Author: रविंद्र परांजपे

Avatar photo

लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवर्जून संपर्क करावा. मोबाइल - 9850856774

मागील लेखात आपण आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य, याबाबत जाणून घेणार आहोत. योगनिद्रा ही खरोखरच सोपी आणि सर्वांनाच सहज जमेल, अशी बहुगुणी प्रक्रिया आहे. यामुळेच योगाभ्यासात योगनिद्रेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. योगनिद्रा म्हणजे काय? योगाभ्यास करत असताना विश्रांतीसाठी शवासन अल्प कालावधीसाठी घेतले जाते. जेव्हा शवासन दीर्घ कालावधीसाठी काही विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी घेतले जाते आणि यासाठी काही विशेष प्रक्रियांचा समावेश करण्यात येतो, तेव्हा या योगाच्या अभ्यासाला योगनिद्रा असे म्हणतात. हेही वाचा – योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य योगनिद्रा अभ्यासातील विशिष्ट टप्पे – संक्षिप्त कृती योगनिद्रेचा अभ्यास…

Read More

मागील लेखात आपण योगासने अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. योगाभ्यासात मुद्रा अभ्यासाला विशेष महत्त्व आहे. आरोग्यदायी हस्त मुद्रा म्हणजे काय? आपले शरीर पंचतत्वांनी बनले असून आपल्या हातांच्या बोटांमध्ये पुढील प्रमाणे पंचतत्त्वे आहेत : अंगठा – अग्नीतत्व तर्जनी –  वायूतत्व मध्यमा – आकाशतत्व अनामिका – पृथ्वीतत्व करंगळी – जलतत्व हातांची बोटे जुळवून, एकमेकांवर दाब देऊन, एकमेकांत गुंफवून जी रचना तयार होते त्याला मुद्रा म्हणतात. मुद्रा अभ्यास हातांच्या बोटांच्या साहाय्याने करतात, म्हणून यांना हस्त मुद्रा असे संबोधतात. या हस्त मुद्रा आपल्या व्याधी-विकारांवर नियंत्रण मिळवून आपणास…

Read More

मागील लेखात आपण सूर्यनमस्कार अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. योगाभ्यासातील आसने ही अष्टांग योगातील तिसरी पायरी आहे. योगासने हा योगाभ्यासातील गाभा आहे. योगासन म्हणजे काय? स्थिर-सुखमासनम् हा योगासनाचा मूलमंत्र आहे. योगाच्या भाषेत ज्या शारीरिक स्थितीमध्ये आपण स्थिरता व सुखकारकता अनुभवतो, त्यास आसन म्हणतात. योगासनांसंबंधी महत्त्वाचे मुद्दे योगासने अभ्यास रिकाम्या पोटी करणे आवश्यक आहे. यासाठी सकाळची वेळ योग्य आहे. पण सकाळी न जमल्यास सायंकाळी रिकाम्या पोटी योगासने अभ्यास करावा. जागा स्वच्छ, मोकळी आणि हवेशीर असावी. शारीरिक हालचाली सुकर होण्यासाठी पोषाख सैलसर आणि सुटसुटीत असावा. योगासने अभ्यास…

Read More

मागील लेखात आपण भ्रामरी प्राणायाम कसा करावा आणि या अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. सूर्यनमस्कार भारतीय परंपरेतील सर्वांगसुंदर व सर्वपरिचित व्यायाम आहे. सूर्यनमस्कार अभ्यासाची वैशिष्ट्ये भगवान श्री सूर्यनारायणाची उपासना पूरक श्र्वसनाची जोड काही उपयुक्त आसनांची साखळी अल्प प्रमाणात प्राणायामाची योजना बीजमंत्राचे सामर्थ्य सूर्यनमस्कारासंबंधी महत्त्वाचे मुद्दे सकाळची सूर्योदयाची वेळ योग्य, न जमल्यास रिकाम्या पोटी सूर्यास्ताच्या वेळी सूर्यनमस्कार घालावेत. जागा स्वच्छ आणि हवेशीर असावी. पोषाख सैलसर असावा. हालचाली संथ, सावकाश आणि नियंत्रित असाव्यात. सूर्यनमस्कार अभ्यास क्षमतेनुसार करावा. सूर्यनमस्कार अभ्यासानंतर विश्रांतीसाठी शवासन अवश्य घ्यावे. हेही वाचा – अनुलोम-विलोम प्राणायाम…

Read More

मागील लेखात आपण अनुलोम-विलोम प्राणायाम कसा करावा आणि या अभ्यासातून मिळणारे आरोग्यलाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्याबाबत जाणून घेणार आहोत. भ्रामरी प्राणायाम म्हणजे काय? भ्रमर म्हणजे भुंगा. हा प्राणायाम करताना निर्माण झालेला ध्वनी भुंग्याच्या हुंकारयुक्त गुणगुणणार्‍या आवाजासारखा वाटतो. भ्रामरी प्राणायाम कसा करावा? दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडताना भुंग्यासारखा आवाज काढत ओंकारातील ‘म’कारासारखे गुंजन करावे. हा प्राणायाम करताना विविध पद्धतींचा अवलंब करण्यात येतो. उदाहरणार्थ, डोक्यावर हातांचे तळवे ठेवणे, दोन्ही कानात तर्जनी घालणे, मिटलेल्या डोळ्यांवर हातांची बोटे ठेवणे इत्यादी. असे केल्याने या प्राणायामामुळे शरीरात होणारी स्पंदने जाणवतात. भ्रामरी रेचक करण्यास सोपा आहे आणि भ्रमर पूरक…

Read More

मागील लेखात आपण योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास, प्राणायामाची आवश्यकता आणि पूर्वतयारी, विविध प्रकार तसेच प्राणायामाचे आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. अनुलोम-विलोम प्राणायाम म्हणजे काय? चंद्रभेदन प्राणायामास जोडून लगेचच सूर्यभेदन प्राणायाम केल्यास अनुलोम-विलोम प्राणायाम होतो. चंद्रभेदन प्राणायाम + सूर्यभेदन प्राणायाम यांची चक्रावर्तन क्रिया = अनुलोम-विलोम प्राणायाम अनुलोम-विलोम प्राणायाम कसा करावा? मागील लेखातील प्राणायामाची पूर्वतयारी आणि महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यास करावा. यासाठी ध्यानोपयोगी आसनात अथवा सहजासन घेऊन बसावे. जमिनीवर बसण्यास अवघड वाटत असेल तर खुर्चीवर बसावे. अनुलोम-विलोम प्राणायाम करताना डाव्या हाताची ज्ञानमुद्रा करावी, उजव्या हाताची प्रणवमुद्रा करावी…

Read More

मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास याबाबत जाणून घेणार आहोत. प्राणायाम ही अष्टांग योगातील चवथी पायरी आहे. आता आपण प्राणायाम या संज्ञेबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. प्राणायाम म्हणजे काय? प्राणायाम हा संस्कृत शब्द आहे. प्राण + आयाम = प्राणायाम प्राण म्हणजे चेतना अथवा शक्ती अथवा ऊर्जा होय. सजीवांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक शक्ती म्हणजे प्राणशक्ती होय. आयाम म्हणजे नियंत्रण करणे. प्राणायाम म्हणजे प्राणशक्तीवर नियंत्रण. श्वसनपद्धती नियंत्रण करण्याची कला म्हणजे प्राणायाम होय. प्राणायामाची आवश्यकता आपल्या दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करण्याचे प्राणायाम हे अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त साधन आहे.…

Read More

मागील लेखात आपण योगाभ्यासातील दीर्घ श्वसन अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. कपालभाती म्हणजे काय? कपालभाती म्हणजे श्वसनमार्ग शुद्धिकरण प्रक्रिया आहे. कपाल म्हणजे कवटी आणि भाती म्हणजे चमकणे. कपालमध्ये मोठा आणि लहान मेंदू इत्यादी कवटी अंतर्गत येणाऱ्या सर्व इंद्रियांचा समावेश होतो. कपालभाती केल्याने ही इंद्रिये प्रकाशमान होऊन अधिकाधिक कार्यक्षम होतात. कपालभाती कशी करावी? बैठक स्थितीतील पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन अथवा सहजासन घेऊन ताठ बसावे. डोळे बंद करून दोन्ही हातांची द्रोणमुद्रा करून हात गुडघ्यांवर ठेवावेत. संथ श्वसन करत रहावे. तद्नंतर, दीर्घ श्वास घेऊन सावकाश श्वास सोडत…

Read More

मागील लेखात आपण योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण दीर्घ श्वसन अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. श्वसन अभ्यास दैनंदिन योगाभ्यासात श्वसन अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वास्तविक, दैनंदिन योगाभ्यास करताना ओंकार आणि गुरुवंदना झाल्यानंतर श्वसनमार्गशुद्धी केली जाते. यामुळे आपला योगाभ्यास सहज, सुकर आणि अधिक लाभदायक होतो. आता आपण श्वसन म्हणजे काय, हे जाणून घेऊयात. श्वसन म्हणजे काय? सोप्या भाषेत श्वसन म्हणजे श्वासोच्छ्वास म्हणजेच श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही क्रिया होय. योगाच्या भाषेत या क्रियांना अनुक्रमे पूरक आणि रेचक असे म्हणतात. श्वसन क्रिया अगदी सहज आणि नैसर्गिक असून…

Read More

मागील लेखात आपण ओंकार साधनेतून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. योगाभ्यासातील प्रार्थना दैनंदिन योगाभ्यासात पुढील प्रार्थनांचा समावेश केला जातो : प्रार्थना म्हणण्यापूर्वी शरीर-मनाची तयारी आवश्यक आहे. प्रार्थनेची पूर्वतयारी पद्मासन, अर्धपद्मासन अथवा सहजासनात बसावे. हातांची ज्ञानमुद्रा अथवा ध्यानमुद्रा करावी. डोळे अलगद मिटून पाठीचा कणा ताठ ठेवावा. संथ श्वसन करावे. आपण आता प्रार्थनेविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. आरंभीची प्रार्थना योगाभ्यासातील आरंभ त्रिवार ओंकाराने केला जातो, हे आपण मागील लेखात पाहिले. त्रिवार ओंकार केल्यावर गुरुवंदना केली जाते. गुरुवंदना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरः । गुरू साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे…

Read More