शेंगा डाळ अन् मिस्सी रोटी

    टीप

    • टोमॅटो सॉस, मेयोनिज आणि रेड चिली सॉस मिक्स करून त्यासोबत गरम गरम कटलेट खावेत.
    • या मिश्रणात अजून काही आवडीच्या भाज्या चिरून घालू शकता.

    दही ब्रेड

    पुरवठा संख्या – दोन माणसांकरिता

    बनविण्यासाठी कालावधी – अर्धा तास

    साहित्य

    • ब्रेड – 8 स्लाइस
    • घट्ट आंबटसर दही – 1 मोठी वाटी
    • मीठ – चवीनुसार
    • साखर – चवीनुसार
    • हिंग – चिमुटभर
    • मोहरी – 1 लहान चमचा
    • कढीपत्ता – 4-5 पाने
    • हिरव्या मिरच्या – 2 मोठ्या
    • लसूण – 5-6 पाकळ्या (आवडत असेल तर)
    • तेल – 1 मोठा चमचा

    कृती

    1. एका मोठ्या वाडग्यात दही काढून घ्यावे.
    2. त्यात दोन-तीन चमचे पाणी घालून घट्ट फेटून घ्यावे.
    3. त्यात चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालावी.
    4. कढीपत्ता, मिरची आणि लसूण चांगले कुटून घ्यावे
    5. तव्यावर थोडे तेल गरम करून हिंग, मोहरी, फोडणी तसेच कुटलेली मिरची-लसूण याची फोडणी करावी आणि ती दह्यात घालावी.
    6. फोडणी नीट मिसळल्यावर दह्यात ब्रेड घोळवून तव्यावर गरम तेलावर दोन्ही बाजूने छान भाजून घ्यावेत.

    हेही वाचा – Recipe : ही कोथिंबीर वडी करून पाहा…

    टीप

    • दही ब्रेड सॉस, चटणी किंवा नुसताही खायला रुचकर लागतो.
    • सकाळचा झटपट नाश्ता होऊ शकतो.
    • ब्रेड थोडा शिळा असेल तर आणखी चांगले.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026 फूड काॅर्नर

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    By माधवी जोशी माहुलकरApril 19, 2026

    पोहे हा प्रकार जवळपास सर्वांच्याच आवडीचा आहे! पोह्यांचे विविध प्रकार महाराष्ट्रात प्रचलित आहेत. अगदी मुलगी…

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 272
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 390
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 197
    • मैत्रीण 18
    • ललित 562
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026
    Most Popular

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.