Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मार्च 2026

    March 18, 2026

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, March 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    रश्मी परांजपेBy रश्मी परांजपेMarch 9, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, शालेय शिक्षण, विज्ञान विषय, विज्ञानाचा अभ्यास, शिशुगटातील शिक्षण, शिशुगटातील विज्ञान शिक्षण, शिशुगट विज्ञान विषय, ज्युनिअर केजी विज्ञान, विज्ञान अभ्यास,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण खेळगटातील विज्ञान शिक्षण याविषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण याविषयी माहिती घेऊयात. शिशुगटातील विज्ञानाची तोंडओळख पुढील मुद्द्यांच्या आधारे करण्यात येते :

    1. गुलाबी मनोरा
    2. लांब जीना
    3. मूळ रंग
    4. खरखरीत – गुळगुळीत
    5. पंचेंद्रिये

    आता आपण वरील मुद्दे लक्षात घेऊन शिशुगटातील विज्ञान शिक्षण कसे दिले जाते याबाबत जाणून घेऊ.

    गुलाबी मनोरा आणि लांब जीना यातून लहान – मोठा आकार तसेच कमी – जास्त लांब असा तौलनिक अभ्यास शिकविण्यास सुरुवात केली जाते.

    गुलाबी ठोकळा मनोरा खेळातून विज्ञान

    या खेळात 1 सें.मी. ते 10 सें.मी. या मापाचे चौरसाकृती लाकडे ठोकळे म्हणजे चिती यांचा वापर करण्यात येतो.  सर्वात खाली 10 सें.मी.चा मोठा ठोकळा ठेवून त्यावर एकावर एक तुलनेने लहान ठोकळे मुलांकडून रचून घेतले जातात. अगोदरच्या लेखात सांगितल्याप्रमाणे मुलांना दोन्ही हातांच्या पहिल्या बोटाने ठोकळे उचलायला शिकवावे. स्नायू नियंत्रण तसेच बोटे आणि डोळे यांतील समन्वय साधण्यासाठी याचा उपयोग होतो.

    लाल लांब पट्टी जीना खेळातून विज्ञान

    या खेळात 1 सें.मी. ते 10 सें.मी. लांबीच्या लाल रंगाच्या पटट्या वापरल्या जातात. 1 से.मी. लांबीच्या पट्टीपुढे 2 से.मी. लांबीची पट्टी या पद्धतीनुसार 10 पटट्या ठेवायला शिकवले जाते.

    रंग परिचयातून विज्ञान

    मुलांना सर्वप्रथम लाल, पिवळा आणि नीळा या मूळ रंगांचा परिचय करून दिला जातो. हा रंग परिचय वेगवेगळ्या माध्यमातून करून दिल्यास परिचय दृढ होतो. परिचय दृढ करण्यासाठी काही वस्तूंचा उपयोग करण्यात येतो, उदाहरणार्थ रंगीत खडू, रंगीत जिलेटीन पेपर, विविध रंग पाण्यात मिसळून तयार केलेले रंगीत पाणी इत्यादी.

    स्पर्श परिचयातून विज्ञान

    हाताच्या बोटाने स्पर्श करून खरखरीत आणि गुळगुळीत स्पर्शाबाबत मुलांना समजावून सांगितले जाते. स्पर्श परिचय अधिक दृढ होण्यासाठी विविध वस्तू दाखवल्या जातात, उदाहरणार्थ, खर कागद आणि पांढरा कागद, खर पाटी आणि नितळ पाटी इत्यादी.

    पंचेंद्रिय परिचयातून विज्ञान

    मुलांना मानवी शरीरातील पंचेंद्रिये आणि त्यांचा उपयोग पुढील पद्धतीने शिकवला जातो :

    डोळे – विविध रंग आणि वस्तू ओळखणे.

    कान – टाळ, खंजिरी अशा विविध वस्तूंचे निरनिराळे आवाज ऐकणे.

    नाक – अत्तर, औषधं, फुलं अशा विविध वस्तूंचे वास घेणे.

    जीभ – वेगवेगळ्या चवींचा परिचय करून देणे, उदाहरणार्थ –

    साखर : गोड, चिंच : आंबट, आलं : तिखट, मीठ : खारट, कारलं : कडू

    त्वचा – वर नमूद केल्यानुसार खरखरीत आणि गुळगुळीत असे स्पर्शज्ञान करून देणे.

    थोडक्यात सांगायचे झाल्यास, शिशुगटातील विज्ञान शिक्षणाद्वारे बालगटातील मुलांच्या विज्ञान शिक्षणाचा पाया भक्कम केला जातो. पुढील लेखात आपण बालगटातील विज्ञान शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत.


    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9881943593 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


    Avatar photo
    रश्मी परांजपे

    रश्मी परांजपे वय 66 वर्षे. पुणे. शिक्षण - बी. कॉम्. पूर्व प्राथमिक (Pre-Primary) शाळेत 32 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत राहून निवृत्त. रेणुका स्वरुप संचलित सरकारमान्य पूर्व-प्राथमिक प्रशिक्षण परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. टेल्को समाज विकास केंद्र आणि मोरया शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2016मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2005पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. निवृत्तीनंतर यजमानांच्या योग प्रचार आणि प्रसार कार्यात तसेच निरामय आरोग्य संकल्पना राबविण्यात सक्रिय सहभाग. मोबाइल - 9881943593

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 16, 2026

    मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील…

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026

    शिक्षकांच्या चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली कशी असावी आणि कशी नसावी!

    February 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मार्च 2026

    March 18, 2026

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 354
    • शैक्षणिक 72

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn