Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026

    March 19, 2026

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    March 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, March 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बालशाळेतील अभ्यासक्रम : मुक्त व्यवसाय
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : मुक्त व्यवसाय

    रश्मी परांजपेBy रश्मी परांजपेNovember 3, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, शाळाप्रवेश, बालशाळा, बालशाळा अभ्यासक्रम, मुक्त व्यवसाय, फाडकाम, चुरगळा काम, माती काम
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण बालशाळेतील अभ्यासक्रमाची रुपरेषा आणि त्यातील समाविष्ट विषय याबाबत सविस्तर माहिती घेतली. आता आपण बालशाळेतील अभ्यासक्रमातील एकामागोमाग एक विषयांचा अभ्यास करणार आहोत. अभ्यासाची सुरुवात आपण ‘मुक्त व्यवसाय’ हा विषय घेऊन करुयात.

    मुक्त व्यवसाय म्हणजे काय?

    सोप्या भाषेत सहज समजेल अशा पद्धतीने सांगायचे झाल्यास मुक्तव्यवसाय म्हणजे असे व्यवसाय जे मुलं त्यांच्या मनात येईल तसे आणि त्या पद्धतीनुसार करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे, मुलं मुक्त व्यवसाय करत असताना शिक्षिकेने मार्गदर्शन करायचे नसते, मात्र तिने मुलांवर बारीक लक्ष ठेवणे अपेक्षित असते. मुलं मनात येईल तसं, त्यांना दिलेले विविध व्यवसाय पूर्ण करत असतात. मुलं वर्गात एकमेकांशी खेळत असतील तर, ती भांडण-मारामारी न करता गोडीगुलाबीने खेळतात ना, हे शिक्षिकेने बघायचे असते.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रमाची रुपरेषा 

    मुक्त व्यवसायाचे स्वरूप

    मुक्त व्यवसायामधे सर्वसाधारणपणे खालील बाबींचा अंतर्भाव होतो :

    1. फाडकाम
    2. चुरगळा काम
    3. माती काम
    4. मणी ओवणे
    5. फुले ओवणे
    6. फळ्यावर चित्र काढणे.
    7. मनोरा लावणे.
    8. चेंडूशी खेळणे.

    वरील विविध खेळांवरून मुक्त व्यवसायाचे स्वरूप लक्षात येते.

    खेळगटातील मुक्त व्यवसाय

    खेळगटातील मुलांसाठी फाडकाम, चित्र काढणे, चेंडूशी खेळणे अशा सोप्या खेळांचा मुक्त व्यवसायात समावेश करता येईल.

    फाडकाम करताना सुरुवातीला जुनी वर्तमानपत्रे उपयोगी पडतात. नंतर रंगीत पतंगी कागद मुलांना फाडकामासाठी देता येतात. खेळगटाच्या वयोगटातील मुलांना फाडकाम खूप आवडते. त्यामुळे त्यांच्या मनावरील ताण हलका होतो. (जसं की भांडी घासताना गृहिणींच्या मनावरील ताण हलका होतो.)

    तसेच, मुलांना फाडकाम करताना अंगठा, पहिले आणि दुसरे बोट यांचा उपयोग करण्यास शिकवावे. यामुळे मुलांना बोटांच्या स्नायूंचे नियंत्रण करणे शक्य होते. आपण लिहिण्यासाठी याच तीन बोटांचा वापर करतो… आणि लेखनाची पूर्वतयारी ती हीच, ही गोष्ट लक्षात आलीच असेल.

    हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : शाळा आणि वर्ग सजावट

    सुरुवातीला कागदाचे मोठमोठे तुकडे करणारी मुलं लहान-लहान तुकडे करायला शिकतील. हे कागदांचे तुकडे टाकून न देता एका मोठ्या पांढर्‍या किंवा रंगीत कार्डशीटवर वेगवेगळे आकार काढून मुलांना चिकटवायला शिकवावे. सुरुवातीला शिक्षिकेने तुकडे चिकटवून दाखवावेत. मुलं बघून हळुहळु शिकतील. ही चित्रे वर्गात लावून ठेवावीत. आपली कलाकृती वर्गात ठेवलेली पाहून मुलांना खूप आनंद होतो.

    मुलांना फळ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या रेघोट्या मारायला नेहमीच आवडते. यातूनच मुलं स्वतःच्या कल्पनेने चित्र काढतात आणि त्याला नावही देतात. मुलांच्या अशा कलाकृतींचे शाळेत तसेच आपणही कौतुक करणे गरजेचे आहे.

    मुलं जेव्हा चेंडूशी खेळतात, तेव्हा त्यांचे हात आणि डोळे यांचा समन्वय साधण्यास सहाय्य होते.

    मुक्त व्यवसायातून खेळगटातील मुलांच्या विविध कौशल्याचा विकास होण्यास आरंभ होतो. पुढील लेखात आपण शिशुगट आणि बालगट या वर्गांसाठी मुक्त व्यवसाय या विषयासंबंधीत माहिती घेऊयात.

    क्रमश:

    Avatar photo
    रश्मी परांजपे

    रश्मी परांजपे वय 66 वर्षे. पुणे. शिक्षण - बी. कॉम्. पूर्व प्राथमिक (Pre-Primary) शाळेत 32 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत राहून निवृत्त. रेणुका स्वरुप संचलित सरकारमान्य पूर्व-प्राथमिक प्रशिक्षण परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. टेल्को समाज विकास केंद्र आणि मोरया शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2016मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2005पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. निवृत्तीनंतर यजमानांच्या योग प्रचार आणि प्रसार कार्यात तसेच निरामय आरोग्य संकल्पना राबविण्यात सक्रिय सहभाग. मोबाइल - 9881943593

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 16, 2026

    मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील…

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026

    March 19, 2026

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    March 19, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 241
    • अवांतर 171
    • आरोग्य 89
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 182
    • मैत्रीण 16
    • ललित 501
    • वास्तू आणि वेध 355
    • शैक्षणिक 72

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn